पोस्ट्स

डिसेंबर, २०१४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...

communication's output

अतिसंपर्काने काय साध्य ? माणूस आणि समाज या एकमेकांशी नाळ जोडलेल्या गोष्टी आहेत. पण या दोन्ही गोष्टी जर जुळायच्या असतील तर या दोघांना एक रोग जडावा लागतो, संपर्काचा. हो हा संसर्गजन्य रोग तुम्हाला जडला की तुम्ही माणूस म्हणून समाजात गणले जाऊ लागतात. अन समाजाला संपर्कामुळेच तुम्हीही किंमत देऊ लागतात. अशी आहे लक्षण या असाध्य रोगाचे यावर अनेकदा इलाज होवूच शकत नाही. एकदा का संपर्कात राहणे खुशावह वाटू लागले की मग कुणी त्यातून सुटू शकत नाही. अधिक अधिक संपर्क वाढता ठेवला जातो, कधी त्यामागे काहीही स्वःहेतू नसतो, बऱ्याचदा तो असावा लागतो, किंवा संपर्क ठेवायला तुम्हाला काहीही कारण हे चालू शकते. संपर्क ठेवण्याचीही आता विभिन्न माध्यमे उपलब्ध झाली आहेत, याला बहुदा तप काळ लोटला असावा, पारंपारिक माध्यमांचा आधुनिकीकरणात निभाव लागला नाही त्यामुळे ती भंगारात निघाली आहेत. थेट संपर्क, पत्रव्यवहार, तार यांचा विषय घ्यावा तर, तार सेवा बंदच झाली आहे, पत्रांमध्ये मायेचा ओलावा आटून गेल्याने फक्त व्यवहार उरला असल्याने त्याबद्दल चर्चा म्हणून बोलण्यासारखं, फार काही सापडत नाही. कमीत कमी शब्दात प्रांजळ धमक्या देणे हे व्य...
इमेज
my poem

पाउसाचा काटा

नाही भुईवर | ना आकाशावर | ना रे देवावर | भरवसा | तो देईनाही | तो देईतो ही | परी उजाडीसी | माळराना | बर्फ पडलंया | पीक नासलंया | उगी वाचलंया | प्राण आहे | नमो सरकारा | देव  दरबारा | जाहला पुकारा | मदतीचा | बारा आहे जिल्हे | बळी या पडले | धारे अवकाळे | गारपीटी | स्वप्ने पुसलेली | आशा विनाशली | करात उरली | नुकसानी | दिलीसी मदत | यांनी करोडोची | खरी केली उक्ती | सत्ताधारी | आलीसी मदत | होता पंचनामे | करू मात्र नोहे | फसवून | ज्याचे नुकसान | तो रे याचक | त्यालाच मदत | पोहोचवा | अधे मध्ये कुठे | नका घेऊ खाऊ | दावून तो बाऊ | भ्रष्टाचारी | सार्यांस समान | हक्काचा द्या वाटा | बोचला ज्यां काटा | पाऊसाचा |     म्हणे विशू पहा | माझ्या पांडुरंगा | वाजतो मृदुंगा | आक्रोशाचा |

showpiece

इमेज
खरं सांगू का ? काही लोकांचे असे होते की मनाप्रमाणे त्यांना सहजच शब्द वळवता येतात. त्यांचे उच्चार करायला लागणारा वेळ इतका कमी वा अधिक कसा काय ते घेऊ शकतात, याचे मग भारीच कौतुक मला वाटून जाते. परंतु मित्रांनो, अंतिम सत्य हे की हे सगळेच देवदत्त असते. निसर्गाने जी रचना केलेली असते हा तिचाच एक भाग आहे. एखादा शब्द उच्चारायला लागणाऱ्या वेळेप्रमाणे आपण बोलून तो लिहितो. या दात, ओठ आणि जिभेच्या हालचालींवर तो ह्रस्व की दीर्घ उमटेल हे अवलंबून आहे. आता, आज अचानक हे सगळं मला सुचायचं कारण आहे मी वाचत असलेलं पुस्तक, या पुस्तकातील लेखकाने संपूर्ण स्वातंत्र्य वापरून सुरुवातीपासूनच मनाजोगे शब्दांना वळवले असल्यामुळे मला वाचयला थोडा त्रास झाला, पण मग वरील विचारही डोक्यात आले, पण तो तांत्रिक विचार झाला हो ! अजून एक गंमतीची गोष्ट सांगू का ? कथा, स्फुट, पत्र आणि कविता या वाचणार्यांच्या  काळजाला तेव्हाच हात घालतात जेव्हा लिहिणाऱ्याने बुद्धीप्रामाण्य न मानता उत्स्फूर्त मनानेच विवेचन केले असेल. आता यापुढे त्या कथासंग्रहात लेखक मला काय सांगुन गेलाय ते मी मांडणार आहे. प्रस्तुत पुस्तकात लेखकाची पहिली कथा जी मी ...

सोशल मीडिया, लेखक आणि प्रेक्षक....

इमेज
महाराष्ट्र.. साहित्य समृद्धीने नटलेलं , बहरलेले राज्य आहे. जितके मोठ्ये इथे फुलांचे तटवे आहेत, तितकेच साहित्यिक कातळही पाहायला मिळतील. फुले साहित्य परंपरा दर शतकात टवटवीत ठेवत आलेले सर्वच लेखक, संत, कवी, संपादक, पत्रकार, वाचक आणि स्फुट लेखक या सर्वांना जखडून ठेवणारी एक पक्की  पण तरीही मुलायम अशी साखळी आहे ती भाषेची. मराठीला असणारी सगळ्यात मोठी परंपरा हीच. हिचा विस्तार करण्यात आजवर अनेकांची हयात गेली. तर अनेक जनांनी आयुष्य निस्सीम सेवेत वाहिली ती या भाषेला जगवण्यासाठीच, भाषेच्या प्रेमापोटीच. मला सांगताना खूप आनंद होतो की हा भाषाप्रेमाचा, साहित्यरुंजी, अभिरुचीचा प्रवास आता आभासी विश्वातही खूप मोठ्या प्रमाणात होऊ घातला आहे. ब्लॉग, सोशल नेट्वर्किंग, ईमेल्स, वेबसाईट अशी अनेक माध्यमांतून अभिव्यक्तीला खुली वाट करून देता येत आहे, नवमाध्यम असल्याने तरुणवर्ग संख्येने जास्त असला तरी प्रस्थापीत साहित्यिक देखील याकडे आकृष्ट आहे. अनेक सिद्धहस्त कवी-लेखक यांतून आता जगसंपर्कासोबतच त्यांच्या भावना, मत, सटीक परीक्षण यांना जगापुढे मांडत आहे. मला, ब्लॉग्स, आणि फेसबूक ही अत्यंत जवळची आणि प्रिय अशी ठिका...
खरडा काहीतरी....... आधी लिहूया काहीतरी आणि आता खरडा काहीतरी . हा काय भलताच प्रकार झाला बुवा ! म्हणजे हे काय नावं द्यायची पद्धत झाली . लिहूया , खरडा , आणि याहून पुढे तर अजूनच अतरंगी काही सुचावं . पण आता असो , जे सुचलंय , त्याचेच बोट धरून जमिनीवरून क्षितिजावर आणि तिथून टुणकन उडी मारून आपण ढगात जात असतो बाबा ... तिथे वास्तवाच्या जगाचे शेवटचे   टोक आणि कल्पनांचे लुसलुशीत ढग वाट बघत असतात . इब्लीस काहीतरी सांगुन विशिष्ट चमत्कारिक अनुभूती देण्याचे गमक कुठल्या पेटाऱ्यात दडलंय हे सापडेपर्यंत तरी असचं चालू द्या , कारण खऱ्या आयुष्यातल्या इरसालपणात घेता येणारी मजा विवेकाने बनत असनाऱ्या विनोदात कशी पालटवतात ते अजूनतरी मला ठावूक नाही ... बरं हा मुद्दा वादातीत राहील की विनोदनिर्मित्ती कशाशी खातात , सध्यापुरता या विषयाला इथेच ‘केटी’ देवूया. चला पुढच्या सेममध्ये अर्थात पुढच्या मुद्द्याला धरूया. बरं , आता लेख लिहायचा म्हणजे त्यात परिच्छेद आला . परिच्छेदाला पूर्ण नमोत्व द्यायचं तर   म्हणजे मुद्दा...

kavita

अतुल वेङावलो कसा मी नादावलो कसा मी माझे मला न उमजे की भाळलो कसा मी मोहास लांब राखत रे आजवर कधीही तुज पाहता तुजमदी रे गुंतलो कसा मी घटघट विषास रिचवीणारा विशाल बंदा थेंबभर अमृताला या शीवलो कसा मी यारा जगात होते मोठेच ओळखीचे नी धावले जरी गेलो फासलो   कसा मी दे दार उघङुनी अवनीचे जायचेच आहे खोटाच देव बनलो तर पावलो कसा मी विशू
इमेज