विशेष प्रतिनिधी, नाशिक
श्रावणमासी हर्ष मानसि हिरवळ दाटे चोहीकडे
क्षंणात येते सरसर शिरवे क्षंणात फिरुनि ऊन पडे
श्रावण महिना म्हटलं की बालकवींच्या वरील ओळी मनात गुंजू लागतात. श्रावण म्हणजे धुंद करणारे हिरवे वातावरण.श्रावण म्हणजे सार्या ऋतूंतले सळसळतेपण,चिंब चिंब पावसात भिजून जात, बेभान मन नाचत,गात असतं, श्रावणात धो-धो पाऊस पडल्याने वसुंधरेने जणू हिरवा शालूच परिधान केलाय एवढी ती मोहक होते, त्याचबरोबर श्रावण म्हटला की भूतकाळाच्या आठवांनी गहीवरायलाही होते.मग कुणा प्रियकराला त्याची प्रेयसी आठवू लागते, कुणी ज्येष्ठ नागरिक त्यांच्या तरुणपणीच्या,सहकार्यांच्या आठवणीत रंगून जात चहा-भजींचा आस्वाद घेतात. एकंदरीतच अवनीला ला फुटलेलं ते लावण्य असतं, जे तुम्हाला सुखावह वाटते, श्रावणात क्षणात पाऊस,क्षणात ऊन असते,त्यामुळे सरणारी प्रत्येक घटिका एक नवी प्रचीती येते, नेहमीपेक्षा वेगळे असे विश्व श्रावणात हा निसर्ग आपल्याला आनंदासवे दाखवत असतो. अगदी श्रावणातला प्रत्येक दिवस हा बहारदार होवूनच येतो. शहरात सहसा कमीच बघायला मिळणारा हा सृष्टीचा थाट पाहून अंगावर रोमांच उभा राहतो.एरव्हीचा शहरातला पाऊस म्हणजे चिखलाने माखलेले रस्ते, खड्डे जणू छोटेसे पाणतळे,मुसळधार पाऊसात जीवाच्या मुठीत छत्री अगदी घट्ट पकडून जाणारी शाळा-महाविद्यालयातली विद्यार्थी,नोकरदार, सार्यांची त्रेधातीरपिट उडवून देत जोरदार सरींसह मिळेल त्याला चिंब भिजवत राहतो असा हा श्रावणातला पाऊस. श्रावणातल्या या मोहिनी घालणाऱ्या हिरवळीलासुद्धा एक गर्द असा अपवादही आहे बरं का. अपवाद म्हटलं तर तसा श्रावणातली हिरवळ म्हणजे निसर्गाचे एक अद्वैतच परंतू अजुनही आपल्या शहरात अशी काही नयनरम्य आणि मानवनिर्मित ठिकाणे आहेत जिथे अशी हिरवळ आढळते अगदी वर्षातले बाराही महिने. मी बोलतोय ते शहरातील नावाजलेल्या एका शिक्षणसंस्थेच्या कॅम्पसविषयी, ‘गोखले एज्युकेशन सोसायटी’.
नाशकातील मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या कॉलेजरोडवरील गोखले एज्युकेशन सोसायटी हे शहराचे भूषणच म्हणावे लागेल. इथे साहित्यपर्वातले सितारे तर चमकलेच परंतु वर्षभर इथले वातावरण मनोहारी ठेवते ते पसरलेली हिरवळ. इथे असणार्या प्रमुख महाविद्यालांपैकी सर्वच महाविद्यालयांना विविध झाडांनी वेढलेला हा परिसर आहे. बी वाय के कॉलेज असो वा एच पी टी सगळीकडे सध्या आल्हाददायक वातावरण तयार झाले आहे, असे घडण्याला परिसरात लावलेल्या आणि कायम सदाहरीत राहणाऱ्या वृक्षांबरोबर स्वछ्तेचा ही मोठा वाटा आहे. बी वाय के महाविद्यालयाचे प्राचार्य कलाल हे महाविद्यालय आणि कॅम्पसच्या स्वच्छतेची काळजी घेत असल्याचे समजते. सकाळपासून कर्मचारी वर्ग वर्ग, मुख्य प्रवेशद्वार, इमारत झाडलोट करत स्वच्छ करतात. महाविद्यालात मधोमध असणार्या बागेची अत्यंत कौशल्यपूर्ण अशी निगा राखली जाते. सुट्टीच्या दिवशी गवताची कापणी करून तिला देखणे रूप दिले जाते . मुख्य इमारतीच्या आवारात असणाऱ्या झाडांनाही नियमित पाणी घातले जाते. अशी माहिती कलाल सर यांच्या सुत्रांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.
विद्यार्थ्यांना मोकळी हवा मिळावी आणि अभ्यासाचा उत्साह वाढवा याकरिता कॉलेज प्रशासन प्रयत्नशील असते. विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी मिळावे याकरिता महाविद्यालयाच्या आवारात असणार्या अभ्यासिके शेजारीच पाण्याचे नळ आहेत तिथे कूलरद्वारे स्वच्छ पाण्याची व्यवस्थाही केली आहे. या कूलरचीही स्वच्छता ही तद्ण्यामार्फात केली जाते. रोगराई तसेच कीटक आणि डांस यांचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता नियमित किटकनाशके फवारली जातात, त्यामुळे या महाविद्यालयाच्या परिसरात कुठेही अस्वच्छता आढळून येत नाही, अगदी कागदांचे तुकडेही कुणी इतरत्र टाकत नाही अशी शिस्तच प्राचार्यांनी सर्वांच्या अंगी भिनवली आहे. विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे महत्व जाणावे याकरिता महाविद्यालयातर्फे स्वच्छता सप्ताह राबविण्यात येतो. याकरिता एन एस एस शिबिराकरिता विद्यार्थी आणि शिक्षकवृंद जवळील एका खेडेगावाला भेट देतात, आठ दिवसांच्या शिबिरात विद्यार्थी श्रमदानातून गाव स्वच्छ करणे,आरोग्य सेवा पुरविणे, स्वच्छतेचे महत्त्वाविषयी, आजारांविषयी गावात जनजागृती करतात याकरिता पथनाटकेही सादर केली जातात.
या महविद्यालयाच्या बाबतीत एक आठवण सांगताना एका माजी विद्यार्थ्याने सांगितले की, या इथे कार्यालयाच्या बाहेर एक कुत्री नेहमी घुटमळत असायची, कलाल सरांना तिच्यावर फार लोभ होता, तिला आसपास फिरताना बघणे त्यांना अतिशय आवडत असे, परंतू फिरून,लोळून ती कुत्री मातीने मळाली होती म्हणून कॉलेजच्या एका शिपायाच्या मदतीने बागेत पाणी मारण्याची नळी घेत त्या कुत्रीला यथेच्छ धुवून काढले, श्वानांना पाणी आवडत नाही ,त्यामुळे कुत्री घाबरली पण तरीही सरांनी तिला धुवायलाच सांगितले. नुकतेच या महाविद्यालयात नव्याने शौचालये बांधण्यात आली आहेत. दर आठवड्याला या शौचालयांची आधुनिक साधनांनी स्वच्छता केली जाते. कुठल्याही प्रकारची नासधूस आणि अस्वच्छता होऊ नये याकरिता ती सुट्टीच्या दिवशी बंद ठेवली जातात. खरंच हे जे काय आपण जगतोय, उपभोगतोय ते सर्व निसर्गाचं लेणं आहे आणि ते येणाऱ्या पुढच्या पिढीला देणं आहे, या महाविद्यालयाकडून शिकून घेत जर आपण शहरांचीही अशीच स्वच्छता आणि सुव्यवस्था राखली तर निसर्गदेवता प्रसन्न राहील आणि दोन्ही हातांनी भरभरून देईल.
आवारात असलेल्या एच पी टी महाविद्यालयाला भलामोठा इतिहास लाभला आहे, तो इतिहास इथल्या भिंतीमधून आजही साहित्यिकांचे गोडवे गात असतो. हा इतिहास पुढील सर्व पिढ्यांना सदाहरीत राहायला शिकवणारा आहे, नव नवे साहित्य्तुरे नाशिक शहराच्या शिरपेचात खोवणार आहे. असा हा देवदत्त वारसा मिळालेलं नाशकातले सगळ्यांत जुने व प्रथम महाविद्यालय एच पी टी महाविद्यालय. एच पी टी आणि आर वाय के महाविद्यालयेही स्वच्छतेबाबत आग्रही असल्याचे कळते. सुत्रांना मिळालेल्या माहितीनुसार येथील बोटनीकल गार्डन येथे जगभरात आढळणाऱ्या विविध आणि दुर्मिळ वनस्पती आहे तसेच मुख्य इमारत ,अभ्यासिका, कार्यालय आणि नवीन इमारत या वास्तुंच्या चारही बाजूंना झाडे आणि वेलींनी वेढा घातलाय, परिसराच्या मधोमध इतिहासाची साक्ष देत एक डेरेदार वटवृक्ष आजही दिमाखात उभा आहे. या कॅम्पसमध्येसुद्धा स्वच्छता कर्मचारी अगदी तळमळीने परिसर लखलखित ठेवत असतात . शौचालयांच्या स्वच्छतेबद्दल थोडीशी नाराजी येथील विद्यार्थ्यांमध्ये आढळून आली.
याच शिक्षणसंस्थेच्या प्रांगणात आपल्या आगळ्यावेगळ्या अस्तित्वाने नाविन्यपूर्ण आणि रोजगारभिमुख शिक्षण देणारे आणखीन एक महाविद्यालय आहे स्वच्छतेच्या बाबतीत त्याचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो ते एच पी टी महाविद्यालयातील जनसंपर्क आणि पत्रकारिता विभागाचा. इथली स्वच्छतादेखील वाखाणण्याजोगी आहे. एच पी टी महाविद्यालात कुणीही पाहुणे उपस्थित राहिल्यास ते या विभागाला आवर्जून भेट देतात, त्यांचे हिरवेगार स्वागत करण्याची जबाबदारी या विभागाची असते. विभागप्रमुख वृंदा भार्गवे या स्वच्छतेची वैक्याक्तिक काळजी घेतात. इथला कर्मचारी योगेश सकाळी सर्वांच्या आधी येवून अंगनाची झाडलोट करत स्वच्छता करून घेतो. विद्यार्थीही स्वच्छतेच्या बाबतीत उदासीन नसल्याचे समजले.
पुढील जे महाविद्यालय आपण पाहणार आहोत ती तर हिरवळीने कायम झुलणारी आणि झुलवणारी एक बागचं आहे, याच सोसायटीचे परंतु थोडासा वेगळा आब राखून असणारे महाविद्यालय म्हणजे एस एम आर के महिला महाविद्यालय. अगदी दुरून जरी बघितलं तरी नजर जाईल तिथवर यांनी वृक्ष लागवड केली आहे. नानाविविध वृक्षांनी हा परिसर सजवला आहे. दरवर्षी मुली प्रचंड उत्साहाने आपले महाविद्यालय स्वच्छ कसे राहील याकरिता श्रम घेताना दिसतात. येथेही कर्मचारीवर्ग सकाळपासून आवर लख्ख ठेवाण्याकीता प्रयत्नशील असतो.वृक्षांची वाढ नियमित राहून बाग देखणी कशी राहील याची विशेष काळजी घेतली जाते.
बी वाय के महाविद्यालात शिकलेला विशाल त्याच्या कवितेत प्रेयसीला प्रेमळ साद घालताना दाखलादेखल म्हणतो श्रावणाचा बहर आला फुलुन आली ही धरीणी ,फाटले आभाळ आता, तू सरी होऊन ये ना. नाशिक शहरात असे आगळेवेगळे कवींचे जग निर्माण व्हायला हा कॅम्पस आणि इथले हिरवे कुंद वातावरणचं कारणीभूत असेल, नाही ?
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा