पोस्ट्स

विशेष वाचनीय

“म्युच्युअल फंडातून करोडपती होता येतं? जाणून घ्या खरं Wealth Management!”

इमेज
म्युच्युअल फंडातून Wealth Management शक्य आहे का? हो—आणि कसं? “तुम्ही पैसे साठवताय… की खरोखर वाढवताय? आज घेतलेला छोटा गुंतवणुकीचा निर्णय उद्या तुमचं संपूर्ण आर्थिक भविष्य बदलू शकतो.” “मी, विशाल लोणारी (NISM CERTIFIED) – VHN FINSERV च्या माध्यमातून गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शन करत आहे.” मानवी जीवन शतकानुशतके बदलत गेले आहे. उत्क्रांत आणि आधुनिक होत चालले आहे. जगण्यात बदल होत गेले तशा मानवाच्या गरजाही बदलत चालल्या आहेत. गरजा बदलल्यामुळे खर्च आणि संपत्ती दोन्हींमध्येही वाढ करणे हीच मोठी मानवी गरज बनली आहे. त्यामुळे आता संपत्ती निर्माण करावयाची झाल्यास नव्या जमान्याच्या नव्या जोमाने ती निर्माण करावी लागणार आहे. त्यासाठी एक ताकदवान माध्यम म्हणून Mutual Fund आपल्या समोर येत आहे. आजच्या काळात म्युच्युअल फंडामध्ये एवढी ताकद आहे की, तुमचे बदलतं जीवनमान सुरू राहताना महागाईसोबत लढाई करताना Wealth Management करण्यात प्रभावी पर्याय म्हणजे Mutual Fund. VHN FINSERV च्या माध्यमातून आणि विशाल लोणारी ( NISM CERTIFIED) यांच्या मार्गदर्शनात म्युच्युअल फंडात योग्य पोर्टफोलिओ तयार करून श्रीमंतीसह ...

माझं पत्र

News : पोटनिवडणुकीचे सर्वच पक्षांना धडे https://www.loksatta.com/lokmanas-news/loksatta-readers-letter-part-195-1690825/

समीरची फॉरेन नोकरी आणि लिलावती अध्यक्ष

नळावर चाळीतल्या बायका पाणी भरायला आल्या होत्या. प्रसन्न सकाळी नळावर मात्र पाणी भरायची चढाओढ सुरू झाली.  अंजली पुढे तिच्या मागे लता, मग मोहन, भानू असे ओळीने पाणी भरायला आल...

हे जीवन सुंदर आहे

नाशिक - काय सुरूवात करू ? बोलण्यासारखा विषय आहे मात्र त्याच्यात आशय इतका खोल आहे, त्याची घट्टसर बांधणी व्हायला हवी असे आवर्जून वाटते. यामुळेच आजचा मला आलेला अनुभव कसा कथन क...

मीना - एक जिद्द

इमेज
मैदानावर खेळाचे प्रशिक्षक खेळाडूंकडून धावण्याचा सराव करुन घेत होते. अनेक खेळाडू यंदा आंतरशालेय क्रीडा महोत्सवासाठी प्राण पणाला लावून तयारी करत होते. दरवर्षी भरत आलेल्या या महोत्सवात शहरातील सर्व नामांकित शाळांचा सहभाग असे. ज्या शाळेचा गौरव होई, त्यांना राज्यस्तरावर जाण्याची संधी मिळत होती. याचमुळे यंदा विद्यानिकेतन विद्यालयाने आपल्या विद्यार्थ्यांमधून सर्वोत्तम खेळाडूंना खेळण्यासाठी प्रेरित केले होते. स्पर्धेत बाजी मारण्याच्या उद्देशाने त्यांच्याकडून कसून सराव करून घेतला जात होता. या खेळांमध्ये पळणे, तीन पायांची शर्यत, लंगडी, गोळाफेक, थाळीफेक आणि क्रिकेटचा समावेश होता. अभ्यासात कधीही मागे न राहिलेल्या विद्यानिकेतन विद्यालयाला यंदा आपण खेळातही अव्वल आहोत याची सिद्धता करून द्यायची होती. यासाठी शाळेतील क्रीडा शिक्षक श्री. मंदार गोळेसर  हे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत होते. मंदार, हेदेखील उत्तम धावपटू आणि फलंदाज होते. धावपटू असल्याने मैदानी कवायतींत त्यांचे प्राविण्य होतेच. यामुळे आपल्या शाळेलाही राज्यस्तराच्या स्पर्धेत खेळवण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनीही अपार मेहनत घेण्याचे ठरवल...

मागे वळून बघताना

इमेज
मागे वळून बघताना  वाटून गेलं तिने मागे बघितलं तर तिने मागे बघितलं तर  आठवेल तिला काय भावनांची घुसमट, विचारांची फरफट स्वाभिमानाचा गुंडाळलेला गाशा फुटू न दिलेला आवाज आणि बरंच काही तिने मागे वळून बघितलं तर  तिला काय आठवेल तिच्यासारख्या कहाण्या हातात घेऊन तलवार, हातात घेऊन लेखणी तिच्यासाठी त्वेषाने पेटून जिद्दीने लढलेल्यांच्या कहाणी अन, त्यांना वंदन करून अन्याय सहन करून दमलेला तिचा स्वतःसाठीचा विचार तिने मागे वळून बघितलं तर  तिला आठवेल  तिची विचित्र अवस्था, तिचं चुरडलेलं मन, अन चोरटे काटेरी स्पर्श तिला आठवत राहील निथळलेलं रक्त कित्येकांच्या जखमांवरचं तिने मागे वळून बघितलं तर  तिला आठवत राहील  वेलीवरील खुडलेल्या कळ्या उमलण्याआधीच करकच्चून बांधलेलं तिला मोकळा श्वास घेण्याआधीच तिने मागे वळून बघितलं तर ती फुत्कारून उठेल,  याआधी न उठवलेले शेकडो हुंकार तिला आठवेल पुस्तकांची थप्पी अन तिच्या लेखनावर केलं गेलेलं तिचं खच्चीकरण तिने मागे वळून बघितलं तर आठवेल फक्त कापसाची वात सगळं तेल पिळवटून काढलेली विझवून टाकलेली विशू

बसस्टॉप-प्रिक्वेल

स्वतःच्या हाताने धुतलेल्या शुभ्र सूटमध्ये तू बसस्टॉपवर यायचीस. मी हसून तुझं स्वागत करायचो. तू ही मला हसून मला उत्तर देत होतीस. मग, ती ही यायची ? आता, ती कोण ? आपल्या दोघांचीही बस. मग दोघेही बसमध्ये चढायचो. तू माझ्या शेजारी बसत असशील ? नाही, मी तुझ्यापासून लांब बसायचो. तुला चोरुन बघण्यासाठी. जेव्हा तू मोकळे सोडलेले केस, दोन्ही हात वर करुन सावरुन बांधायचीस, मी मागून बघायचो." तत्क्षणी रोज नव्याने तुझ्या प्रेमात पडायचो... कधी तुझ्याशी फार बोलायचो नाही, पण तरीही तू आवडत होतीस. तुझा फोटो फेसबुक, व्हॉट्सअप वर बघूनच समाधान मानत होतो. कधी माझी हिंमत झाली नाही, तू अगं ए अशी हाक मारण्याची, मी धाडस केले नाही. पण, मग नंतर पुढाकार कधी तू घ्यायची, कधी मी घ्यायचो अन आपण एकमेकांशी बोलायचो, त्यावेळी वाटलं आधीच मी लाजलो नसतो तर, कदाचित आपण आतापर्यंत खूप काही बोलू शकलो असतो. खरं तर तू योग्य वेळेची वाट पाहत, थांबला असणार. दिवस तसे सुखात सरत होते, आपली रोज भेट होत होती, आपण रोज कामानिमित्त बोलत होतो, सगळं मजेतच सुरु होते. पण अवचित एक वळण आलं, अन आपलं आयुष्यच एकदा वळून गेलं. निघून गेलो दोन ध्रुवावर, दोघ...

स्व-सोबत

माणूस स्वतः स्वतःच्या सोबत असतो का ? किती वेळ असतो ? माणसाने स्वतःच्या सोबत वेळ घालवावा का ? जर हो तर किती, नाही तर का नाही ? मेंदूला जड वाटणारे हे सगळे प्रश्न आहेत, याची उत्तरे म...