विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...

स्व-सोबत

माणूस स्वतः स्वतःच्या सोबत असतो का ? किती वेळ असतो ? माणसाने स्वतःच्या सोबत वेळ घालवावा का ? जर हो तर किती, नाही तर का नाही ? मेंदूला जड वाटणारे हे सगळे प्रश्न आहेत, याची उत्तरे मोठी चमत्कारीकच आहेत.

स्वप्न, आभासी असतात. हे खरं आहे, मात्र स्वप्नात प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या सोबत असते. त्या आभासात, त्याच्या विचारात, माणूस स्वतःची सोबत कधी सोडत नाही. कारण, निव्वळ सोपं आहे. स्वप्नात माणसाला त्याच्या लायकीपेक्षा जास्त, आणि त्याच्या आवडीचं जगायला मिळत असते. म्हणून वास्तवापेक्षा तो स्वप्नातच स्वतःच्या सोबत, एकटा खुशाल असतो.

मनाचे विश्व सोडून त्याला जेव्हा बाहेर अभिव्यक्त व्हायचे असते, तेव्हा प्रत्येकवेळी घडणारी कृती स्वच्छंदी पणाची नसते. अनेक काळज्या, चिंता, यातून तो वेढलेला, खंगत खंगत चालणारा, आणि म्हणूनच अनेकदा गर्दीतही एकटा पडलेला असा असतो. एकटं पडणं, किंवा निम्न मनस्वीय परिस्थितीत जगणं यामुळे माणसाची त्याच्या स्वतःपासूनच ताटातूट होते.

पण, मग जगायचं तरी कसं ? नेहमीच स्वतःसोबत जगता येणं शक्य नाही. नेहमीच अस्वछंदी जगून आयुष्य निर्गम करत राहणे योग्य नाही. तर हा प्रश्न,बहुदा माणूसपरत्वे ज्याने त्याने सोडवायचा असतो. प्रत्येकाला जमणं अशक्य आहे, पण स्वप्नात स्वतःसोबत चालताना वास्तवातही खुशाल जगता येण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे स्वतःची ध्येय्य, स्वप्ने अचूक प्रयत्नांनी पूर्ण करत जगणे. त्यासाठी अनेक मर्यादा ओलांडाव्या लागतात, अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.

यासगळ्यातूनच स्वतः स्वतःसोबत जगणे शिकायचं असतं. इतरांनाही माणूस बनवून सोडताना, हीच प्रक्रिया करायची असते. सरतेशेवटी जगणं, जगण्यासाठी, जगणाऱ्यांसाठी जगणं अतिशय महत्त्वाचं.

माणूस स्वतः स्वतःच्या सोबत राहू शकतो. त्याला हवं तितक्यावेळ तो राहू शकतो. बिलकुल ताण न देता, मनातून विचार केला तर कोणताच प्रश्न जड वाटत नाही

टिप्पण्या

  1. आजचे जग प्रचंड धावपळीचे आणि cut throat competition असलेले आहे. यात टिकण्यासाठी प्रत्येकजण धडपड करत आहे. याच परिस्थितीमुळे स्वतःकडे किंवा इतरांच्या सुख, दुःखात इच्छा असूनही सहभागी होत नाही आणि हे वाढत जात आहे. मार्शल मॅकलुहान या माध्यमतज्ज्ञाने म्हटले आहे, "The world became a global village" आणि आज माध्यम क्रांतीमुळे ते झाले देखील आहे. पण माणुसकी मात्र कुठेतरी स्वकेंद्रित झाल्याचे दिसून येत आहे...

    हे बदलणे अत्यंत आवश्यक आहे!!!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडा २ रा - रोजच्या रोज करा सोशल मीडिया मार्केटिंग - कंटेट इज अ किंग

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

आपण ट्वीटर मॅडमला ओळखता का? - ब्लॉगमालिका