विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...

बसस्टॉप-प्रिक्वेल

स्वतःच्या हाताने धुतलेल्या शुभ्र सूटमध्ये तू बसस्टॉपवर यायचीस. मी हसून तुझं स्वागत करायचो. तू ही मला हसून मला उत्तर देत होतीस. मग, ती ही यायची ?

आता, ती कोण ?

आपल्या दोघांचीही बस. मग दोघेही बसमध्ये चढायचो.

तू माझ्या शेजारी बसत असशील ?

नाही, मी तुझ्यापासून लांब बसायचो. तुला चोरुन बघण्यासाठी. जेव्हा तू मोकळे सोडलेले केस, दोन्ही हात वर करुन सावरुन बांधायचीस, मी मागून बघायचो." तत्क्षणी रोज नव्याने तुझ्या प्रेमात पडायचो...

कधी तुझ्याशी फार बोलायचो नाही, पण तरीही तू आवडत होतीस. तुझा फोटो फेसबुक, व्हॉट्सअप वर बघूनच समाधान मानत होतो. कधी माझी हिंमत झाली नाही, तू अगं ए अशी हाक मारण्याची, मी धाडस केले नाही. पण, मग नंतर पुढाकार कधी तू घ्यायची, कधी मी घ्यायचो अन आपण एकमेकांशी बोलायचो, त्यावेळी वाटलं आधीच मी लाजलो नसतो तर, कदाचित आपण आतापर्यंत खूप काही बोलू शकलो असतो.

खरं तर तू योग्य वेळेची वाट पाहत, थांबला असणार.

दिवस तसे सुखात सरत होते, आपली रोज भेट होत होती, आपण रोज कामानिमित्त बोलत होतो, सगळं मजेतच सुरु होते. पण अवचित एक वळण आलं, अन आपलं आयुष्यच एकदा वळून गेलं.

निघून गेलो दोन ध्रुवावर, दोघे आपण, क्षणात इथे तिथे..माझ्यापुढे पडला फक्त अंधार, तू अज्ञात होतीस माझ्या तुझ्या ओढीसाठी, म्हणूनच तू हसत होतीस. निस्तेज चेहऱ्याने बघायला तुला, मी पूर्वीपेक्षाही अधिक घाबरत होतो....

दुरावा, प्रत्येक नात्यात येतोच, त्यात अपराधीपणाची भावना काय कामाची ? मग पुढे काय झाले ?

पुढे तुच झाली, अन माझा रंग उडालेल्या चेहेऱ्यावर आशेची लकेर बनून गेलीस. मी तुला मिळवलं होतं, दोन जीव आपले, एक झाले होते. मला ज्याची कल्पनाही ही करवली नव्हती तो प्रेमाचा अविष्कार बनून तू माझ्या जीवनात आली होतीस, मग त्यापुढे आयुष्यभर हे साखरस्वप्न आपण दोघेही जगलो.

तुला, हा बसस्टॉप तरी आठवतो का गं ? इथं बसून आपण खूप गप्पा मारायचो,  तू नसायची तेव्हा तुझ्यासाठी इथे बसून मी कविता लिहायचो. वाफाळलेला चहा आपण दोघेही, फुंकत फुंकत प्यायचो, तू माझ्यासाठी बनवून आणलेला तो गोड शिरा मी खायचो, अन एकदा तर तू खांद्यावर डोकं टेकवून मुळूमुळू रडली होतीस, याच बसस्टॉपवर मी तुझ्या मांडीवर डोकं टेकवून झोपलोही होतो

नाही, माझ्या आयुष्यातील पहिली २० वर्षे सोडली तर, मला बाकी काही आठवत नाही, तुम्हाला मला नेणारी बस नाही, की भेटवणारी बसही नाही. चला, आता आपण जाऊ या इथून.........


बसस्टॉप- प्रिक्वेल

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडा २ रा - रोजच्या रोज करा सोशल मीडिया मार्केटिंग - कंटेट इज अ किंग

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

आपण ट्वीटर मॅडमला ओळखता का? - ब्लॉगमालिका