पोस्ट्स

ऑगस्ट, २०१४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...
आपण प्रत्येकचजण रोज ठराविकच आयुष्य जगत असतो. आठवड्याचे सातही दिवस, ठरवून एकसारखंच सगळं करत असतो, मात्र थकून रात्री जेव्हा निजतो काय तेव्हा एकदातरी चुकून आपल्याला वाटते का, आजचा दिवस खरंच आनंदाचा होता, सुखाचा होता; बर्याच लोकांना वाटत असेलही, दिवस किंवा काही तास आनंदाचे असतीलही पण तरीही जीवन हे सुसूत्रबद्ध असे नि एकाचं  ढाच्यात अडकून बसल्याने मला वाटते आयुष्याची वाताहत व्हायला सुरुवात झाली आहे किंबहुना आपणच त्याला आरंभ दिला आहे. काळ पुढे गेला, तसा माणूस हा प्राणी हुशार होत गेला, त्याचा टप्याटप्याने विकास होत राहीला, पुढेही गतीने तो होत जाईलच मात्र या सगळ्यांत, माणसांनी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करण्याकरिता व्यावहारीक स्पर्धा करायला सुरुवात केली, पुढे असणार्यांच्या आणखीन पुढे मला कसे जाता येईल यावरच सतत विचार करायला शिकला. घड्याळाची काटे नियती बनून नाचवू लागली, वेळ मर्यादेचे भान सगळ्यांना ठावूक झाल्याने माणसाला माणसाची किंमत राहिली नाही. माणुसकी ही भावना आणि सार्या संवेदना वेळ प्रसंगी गोठवून टाकल्या जातात. या शहरीकरणात शेजारी कोण राहते हे ठावूक नसते परंतु फेसबूकवर मात्र पाच हजार मि...
कधी कधी मला हे वाटे हातास धरुनी पुढे मी व्हावे मिटवावी झालर ती कारुण्याची सृष्टीने मग सजवूनी तुला बनवूनी माझी गोजिरी राधा मी तुझा मनोहर व्हावे त्या विस्कटलेल्या केसांच्या लतांमधुनी आणि सुरकुतलेल्या चेहर्यावारी , का रडे चंद्र आडपडदा ठेवूनी कागद स्वप्नांचा तू असे फेकलेला चुरगाळूनी सौंदर्याशाली  तनुजा तू , रम्य किती असव्यात तुझ्या जीवन लहरी वाटते मला माळावी आयुष्यात तुझ्या बाग सुमनांची गंधाळणारी कधी कधी मन तेव्हा , मग आडवे येते हातास धरुनी मागे सारते आवर घालतो , खुपसा स्वतःला कारण सखे , दुनिया नाही माझे ऐकणारी प्रेमास नाही हि समजणारी विशू 
कल, स्वभाव आणि माणूस नमस्कार ! सर्व रसिक   आणि वाचक यांना माझा आदरपूर्वक नमस्कार . मी कुणीही मोठा लेखक नाही किंवा कुणी विचारवंत ,तत्ववेत्ता मुळीच नाही ,तसेच एखादा मानसशास्त्रज्ञ तर त्याहून ही नाही ,मी पुणे विद्यापीठातून पदवी संपादन करून ,कॉंम्प्यूटर इंजिनियरिंग शिकूनही आता माध्यमांचे अध्ययन करत असणारा एक विद्यार्थी आहे. आज मला सहज एक गोष्ट लक्षात आली की काही विषयांबद्दल मला माझी मते आहे, ती कदाचित दुसर्यचा दृष्टीकोन बदलू शकतात ,कुणाच्यातरी आयुष्यात त्याला एकदातरी उपयोगी पडू शकतात, ज्यातून आपण सध्या सुरु असलेले काळाचे दुष्टचक्र थोडाफार थांबवू शकू, आज दिवसागणिक बलात्कार होत आहेत, एक, नव्हे अनेक का ? तर माणसानेच घडवल्या माणसाकडून होत आहेत ही विकृती आहे जिला आळा घातला जावा असे मला वाटते म्हणूनच हा माझा लेखप्रपंच . कल, स्वभाव आणि माणूस पाहायला गेलं तर इन मीन तीन शब्द आहेत. कल म्हणजे मनाचा कल तो ज्या दिशेने झुकलेला आहे तसा आपला स्वभाव असतो, आणि या स्वभावातून माणूस घडत असतो. जर कुणी सारखा हसत असेल तर त्याला हसतमुख म्हणतात, रडणार्याला दुखवलेला असे बोलले जाते, चेहर्यावारची माशीही न हलू दे...
Each time your remembrance, euthanasia my heart, But sweetheart did I ever campaign for it Then why, you are still coming in my thoughts To make a cremation of me, Then please don’t do this again, dear This is something like the grim Reaper for me Would you like to see my decease? Do come straight to my house and ask me for doing that Actually, it’s my personal will to see you As mine memento mori But please stop coming in my memories Because that will be more painful than death Sweetheart, you are going to read following words on my epitaph ‘Never lose your love’ Vish lonari 
तुषार नातू यांनी घडविली नशायात्रेची सफर .. विशाल लोणारी, नाशिक       येथील एच पी टी महाविद्यालयात जनसंपर्क विभागात नव्याने प्रकशित झालेल्या ‘नशायात्रा या पुस्तकाचे लेखक तुषार नातू यांनी विद्यार्थ्यांशी २ ऑगस्ट ला संवाद साधला. तत्पूर्वी प्रास्ताविकात जनसंपर्क विभाग प्रमुख यांनी नातू यांची ओळख करून देतांना प्रस्तुत पुस्तकात तुषार नातू यांचा कबुलीजबाब तसेच उघद उघड आणि अस्सल आत्मकथन असल्याचे प्रतिपादन केले.       आपल्या पुस्तकाविषयीचे मनोगत सांगताना नातू म्हणाले की माणूस हा नेहमी आनंदाच्या शोधात असतो. जीवनाला कंटाळून जात तो स्वआनंदाच्या शोधात भटकत असतो. मला हा आनंद वयाच्या चौदाव्या वर्षी गवसला तो ब्राऊनशुगरच्या रुपात. मग पुढे सिगारेट,दारू,चरस,अफू,गांजा याचाही नाद त्यांना लागला. दारूचा पहिला प्याला, सिगरेटचा पहिला झुरका हा अंतर्मनाला विलक्षण आनंद देवून गेला. अनुभवाची गम्मत सांगताना कोटी करत म्हणले कि प्रत्येक व्यसनी माणसाचा पहिला अनुभव जो त्याला खूप ‘मस्त’ वाटतो, तो कायमचा त्याच्या मेंदूत सेव्ह होतो आणि त्याचा विचाराने तो पुढे अजूनच बिघडत जात...
whatsup स्टेटस आणि chat करताना गुंगून गेलीस तू , तरी मला एफबीवर लाईक कार्याचे विसरू नकोस , कारण हे वरवरचे आवरण , नात्यांला नसायचे तेव्हा , तेव्हा , तुझ्या हातात हात , खर्या जगात मीच तर धरला होता . -       विशू 

shivani ...ek jidd

शिवानीच्या मैत्रींनिंनी तिला रडताना पाहिले नाही श्री पाटील यांनी एकदाच तिला रडताना बघितले .तो ऑक्टोबरचा शेवटचा दिवस होता . जेव्हा डॉक्टर त्यांना काय समजले ते एका १६ वर्षीय युवा क्रिकेटपटूला सांगत होते की हे एक फ्लूचे अत्यंत गंभीर निदान होते, जे कधीच लुकेमियात रुपांतरीत झालंय.      “ ती तेव्हा थोडीसी रडली’’ पण नंतर, श्री पाटील म्हणाले “ पण, नंतर लगेच ती थांबली आणि म्हणाली ‘ ठीक आहे,मी अजून मेलेली नाही '. तेव्हापासून मी तरी तिला कधीच रडताना बघितले नाही जरी ती म्हणते कधीकधी रात्रीचे ती रडते जेव्हा ती एकटीच असते . (काल्पनिक गोष्ट आहे, पण मला वाटते, शिवानीसारखी जगण्याची वृत्ती,प्रेरणा,जिद्द आपण सगळ्यांनीच अंगीकारायला हवी, मग संकटांनी खुशाल यावे) विशू     

कॉलेज कॅम्पस बहरला

कॉलेज कॅम्पस बहरला ..  विशेष प्रतिनिधी, नाशिक श्रावणमासी हर्ष मानसि हिरवळ दाटे चोहीकडे क्षंणात येते सरसर शिरवे क्षंणात फिरुनि ऊन पडे श्रावण महिना म्हटलं की बालकवींच्या वरील ओळी मनात गुंजू लागतात. श्रावण म्हणजे धुंद करणारे हिरवे वातावरण.श्रावण म्हणजे सार्या ऋतूंतले सळसळतेपण,चिंब चिंब पावसात भिजून जात, बेभान मन नाचत,गात असतं, श्रावणात धो-धो पाऊस पडल्याने वसुंधरेने जणू हिरवा शालूच परिधान केलाय एवढी ती मोहक होते, त्याचबरोबर श्रावण म्हटला की भूतकाळाच्या आठवांनी गहीवरायलाही होते.मग कुणा प्रियकराला त्याची प्रेयसी आठवू लागते, कुणी ज्येष्ठ नागरिक त्यांच्या तरुणपणीच्या,सहकार्यांच्या आठवणीत रंगून जात चहा-भजींचा आस्वाद घेतात. एकंदरीतच अवनीला ला फुटलेलं ते लावण्य असतं, जे तुम्हाला सुखावह वाटते, श्रावणात क्षणात पाऊस,क्षणात ऊन असते,त्यामुळे सरणारी प्रत्येक घटिका एक नवी प्रचीती येते, नेहमीपेक्षा वेगळे असे विश्व श्रावणात हा निसर्ग आपल्याला आनंदासवे दाखवत असतो. अगदी श्रावणातला प्रत्येक दिवस हा बहारदार होवूनच येतो. शहरात सहसा कमीच बघायला मिळणारा हा सृष्टीचा थाट पाहून अंगावर रोमांच उभा राहतो.एरव्हीचा ...

social media

विशेष प्रतिनधी , नाशिक 02-08-2014 व्यक्तिगत असो वा सार्वजनिक सोशल मीडियामुळे आज प्रत्येक नेटीझन्सच्या आयुष्यावर थोडा-बहुत परिणाम हा होतोच आहे. चांगल्या परिणामांपुढे वाईट परिणाम हे कमी पण अत्यंत गंभीर असे असतात आणि याकारणामुळेच सोशल मीडिया फक्त बदनाम होत आलाय. परंतू साहित्य क्षेत्राला सोशल मीडिया खूप मोठे व्यासपीठ म्हणून उपलब्ध झालंय. आजकाळात सर्वदूर टीव्ही पोहोचलेत परंतू भारनियमनामुळे वीजप्रवाह सुरळीत नसतो अशा वेळी बातम्यांकरिता सोशल मीडिया हा सर्वोत्तम पर्याय ठरतो.लेख,पुस्तके,कविता,पाककृती,प्रबंध अनेक अनेक ज्ञाताद्न्यात गोष्टींचे सोशल मीडियावर संघटन  आणि प्रसारण होत आहे.आजाकाळात अनेक वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या यांनी आपापली सोशल दालनेही खुली केली आहेत, त्यावरून दिवस रात्र फक्त बातम्यांचा ओघ सुरु असतो. आता पुन्हा सांगतो बातमी म्हटलं की चांगलं-वाईट सगळंच आलं आणि म्हणूनच मला म्हणावेसे वाटते सोशल मीडिया हा जितका आपल्याला आपणच दिलेला आशीर्वाद आहे, आणि तितकाच फुंकलेला श्रापसुद्धा. सोशल मीडिया कोण कशा पद्धतीने वापरतो यावरच तो चांगला कि वाईट हे अवलंबून आहे, इतर सर्व गोष्टीप्रमाणे हे ही तंत्र...