विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...
तुषार नातू यांनी घडविली नशायात्रेची सफर ..

विशाल लोणारी, नाशिक

      येथील एच पी टी महाविद्यालयात जनसंपर्क विभागात नव्याने प्रकशित झालेल्या ‘नशायात्रा या पुस्तकाचे लेखक तुषार नातू यांनी विद्यार्थ्यांशी २ ऑगस्ट ला संवाद साधला. तत्पूर्वी प्रास्ताविकात जनसंपर्क विभाग प्रमुख यांनी नातू यांची ओळख करून देतांना प्रस्तुत पुस्तकात तुषार नातू यांचा कबुलीजबाब तसेच उघद उघड आणि अस्सल आत्मकथन असल्याचे प्रतिपादन केले.

      आपल्या पुस्तकाविषयीचे मनोगत सांगताना नातू म्हणाले की माणूस हा नेहमी आनंदाच्या शोधात असतो. जीवनाला कंटाळून जात तो स्वआनंदाच्या शोधात भटकत असतो. मला हा आनंद वयाच्या चौदाव्या वर्षी गवसला तो ब्राऊनशुगरच्या रुपात. मग पुढे सिगारेट,दारू,चरस,अफू,गांजा याचाही नाद त्यांना लागला. दारूचा पहिला प्याला, सिगरेटचा पहिला झुरका हा अंतर्मनाला विलक्षण आनंद देवून गेला. अनुभवाची गम्मत सांगताना कोटी करत म्हणले कि प्रत्येक व्यसनी माणसाचा पहिला अनुभव जो त्याला खूप ‘मस्त’ वाटतो, तो कायमचा त्याच्या मेंदूत सेव्ह होतो आणि त्याचा विचाराने तो पुढे अजूनच बिघडत जातो. दारू ही स्लो लोकल तर ड्रग्ज हि फास्ट लोकल आहे जी मृत्यूच्या स्टेशनवर नेवून पोहोचवते
.
      नातू यांनी पुढे दारु पिल्या नंतरचे पिणार्यावर होणारे परिणाम यासंदर्भातही माहिती दिली. दारू पिल्यानंतर माणसाचे मन अति संवेदनशील बनते, तरल होते तो मग स्वच्छंदी वागू लागतो कविता,गझल लिहू लागतो. माणूस असा भलेही कुणाला घाबरत असेल पण दारू चढल्यानंतर मात्र तो अतिशय धैर्यशाली होतो, अनेक ज्यांना आपल्या भावना व्यक्त करता येत नाही ते दारू पिऊन मुलींना लग्नाचे विचारतात. तरुणाई व्यसनाधीनतेकडे का झुकतेय याबद्दल बोलताना म्हणाले की कायद्यातली तरतूद जी आहे ती अतिशय कमी आहे बिअर पिण्याकरिता १८ वर्षे व दारू पिण्याकरिता २१ वर्षे हे चुकीचे असल्याचे सांगत कायद्यावर ताशेरे ओढले. भावनिक अस्वस्थेचे समाधान हे व्यसन नाही, व्यसनाधीनता हा मनोशारीरिक आजार आहे. व्यसन करणारे हे नेहमी व्यसन करण्याचे समर्थन करत राहतात. दारूचा पहिला परिणाम हा मेदूवर होत असतो, आपले लिव्हर फक्त १५एमएल अल्कोहोल पचवू शकते मात्र जनमानसात पसरलेल्या चूकीच्या समजूतीमुळे याला कन्निंग डिसीज किंवा डिसीज ऑफ इगो असे देखील म्हटले गेले आहे. या सर्व बाबी मांडताना नातू यांनी ब्राऊन शुगर घेण्याकरिता म्हणून आजारी आईच्या हातातल्या पातल्या कशा काढून घेतल्या, जन्मदात्या आईने त्यांच्यामुळे कसा आत्महत्येचा प्रयत्न केला हे देखील आठवण रूपाने सांगितले.
नातू यांनी या सर्व २५ वर्षाच्या व्यसन प्रवासातून कशी मुक्तत केली ,त्याकरिता नागपूरच्या ‘मैत्री’ संस्थेकडे घालवलेला काळ याचेही अनुभवकथन केले. आजहि मी सिगारेट ओढतो आणि त्या व्यसनातून मुक्त व्हायच्या प्रयत्नात आहे हे प्रांजळपणे काबुल केले.

आजच्या व्यसनाकडे झुकत चाललेल्या तरुणांना त्यांच्या वाममार्गापासून परावृत्त करण्याकरिता म्हणून आज मी येथे आपल्यासमोर आलो आहे अशी कळकळही बोलून दाखवली. तरुणांनी वेळीच सावध होत, भविष्यातील स्वतःचा आणि परिवाराचा नैतिक,सामाजिक आणि मानसिक छळ करून घेवू नये असे मला आज मनापासून वाटते असे बोलून त्यांनी विद्यार्थ्यांची रजा घेतली.


      विभागप्रमुख वृंदा भार्गवे यांनी तुषार नातू यांचे आभार मानले व उपस्थित  सर्वांनी ‘नशायात्रा’ पुस्तक घेण्याची वा भेट म्हणून देण्याचे आवाहन केले . 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडा २ रा - रोजच्या रोज करा सोशल मीडिया मार्केटिंग - कंटेट इज अ किंग

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

आपण ट्वीटर मॅडमला ओळखता का? - ब्लॉगमालिका