मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

this blog is dedicated to work of my passion. I want to speak, write, displays my creativity, I want to tell the world few words about me, so I created this blog. It has some affilate connections also, that gives me little bit pleasure of selling also, I educate from here by sharing knowledge to the people. I welcome to all my readers, followers, admirer, thanks to all who loves me. I will be updating this blog in each month with full of new things, based on happenings, politics, and many more.
नाशिक -
काय सुरूवात करू ? बोलण्यासारखा विषय आहे मात्र त्याच्यात आशय इतका खोल आहे, त्याची घट्टसर बांधणी व्हायला हवी असे आवर्जून वाटते. यामुळेच आजचा मला आलेला अनुभव कसा कथन करावा याबद्दल मनात भीती आहे. थोडक्यात बात जोश मै केहनेकी नही, होश संभालके बताने की है। असो, मी थेट मुख्य मुद्द्याला हात घालून टाकतो. या प्रस्तावनेची औपचारिकता आवारती घेतो. ही गोष्ट नाशिकच्या मखमलाबादमधील आहे. घराबाहेर पडून नुसतंच हिंडून काहीतरी उगाच शोधत बसण्याची एकटी वेळ आठवड्यातून एक दोनदा तरी येते. कधीकधी मीच माझ्यावर तशी वेळ आणतो. कुठल्यातरी हुरहूरीला मनात घेऊन, शोधायला निघतो, काय शोधायचं आहे, याचं उत्तर स्वतःकडेही नसते.
आज असाच भटकत असताना, बराच वेळ उगाच हुंदडत बसलो. हाती ठोस काही लागलं नव्हतं, की डोळ्यांना वेगळं काही दिसलं नव्हतं. कुठेतरी मलाच मी सापडलो नव्हतो की दुसरं कुणी माझ्या टप्प्यात आले होतं. फिरायचं तरी किती, कुठे या प्रश्नांची उत्तरं कधीतरी संपतात. अशी उत्तरे संपली आणि मी पुन्हा त्याच माझ्या घराकडे जायला वळालो. त्यावेळी नेमकं काहीतरी इब्लिस चमकून गेलं. नेहमीपेक्षा वेगळं फार असे नव्हते, तरी कोण्या ओढीने मी त्याजागी गेलो. थबकलो.
काही असे खूप वेगळं नव्हतंच. विचार, विषय, विकार यांनी पोखरून नव्हे तर पुढारून गेलेल्याला आकृष्ट करणारे अजून काय असू शकणार होते ? 'जिलेबीवाला' होता.
गोड काही खायचं म्हटलं की ते माझ्यासाठी नाविन्यपूर्णच ठरते. तिथं होता एक आचारी बाप, त्याचं अठरा-एकोणीस वर्षाचे कोवळे पोरगं. फँड्रीतला जब्या दिसतो ना अगदी तसाच. तिथं गुळाची जिलेबी, साखरेची जिलेबी, गुलाबजाम चाखली. यासाठी मला पिझ्याच्या एका तुकड्यापेक्षाही कमी खर्च द्यावा लागला. गुळाची जिलेबी ही चवीला अफलातून असते. त्याची सर कशालाच येऊ शकत नाही. ती एक मधुसर अशी अनुभूती आहे. अगदी प्रांजळपणे मी हे कबूल करतो. तुमच्या जिभेवरचा तो घास, त्याची गुळमटता बराच वेळ घोळवत राहाविशी वाटते. बेफाम, अचाट आपण काहीसं न भूतो न भविष्यती शोधत असताना, याआधी चाखलेलीच एखादी गोष्ट अनाहूतपणे आपल्याला काहीशी, नाही बरीचशी वेगळी अनुभूती देऊन गेली. या विचारानेही माझं मन-मेंदू असख्लीत सुखात तरंगून गेले.
परंतु, न भूतो भविष्यती असे काहीतरी दिसायचं बाकी होतंच, ते यानंतरच्या पुढच्या क्षणाला मला कळून आले. एक इंडिका माझ्यापुढे येऊन थांबली. त्यातून एक गृहस्थ बाहेर आले, उतरल्या उतरल्या त्यांनी पंधरा किलो जिलेबी, दोन शेकडा गुलाबजामची ऑर्डर सोडली. कुठल्यातरी शाळेतील मुलांना हा खाऊ वाटण्यात येणार होता. ही काय फार कौतुक करण्याजोगी गोष्ट नाही. चार पैसे जास्त कमावणाऱ्याने असे भरभरून दान केलं तर त्यात काही बिघडत नाही. मात्र मित्रांनो खरा धक्का तर मी पुढं देणार आहे.
तो भला माणूस कोण होता, हे मला माहीत नाही. मी जे पाहिलं ते म्हणजे त्याला उजवा हातच नव्हता. (आता वर जाऊन तो माणूस कसा माझ्यासमोर आला, हे पुन्हा वाचा) ऑर्डर आणि एक प्लेट जिलेबी खाऊन जेव्हा तो इंडिकाचे दार उघडून, गाडीला सेल मारून, गाडी घेऊन निघूनही गेला. मी बधिरसारखा त्या इंडिकाकडे बघत राहिलो. त्याच वयही चाळीशीच्या पुढे दिसत होते. मी सुन्न, बधीर झाल्यासारखा तिथं उभा राहिलो, जीभेवरचा घास घोळवत. पण दोन क्षणात कोणत्याही विद्यापीठात शिकायला भेटणार नाही, असे काहीतरी शिकवून तो माणूस केव्हाच निघून गेला होता.
अरे, तुम्ही उगाच भावूक व्हायची गरज नाही. चला प्रार्थनेची, जेवणाची, शुभ कार्याची, लिहिण्याची, वेळ झाली असेल ना, उजवा हात धुवून या. हो, लक्षात घ्या हं घाईघाईत लिंबू मिर्ची ओलांडून जाल चिरडून तर अपशकुन व्हायचा !
नशीब नावाची गोष्ट असेल नसेल प्रत्येकाकडे स्वतःकेंद्रीत शक्तीबिंदू आहे.फक्त तो प्रज्वलित करायला पाहिजे. ते एकदा झालं की एवढ्याशा कारणावरून जीवन संपवावे असे काहीच घडत नाही.
तो जिलेबीवला आचारी काय, तो सद्गृहस्थ काय, शेवटी ' हे जीवन सुंदर आहे' या ओळीचीच आठवण देऊन गेले.
©विशाल लोणारी, २०१८
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा