विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...

सोशल मीडिया, लेखक आणि प्रेक्षक....

महाराष्ट्र.. साहित्य समृद्धीने नटलेलं , बहरलेले राज्य आहे. जितके मोठ्ये इथे फुलांचे तटवे आहेत, तितकेच साहित्यिक कातळही पाहायला मिळतील. फुले साहित्य परंपरा दर शतकात टवटवीत ठेवत आलेले सर्वच लेखक, संत, कवी, संपादक, पत्रकार, वाचक आणि स्फुट लेखक या सर्वांना जखडून ठेवणारी एक पक्की  पण तरीही मुलायम अशी साखळी आहे ती भाषेची.
मराठीला असणारी सगळ्यात मोठी परंपरा हीच. हिचा विस्तार करण्यात आजवर अनेकांची हयात गेली. तर अनेक जनांनी आयुष्य निस्सीम सेवेत वाहिली ती या भाषेला जगवण्यासाठीच, भाषेच्या प्रेमापोटीच. मला सांगताना खूप आनंद होतो की हा भाषाप्रेमाचा, साहित्यरुंजी, अभिरुचीचा प्रवास आता आभासी विश्वातही खूप मोठ्या प्रमाणात होऊ घातला आहे. ब्लॉग, सोशल नेट्वर्किंग, ईमेल्स, वेबसाईट अशी अनेक माध्यमांतून अभिव्यक्तीला खुली वाट करून देता येत आहे, नवमाध्यम असल्याने तरुणवर्ग संख्येने जास्त असला तरी प्रस्थापीत साहित्यिक देखील याकडे आकृष्ट आहे. अनेक सिद्धहस्त कवी-लेखक यांतून आता जगसंपर्कासोबतच त्यांच्या भावना, मत, सटीक परीक्षण यांना जगापुढे मांडत आहे.

मला, ब्लॉग्स, आणि फेसबूक ही अत्यंत जवळची आणि प्रिय अशी ठिकाणे आहेत. आज इथून मी माझ्या आप्तस्वकीय तसेच अनेक नवीन रसिकांशी जोडलेलो गेलो आहे. एफबीची जादूच अशी करामती आहे की तुमच्या एका शब्दाच्या स्टेटसलाही महत्व दिले जावू लागले आहे. इथे तर  मी म्हणेल चांगले लिहिणारे आणि चांगले वाचणारे यांचा मोठा गोतावळा जमतो. पण शेवटी महाराष्ट्र आहे हा ? राज्यात जशा अनेक जाती आणि त्यांच्या पोटजाती आहेत तशाच इथेही अशा विभिन्न अठरापगड लोकांचे ताटवे आणि कातळसमूहही आहेतच. फुलं जी आहेत ती नक्कीच बहरतात, दरवळतात, सगळ्यांना सुगंध देवून जगण्याची प्रेरणा देतात, मग त्यातली काहींचे रुपांतर फळात घडून ते अशाच ई-साहित्यिकांची पिढी घडवतात. एक मात्र शेवटचं सत्य आहे, जो काळाचा महिमासुद्धा  म्हणू शकतो, ही नवीन माध्यमे हाताच्या मुठीत सहज सामावली गेली. चांगल्या गोष्टींसोबतच काही कडवट उबाळेही अनेकदा बाहेर येत असतात. गोड, गोंडस प्रतिमेमागे त्यांचे हे बीज हे कडू दडलेले असते. सुखद, छान अनुभव जरा बाजूला ठेवून देतो आणि ‘जरा’ पण कडू अनुभवाबद्दलही बोलतो .
वर जो अवतार्नातला जरा आहे त्याचा मराठीत अर्थ म्हातारपण, वृद्धत्व असा आहे. मला पण जरा या आभासी, आंतरजाळातील वयाने ज्येष्ठ व्यक्तींवर बोलायचे आहे. मला फेसबुकवर असे अनेक लोक भेटली. ज्यांचे आधीही खूप लिखाण प्रसिद्ध झाले आहेत, पुरस्कार मिळालेले आहेत, देशात आणि परदेशातदेखील त्यांचे वास्तव्य आहे. जे त्यांच्या दैनंदिन जीवनात सवडीने इथे वावरतात. गप्पा, चर्चा, सुसंवाद, विश्लेषण आणि वादविवादही रंगतात. वादविवाद करणे हे कुणाही येरबागळ्याचे काम नसले तरी यातही अनेक वेगळ्या विषयांवर बोलणारे, भांडणारे लोक सापडतील. काही लोक अशी उन्मात पिंगा घालतात की एखाद्या असमंजस मुला-मुलीपेक्षाही अधिक. अशा वेळी संभ्रम जास्त होतो की यांची कीव करवी का ? राग दाखवावा का ? अथवा सळसळत्या उत्साहाला शाबासकी द्यावी ? यातला शेवटचा प्रश्न हा बाद. मी तरी हे मानणारा आहे की आपल्यापेक्षा मोठ्यांचे कौतुक आपण काय करावे ! खूप लहान पडतो ना. शेवटी आता या त्यांच्या टिका-टिप्पणीला फार मनावर न घेता सोडून देण्यातच शहाणपण मी मानतो. आता घरातील वडीलधारी मंडळी काही गोष्टी नाही समजून घेत, मग काय अगदी शब्दाने शब्द वाढवायचा का ? माझ्या मित्रांनाही मी तेच सांगत असतो., द्या ‘जरा’ सोडून.

आता गप्पा, चर्चा, सुसंवाद याकडे वळूया. नवमाध्यम त्यातल्या त्यात फेसबुकने निम्म्याहून अधिक विश्व व्यापले आहे. या व्यापात मराठी लोकांचा एक कोपरा पकडला तरी खूप होईल, जग फार विस्तीर्ण आहे, तिथे अनेक भाषा आहेत, म्हणून एक कोपरा आपल्या मराठीचा असे धरूया.

खरोखरीच आता सोशल मीडीयाने जवळ आणून ठेवल्या विश्वाला ‘स्पर्श’ ही करता येतो. माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे, सोशल मीडीयातूनही चांगले, दमदार लेखन करणारे लेखक पुढे येत आहेत. त्यांच्यात उत्स्फूर्तता आहे, स्फुल्लिंग चेततात, विशेष म्हणजे कुणीतरी येवून उसकावण्याची वाट ही मंडळी पहात नाही, स्वयंप्रेरणेने, धडाडीने पुढे पुढे धावू लागली आहेत, सोशल मीडियाणे दिलेली ही फार मोठी उपलब्धी. हे कथन करण्याचा परामर्श असा की ह्या घटना वरवर सध्या दिसल्या तरी कुणी लेखक-कवी घडायला आवश्यक असतात ते दर्दी रसिक, जाणकार मंडळी जे जाणवून देतात, कौतुक करतात, चुका सुधरणा सांगतात.

भाषेच्या एकोप्यात ऋणानबंधांनी घट्ट बांधले गेलेल्या समाजात याच अनेक जाती आहेत, त्यात प्रत्येकजण आपापल्या परीने कवी-लेखक घडवतात. कुणी खिल्ली उडवते, कुणी प्रोत्साहन देते, खोटी तारीफ करते, कुणी शिकवते इत्यादी. तात्पर्य; सोशल मीडिया हे नवीन कलाकारांना उभ राहायचे व्यासपीठ देतंय. रसिक-प्रेक्षक, निरीक्षक यांच्या चांगल्या वाईट गोष्टी ज्यांतून या लोकांना उभारी मिळते. भल्या-बुऱ्या कशाही प्रतिक्रिया जेव्हा येतात तेव्हा निश्चितच रसिक म्हणून त्यांच्या असलेल्या जातीचा अंदाज येऊन जातो. खाजगीत एकजण म्हणालेला जेव्हा कुणी चांगलं संप्रेक्षण करते तेव्हा मनस्वी आनंद होतो पण हेटाळणी झाली की मन म्हणते, “ह्यांची जातच अशी”

                                                      विशाल लोणारी          

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडा २ रा - रोजच्या रोज करा सोशल मीडिया मार्केटिंग - कंटेट इज अ किंग

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

आपण ट्वीटर मॅडमला ओळखता का? - ब्लॉगमालिका