मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

this blog is dedicated to work of my passion. I want to speak, write, displays my creativity, I want to tell the world few words about me, so I created this blog. It has some affilate connections also, that gives me little bit pleasure of selling also, I educate from here by sharing knowledge to the people. I welcome to all my readers, followers, admirer, thanks to all who loves me. I will be updating this blog in each month with full of new things, based on happenings, politics, and many more.
माणूस स्वतः स्वतःच्या सोबत असतो का ? किती वेळ असतो ? माणसाने स्वतःच्या सोबत वेळ घालवावा का ? जर हो तर किती, नाही तर का नाही ? मेंदूला जड वाटणारे हे सगळे प्रश्न आहेत, याची उत्तरे मोठी चमत्कारीकच आहेत.
स्वप्न, आभासी असतात. हे खरं आहे, मात्र स्वप्नात प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या सोबत असते. त्या आभासात, त्याच्या विचारात, माणूस स्वतःची सोबत कधी सोडत नाही. कारण, निव्वळ सोपं आहे. स्वप्नात माणसाला त्याच्या लायकीपेक्षा जास्त, आणि त्याच्या आवडीचं जगायला मिळत असते. म्हणून वास्तवापेक्षा तो स्वप्नातच स्वतःच्या सोबत, एकटा खुशाल असतो.
मनाचे विश्व सोडून त्याला जेव्हा बाहेर अभिव्यक्त व्हायचे असते, तेव्हा प्रत्येकवेळी घडणारी कृती स्वच्छंदी पणाची नसते. अनेक काळज्या, चिंता, यातून तो वेढलेला, खंगत खंगत चालणारा, आणि म्हणूनच अनेकदा गर्दीतही एकटा पडलेला असा असतो. एकटं पडणं, किंवा निम्न मनस्वीय परिस्थितीत जगणं यामुळे माणसाची त्याच्या स्वतःपासूनच ताटातूट होते.
पण, मग जगायचं तरी कसं ? नेहमीच स्वतःसोबत जगता येणं शक्य नाही. नेहमीच अस्वछंदी जगून आयुष्य निर्गम करत राहणे योग्य नाही. तर हा प्रश्न,बहुदा माणूसपरत्वे ज्याने त्याने सोडवायचा असतो. प्रत्येकाला जमणं अशक्य आहे, पण स्वप्नात स्वतःसोबत चालताना वास्तवातही खुशाल जगता येण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे स्वतःची ध्येय्य, स्वप्ने अचूक प्रयत्नांनी पूर्ण करत जगणे. त्यासाठी अनेक मर्यादा ओलांडाव्या लागतात, अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.
यासगळ्यातूनच स्वतः स्वतःसोबत जगणे शिकायचं असतं. इतरांनाही माणूस बनवून सोडताना, हीच प्रक्रिया करायची असते. सरतेशेवटी जगणं, जगण्यासाठी, जगणाऱ्यांसाठी जगणं अतिशय महत्त्वाचं.
माणूस स्वतः स्वतःच्या सोबत राहू शकतो. त्याला हवं तितक्यावेळ तो राहू शकतो. बिलकुल ताण न देता, मनातून विचार केला तर कोणताच प्रश्न जड वाटत नाही
आजचे जग प्रचंड धावपळीचे आणि cut throat competition असलेले आहे. यात टिकण्यासाठी प्रत्येकजण धडपड करत आहे. याच परिस्थितीमुळे स्वतःकडे किंवा इतरांच्या सुख, दुःखात इच्छा असूनही सहभागी होत नाही आणि हे वाढत जात आहे. मार्शल मॅकलुहान या माध्यमतज्ज्ञाने म्हटले आहे, "The world became a global village" आणि आज माध्यम क्रांतीमुळे ते झाले देखील आहे. पण माणुसकी मात्र कुठेतरी स्वकेंद्रित झाल्याचे दिसून येत आहे...
उत्तर द्याहटवाहे बदलणे अत्यंत आवश्यक आहे!!!