विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...

समीरची फॉरेन नोकरी आणि लिलावती अध्यक्ष

नळावर चाळीतल्या बायका पाणी भरायला आल्या होत्या. प्रसन्न सकाळी नळावर मात्र पाणी भरायची चढाओढ सुरू झाली.  अंजली पुढे तिच्या मागे लता, मग मोहन, भानू असे ओळीने पाणी भरायला आलेत, मोहन आणि भानू गप्पांत दंग होते. आपले मालक खुश असल्याने भानूच्या आनंदलाही पारावर उरला नव्हता.  तेवढ्यात तिथे समीर आणि लिलावती पाणी भरायला आले. समीर खुशीने भानूच्या मागे पाणी भरायला उभा राहिला मात्र लिलावतीला जावयाच्या मागे उभं राहणं तितकंसं पसंत पडलं नाही.  म्हणून ती पुढं जाण्यासाठी तगादा लावू लागली. भानू आणि तिच्यात शाब्दिक चकमकी सुरू झाल्या.  मोहन बिचारा सासूबाईंचे ऐका म्हणून भानूला विणवू लागला.  मात्र ह्या वादावर चाळीचा अध्यक्ष या नात्याने समीरने लिलावतीला नियमाप्रमाणे मागेच उभे राहायला भाग पाडले. भानूवर मस्त इंप्रेशन पाडल्याचे त्याला समाधान मिळाले.
दात ओठ खात लिलावती उभी राहिली तेव्हा तर भानूही लिलावतीला खुन्नस देऊन बघत होती.

मोहन आवरून ऑफिसला जायला निघाला. तर शोभाही भाजी घेण्यासाठी चाळीच्या अंगणात आली.  त्याचवेळी समीर धावत मोहन मोहन असा ओरडत आला.  त्याला आनंदाच्या उकळ्या फुटलेल्या होत्या. हातात मोबाईल घेऊन येत तो नाचायलाच लागला  तेव्हा सगळी चाळ कुतूहलाने गोळा झाली.

आपल्याला एका प्लेसमेंट कंपनीने मलेशियाच्या ऑफिसमध्ये मोठ्या पगाराची नोकरी मिळाल्याचे कळवलं आहे. असे सांगणारा फोन येऊन गेल्याचे त्याने उत्साहाच्या भरात सगळ्यांना सांगितले. त्यामुळे तो मलेशियाला जाण्याच्या तयारीला लागल्याचे त्याच्या तोंडून बाहेर पडले. तेव्हा त्याचा उत्साह ओसरल्यावर मोहनने त्याला समजावण्याचा प्रयत्न सुरू केला. अशा कॉलवर डोळे झाकून विश्वास ठेवू नकोस. नीट चौकशी कर, विचार कर, घाई घाईत निर्णय घेऊ नकोस असे बोलू लागला. पण मोहनला मित्राची प्रगती बघवत नाही त्यामुळे आपल्यावर जळून आपल्याला मागे खेचू पाहतोय असे समीरला वाटून गेले. त्याबद्दल त्याने मोहनकडे तक्रारीचा सूर लावला. तो राग विरल्यानंतर मात्र  समीरपुढे मोठा प्रश्न आला तो म्हणजे त्याच्या अनुपस्थितीत "चाळीचा प्रभारी अध्यक्ष कोण"  या प्रश्नाच्या तोडग्यासाठी त्याने संध्याकाळी मीटिंग घ्यायचं ठरवलं.

संध्याकाळी मोहन बुटीकमधून आल्यावर शोभाला भेटला. तेव्हा तिने नेहमीप्रमाणे जिभेचा पट्टा सुरू केला. समीरकडे बघा कशी त्याची प्रगती झाली. मलेशियाची ऑफर त्याला आली, नाहीतर तुम्ही एका ठिकाणी आहेत तिथेच, पगारही तुटपुंजा इत्यादी रीतसर पाणउतारा केला. त्यानंतर सगळे चाळीच्या मीटिंगला जातात.
मीटिंगमध्ये  समीर सगळ्यांना त्याच्या मलेशियाच्या नोकरीची आनंदवार्ता सांगतो. चाळीचा हंगामी अध्यक्ष कोण असेल यासाठी आजची मीटिंग बोलावल्याचे त्याने सांगितलं. कुणाला इच्छा आहे ते सांगा. नवीन अध्यक्षाला त्याची नवीन नियमावलीप्रमाणे चाळीचा कारभार हाकता येईल असे तो सांगतो. या महिन्याचा मेंटेनेन्स येणे असल्याचेही तो स्पष्ट करतो. हे सगळं ऐकून चाळीतील इतर लोक नको ती समाजसेवेची काम म्हणून नकार देतात. पण लिलावती मात्र समीरला होकार कळवते. भानू आणि मोहनला छळण्याचा गोल्डन चान्स तिला सोडायचा नसतो. समीरही या गोष्टीला होकार देतो.

दुसऱ्या दिवशी सकाळी लिलावती उठून पाणी भरायला आली. तेव्हाही मोठी रांग लागलेलीच होती. पण चाळीतल्या सगळ्या शेजाऱ्यांना मागे काढून लिलावती पुढे गेली. सगळ्यांनी अशा वागण्याचा तिला जाब विचारायला सुरूवात केली. मात्र यावेळी ती अध्यक्ष असल्याने तिला हवं तसे ती वागू शकते. असे जाहीर केले. इतर सगळ्यांना मागे करत लिलावती तोरा दाखवू लागली. लिलावतीच्या वागण्या, राहण्यात कमालीचा बदल झाला. चाळीतले सगळ्या शेजाऱ्यांना तिने एकत्र गाठत नवीन नियमावली सांगायला सुरूवात केली. त्यानुसार चाळीच्या अंगणात मुलांना खेळायला तिने बंदी घातली. पाणी भरायलासुद्धा तिलाच प्राधान्य द्यायचं असे सांगितले.

त्यानंतर भानूलाही नवीन नियम सांगायला ती वरती गेली. त्यावेळी मोहन आणि भानू एकत्रपणे पंखा पुसायचे काम करत होते. त्यावेळी लिलावतीने भानूला त्रास देण्याचं निश्चित केले. तेव्हा वरती जाऊन आता सलग तीन दिवस खालीच काम करायला सांगितले. मोहनला मात्र खालच्या घरी यायला पण बंदी घातली. तर वरच्या घरातल्या कामांना भानूची मदत न घेण्याचं मोहनला बजावलं. मोहनला हिरमुसल्यासारखं झालेलं बघून भानू जादू करून तिला त्रास देणार होती, पण मोहनने तिला समजवल्याने ती शांत बसली. शोभाचेही कान भरायला ती विसरत नाही. दोघांची खोड मोडून काढायचं ठरवलं असल्याचे सांगते. मास्तरड्या, खोटा आहे असे बोलते, शोभा मात्र याला काही दाद देत नाही.

तर, चाळीत मात्र लिलावती मावशीचा भाव एकदम वधारतो. तिच्या झकपक राहण्याची हौसही ती पूर्ण करायला लागते. चाळीतील शेजारी तिला खुश करायचे म्हणून वेगवेगळ्या क्लुप्त्या शोधून काढतात. मावशींची मर्जी जर त्यांच्यावर झाली तर भानूकडून त्यांना घरची कामे करून घेता येणार होती, म्हणून महिला वर्ग मावशींची दिलजमाई करू लागतो. तर पुरुष मंडळी काही ना काही बहाणा करत भानूला बघता आणि भेटता यावं म्हणून लिलावतीच्या घरी जा-ये सुरू करतात. शोभालाही आईला होणारा आनंद बघून हायसे वाटत असते.
लिलावती भानूला घर साफ करायला लावते, तर मुद्दामहून तिला त्या कामात सतत कुरबुर करू लागते. तेव्हा भानूही लिलावतीला झाडूचा प्रसाद खाऊ घालते, बेडवर बसलेली असताना पायाला झाडू पायावरून घासते. माळ्यावर ठेवलेली भांडी भानुकडून काढून घ्यायची असतात, तेव्हा तिला स्टुलावर चढवते. माळ्यावर खूप धूळ असल्याने तिचा त्रास भानूला होईल असे तिला करायचे असते मात्र भानू परी असल्याने तिला त्रास होतच नाही, उलट तीच धूळ खाली झटकून लिलावतीलाच त्याची एलर्जी होते. तेव्हा भानू तिला आराम करायला सांगते. काढा बनवते, तो तिच्या साडीवर सांडवून देते, त्यामुळे लिलावतीला माळ्यावरची भांडी काढणे चांगलेच महागात पडते. धुळीच्या एलर्जीने शिंका येऊन येऊन तिचे नाक लाल होते. किती काहीही झाले तरी ती धूळ परीने झटकलेली असते. तेव्हा भानू आणि लिलावतीत चांगलीच बाचाबाची होते. तेव्हा लिलावतीला मोहिनीची आठवण येते, तिने फसवल्याबद्दल तिला अजूनही रुखरुख लागलेली असते. भानू तिच्या कानात कानठळ्या बसतील पण बाहेर आवाज जाणार नाही इतक्या जोराने भांडे घासायला धुवायला लागते. तेव्हा लिलावती भानूला चाळीतून काढण्याची मस्त योजना आखते.
धावा, धावा, वाचवा असे ओरडत घराबाहेर येते. तिच्या मागे मागे भानूही येते. भानू आपल्याला मारायला बघतेय भांडी वाजवून बहिरे करायला बघते, भांडी पायावर आपटून अधू करायला बघतेय, उकळता काढा देऊन जीभ पोळवली, तिच्यापासून चाळीलाच धोका असल्याचे चाळीतील सगळ्यांना सांगते, तिला काढा असे सांगते. पण, शोभा मात्र लिलावतीचा हा प्रस्ताव धुडकावून लावते. भानू चेटकीण असल्याचा खोटा प्रयत्न आहे असे सांगून तिला पुन्हा वरच्या घरी घेऊन जाते. भानू आनंदी होऊन घरी जाते. तर आपली आयडिया फोल ठरल्याने लिलावती आणखीनच त्रागा करून चिडते.

मोहन आणि भानू पुन्हा गप्पा मारू लागतात. मालकांना ती लिलावतीच्या लीला ऐकवते. लिलावतीला धडा शिकवणारच असा पक्का निर्धार बोलून दाखवते. मात्र, मोहन लिलावतीला असे त्रास देणे बरोबर नाही, शोभाला कळलं तर तिला खूप त्रास होईल असे म्हणून तिची समजूत काढतो. भानूही त्याला लिलावतीला माफ केल्याचे सांगते.

तिसऱ्या दिवशी मग भानू पुन्हा लिलावतीकडे कामाला जातेच. तेव्हा लिलावती तिला घाबरून कोणतेच काम सांगत नाही. पण भानू लादी पुसते असे म्हणून कामाला लागते. तेव्हा लादिवरून पाय घसरून लिलावती पडते. सकाळी सगळेच कामाला गेले असल्याने तिची दवा पाणी करायला गेल्याने फार कुणी जमतच नाही. महिला मंडळ येऊन अनेक प्रकारचे सल्ले मात्र लिलावतीला देते. आमचे एक नातेवाईक असेच पाय घसरून पडले तर मार मेंदूपर्यंत गेल्याने वारले, आता कसे मावशीला वॉकर, किंवा काठी आणायला लागेल अशा लिलावतीला घाबरवून सोडणाऱ्या चर्चा करत बसतात. तर शोभा मात्र लिलावतीला तिच्या धांदरटपणाबद्दल सुनावते. लिलावतीही या संधीचा फायदा उचलून कॉटवरच नाष्टा आणा म्हणून मागे लागते. तेव्हा ती जे पण खाते तिच्या कानातून फक्त धुरच यायला लागतो. तिला सगळंच तिखट लागायला सुरुवात होते. चाळीतले लोकांना लिलावतीला गुलाबजाम खायचे आहेत म्हणून असे नाटक करत असल्याचे समजतात. तेव्हा त्यांना गुलाबजाम खायला आणतात मात्र ते पण तिला गोडच लागत नाही. यामुळे पुरुष शेजारी पण नाराज होतात. लिलावती सगळ्यांनी इतकी काळजी घेतली तरीही खेकसून, त्रागा करून बोलते, त्यामुळे सगळेच नाराज होतात. तर भानू मात्र मनोमन सुखावते. मालकांना त्रास दिल्याने, मालक आणि तिची मैत्रीत फूट पाडल्याने त्याचा बदला भानू असा घेते.

त्याच्या दुसऱ्या दिवशी भानूला मोहन लिलावतीला त्रास कसा झाला हे विचारतो. तेव्हा भानू त्याला हे सगळं जादूची करामत असल्याचे सांगते. तेव्हा मोहन मात्र भानुवर हिरमुसतो. यामुळे त्याला जास्त वाईट वाटल्याचे भानूला सांगतो. तेव्हा मोहनची नाराजी काढण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे असे भानू ठरवते.

सकाळी राहुल, मदन पेपर वाचत असतात. तेव्हा त्या पेपरात नोकरीच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी छडा लावत यातील आरोपींना जेरबंद केले असल्याची बातमी वाचतात. ह्याच कंपनीने समीरलाही परदेशी पाठवले होते असे त्यांच्या लक्षात येते. समीरची फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात येते. याबद्दल त्यांना वाईट वाटत असतानाच समीर तिथे येतो. तेव्हा त्याला हे सगळं सांगतात. त्याचेही डोळे उघडले गेल्याचं तो म्हणतो. मोहनला भेटून त्याची माफी मागणार असल्याचे सांगतो. मोहनला भेटायला जातो.
समीर, मोहनला अगदी अंतकरणपूर्वक सॉरी म्हणतो. त्याचं कसे चुकले, कंपनीने कसे अनेकांना फसवले असल्याचे कळले असल्याचे सांगतो. वेळेच्या आधीच कळलं म्हणून बरं, नाहीतर तो विदेशी जायला तयारच होता. मात्र गेले दोन तीन दिवस वातावरण ढगाळ होते, खराब हवामान झाल्याने फ्लाईट सारख्या कॅन्सल होत राहिल्या. पुढील फ्लाईट केव्हाही लागू शकते म्हणत तीन दिवस त्याने हॉटेलमध्येच मुक्काम केला. पण ती कंपनीची ऑफर फ्रॉड होती हे कळले, विदेशी जाण्या आधी फ्लाईट कॅन्सल झाली या चांगल्या गोष्टी घडल्याचे मोहन त्याला सांगतो. समीरही यामुळे आनंदी होतो. तर, मोहन भानूचे शोभा, समीरच्या नकळत आभार मानतो.
समीर लिलावतीकडे जातो, तेव्हा ती ही ठीक झालेली असते. चाळीचे अध्यक्षपद समीर लिलावतीकडे परत देण्याचे सांगतो. पण लिलावती समीरला ते देण्याचे नाकारते. त्याची फ्लाईट कॅन्सल झाली म्हणून तो परत आला तरी अध्यक्ष तीच राहणार असे बोलते. चाळीतले इतर शेजारीही आता लिलावतीकडे जमतात. समीरच अध्यक्ष व्हावा म्हणून त्यांचा ससेमिरा लिलावतीवर सुरू करतात. गर्दी जमल्याने लिलावती समीरला मेंटेनेन्सची फाईल सोपवून टाकते.
मग समीरला मन्या एकटाच बसलेला दिसतो. तेव्हा त्याच्या नाराजीचे कारण समीर विचारतो तर मन्या लिलावतीच्या नवीन नियमांबद्दल सांगतो. पण समीर आता ते सर्व नियम रद्द झाल्याचं जाहीर करतो. त्यामुळे परत एकदा मुलांचा कल्ला सुरू होतो.

इकडे शोभाही मोहनला उगाच आयुष्यात मोठं काही करता आले नाही असे बोलल्याबद्दल सॉरी म्हणते. तर मोहनही आपण कष्टाने जे मिळालं भलेही कमी मिळालं तरी समाधान मानावे असे सांगतो. भानूही शोभाला, मोहनला बघून खुश होते. आनंदाने घरात स्वयंपाक करायला लागते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडा २ रा - रोजच्या रोज करा सोशल मीडिया मार्केटिंग - कंटेट इज अ किंग

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

After The Rain... Moon is Beautiful - Ebook Review in Marathi