विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...
खरडा काहीतरी.......

आधीलिहूया काहीतरी आणि आता खरडा काहीतरी. हा काय भलताच प्रकार झाला बुवा ! म्हणजे हे काय नावं द्यायची पद्धत झाली. लिहूया, खरडा, आणि याहून पुढे तर अजूनच अतरंगी काही सुचावं. पण आता असो, जे सुचलंय, त्याचेच बोट धरून जमिनीवरून क्षितिजावर आणि तिथून टुणकन उडी मारून आपण ढगात जात असतो बाबा... तिथे वास्तवाच्या जगाचे शेवटचे  टोक आणि कल्पनांचे लुसलुशीत ढग वाट बघत असतात. इब्लीस काहीतरी सांगुन विशिष्ट चमत्कारिक अनुभूती देण्याचे गमक कुठल्या पेटाऱ्यात दडलंय हे सापडेपर्यंत तरी असचं चालू द्या, कारण खऱ्या आयुष्यातल्या इरसालपणात घेता येणारी मजा विवेकाने बनत असनाऱ्या विनोदात कशी पालटवतात ते अजूनतरी मला ठावूक नाही... बरं हा मुद्दा वादातीत राहील की विनोदनिर्मित्ती कशाशी खातात, सध्यापुरता या विषयाला इथेच ‘केटी’ देवूया. चला पुढच्या सेममध्ये अर्थात पुढच्या मुद्द्याला धरूया.

बरं, आता लेख लिहायचा म्हणजे त्यात परिच्छेद आला. परिच्छेदाला पूर्ण नमोत्व द्यायचं तर  म्हणजे मुद्दा, मुद्द्याची व्युत्पती म्हणजे बातमी, तर आजची गरमागरम बातमी कळली असेलच तुम्हाला. गुजरात राज्य नामक अतिशय अर्धस्वच्छ असलेल्या, कचरा-कुडा यांचा  हिमालय असलेल्या सुव्यवस्थित शहर म्हणून अति अति आणि मग हसू फुटवणाऱ्या अहमदाबाद नामक शहरात नेम ‘क’ काय काय घडेल याचा कुणीच भरवसा देवू शकत नाही, आता पहा ना. सामुदायिक विवाह सोहळा पार ‘पडला’, हा एक गोंधळात टाकणारा वाक प्रचार बाबा, बोलताना आघात आणि पॉज ठराविक लयी, सुरात घेतला नाही तर अर्थाचा इस्कोट होऊन जातो, म्हणजे बघा पार .............पडला( पडला, फ्लॉप ठरला). असो व्याकरण चमत्कृतीचं नंतर सवडीने बोलू. बोलायचं मुद्दा हा होता की  सामुदायिक विवाह संपन्न झाला(हे योग्य संबोधन) तर त्या सामुदायिक विवाहात जोडप्यांनी स्वच्छतेची शपथ घेतली म्हणे. अरे काय लग्न आहे की  मस्करी ? वर त्यात मीडियावाल्यांनी त्याला सामाजिक बांधिलकी असे राजरोसपणे म्हणणे “कित्तीतरी” चुकीचे आहे. (पत्रकार असून मीडियाला चूक म्हणतो, बेट्या तू मार खाणार !) मला सांगा लग्नमांडवात आधीच ढीगभर शपथ घेतल्या जातात, घेत आलेत, घेतंच राहतील ही. पण स्वच्छतेची शपथ ? मुळात आजवर जे थोडंफार आयुष्य जगलोय त्यात खूपशी मानसास अंतरंगात मन गर्भात खोदून वाचली आहे, सध्या सप्तपदितील शपथा आजवर पाळायला तयार नसणारी आजची पिढी, मातृभाषेतून पाल्याला न शिकवून मातीचे संस्कार न  रुजवता,  भलतंच इंग्रजाळलेल्या गुऱ्हाळात घोटावणारी आजची पिढी, पोटच्या मुलांपेक्षा इतरही अनेक विविध गोष्टी मोठ्या मानणारी आजची ‘मॉम’. स्वतःच्या सुखापायी इतरांना कमी तोलणारी आजची हायब्रीड सोसायटीची जेनरेषण, त्या सप्तपदी किंवा इतरही संस्कृतीतील लग्नातील शपथा असतील, कसोशीने पाळल्या जात नसताना, ही नवीन शपथेची भर कशाला ? माझे म्हणणे सरसकट सगळ्यांना लागू पडेल असे नाहीच ! अभिनंदनीय अपवाद असतीलही. परंतु एका ठराविक लांबी, रुंदी आणि उंचीवरच्या ओट्यावरून पाहिल्यास हा विचारही पटतो, माझ्या मनाला. आणि थोरामोठ्यांनी गिमिक सांगुन ठेवलंय, जितकं अंतरंगात डोकावत जाण्याच्या प्रयत्न करतो तितकं वैश्विक आपण बनत जातो, किमान आपल्या विचारांतून तरी... 

 चला आता चांगली बाजू काही मिळतेय का बघू. हं, धागा, धागा, धागा..........सापडला, थांबा हं. री ओढू द्या............................ तर चांगली बाजूकडे येवू या, नाहीतर चालणार कसं, एकंच कास धरली तर. ३१ जोडपी या सामुदायिक विवहात लग्न करून संसाराला लागली. लग्नमांडवात अशी अनोखी वेगळी, शपथ खाल्ल्याने ( खरंतर जीलेबिसोबत खाऊ घालणार होते, पण ती तुटू नये याकरिता नाही दिली, जिलेबी तोडून खातात ना ! ) त्यांच्यासाठी हा अतिशय  संस्मरणीय असा सोहळा झाला असेन. मला मुळात सामुदायिक विवाह ही संकल्पनाच प्रचंड आवडते, कितीतरी करोडो रुपयांची उधळपट्टी यातून टळते, परिणामी अनेक गोरगरिबांचे हातात चानके पडण्याऐवजी दोनचार का असे ना पण मानके पडतील, पडले असतील. या सगळ्यांसाठी हर्षानंदमय शुभ चिंतन.  अशा पद्धतीने लग्नात घेतली गेलेली शपथ घेण  त्याच धैर्यवान लोकांच्या मनगटसिद्धीने ठरू शकते ज्यांना आपलो अहमदाबाद स्वच्छ राहू देणे वाटू छे. याकरीताहि ते ६४जन, खरी अर्थाने भारताचा विचार करणारे तरुण वाटतात. एरव्ही आपण म्हणतो की काही लोकांना फक्त स्वार्थ बघता येतो, मतलब साधायला गोड गोड साखर जिभेवर घोळवून ते बोलतात, पण असाही विचार करून देश स्वच्छ करण्याच्या महान कार्याला पूर्ती  देण्याचा वसा घेणे, त्यासाठी शपथ घेणे, मला वाटते ही  खरचं खूप मोठी गोष्ट आहे. नाही मी मगाशी एक बोललो आणि आता सरळ गोडवे गातोय हा भाग नाही, विरोधही दर्शवला तो त्या अर्थी मी बरोबर आहे हे सिद्ध करण्याच्या शर्थीनेच. तसाच माझा हा पण मुद्दा आहे. हो, प्रथा म्हणून लागू करायला हा विचार एकदम ‘बेस्ट’. देशात स्वच्छता अभियान राबवायचं तर त्याची सुरुवात वैयक्तिकच व्हायला हवी. एका घरातून अनेक घरांत हि प्रथा पोहोचून तो परंपरेचा पायंडाच पडून जायला हवा. मी तर म्हणतो, काही विशिष्ट मंत्ररचना करून घेवून ती म्हटल्याबिगर भटजीबुवा यांची दक्षिणा रोखून ठेवायला हवी. या सगळ्या बदलांचा यथावकाश अत्यंत चांगला असा परामर्श जर झाला तर माझ्या मित्रंनो काय घडेल, सगळ्यात आधी तर अहमदाबाद लख्ख होईल. जो की सोस केला जातो, या शहराबद्दलचा तो एका अर्थी थोडासा तरी खरा ठरण्यास मदत होईल, आणि काय देशभर असे धोरण राबवून जर का लग्नमंडपात स्वच्छतेची आधुनिक मंगलाष्टकं  वाजू लागली  तर अनादी जन हे  आनंदी होतीलच, यापलीकडे जगभर गाजलेल्या भाषणांची सार्थकता झाली असे म्हणता येईल. जगभर स्वच्छतेवर बोललेच गेलाय असे नाही पण नरेनभाय जितना भी बोल छुके हे आजतक, वो चुके नाही इसलिये मै बोला. अच्छे दिन आयेंगे हा जो स्लोगन निवडणुकीपूर्वी अक्षरशः  पिटला गेला होता तो ही काही अंशी योग्य डंका वाजवेल असा आमूलाग्र बदल देशाच्या आरोग्य, पर्यावरण संबंधित घडेल, सर्वच समस्या सुटल्या नाहीत ही एक गंभीर आणि भली मोठी समस्या जरी निरसटली तरी, पुष्कळ चांगलं मोडी सरकार आलं असा म्हणता येईल.  आणि मग आर्थिक महासत्ता वगैरेची स्वप्न या देशातल्या तरुणांना बिनदिक्कत बघता येतील, कचर्याच्या ढिगार्यावर एकवेळ कमळही फुलू शकणार नाही हो ! मग ‘अर्थिकमहासत्ता’ हा तर खुपचं मोठा शब्द झाला ना ! तर त्या दृष्टीने पाऊले पडायला या लग्नसोहळ्यातून सुरुवात झाली असे आपण म्हणू शकतो. तसं बघायला गेलं तर आपण मग आता खरोखरीच देशात सुबत्ता येईल. देश प्रगत होईल आणि सर्व जगाचे नेतृत्व करू शकेल. या सगळ्यांना जागतिक अर्थिक, राजकीय सुदृढता कशी पूरक लाभू शकेल याकडेही ध्यान असू  द्यायला हवे.  परराष्ट्रात काही मित्र आहेत तर काही शत्रू आहेत, काही मैत्रीचा बुरखा असणारे शत्रू आहेत, ज्यांपासून देशाला अधोगती संभवते, ती टाळण्याचा कटाक्षाने प्रयत्न करायला हवा, हे सामान्यजन करू शकत नाही. सरकारचेच हे काम.  सामान्यालोक फक्त लग्नात आणाभाका घेऊ शकतात.


बस्स ! मला वाटते आता माझा काय सांगायचे ते सांगून झालंय. आतासाठी इतकं पुरेसं आहे. या लेखातून विनोद मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न एकादृष्टीने फसला आहे. पण ही शपथेची घटना देशात काय जगात विनोद ठरू नये याकरीता माझा विचार मंथनाचा हा  प्रवास लेखणीतून झरवला, त्याला किनार मात्र भावनिकतेचीच लाभली, असेही वाटून गेले असेल कदाचित, पण म्हणतात ना स्वभावाला औषध नसते, तसे माझे लेखनाच्या बाबतीत आहे, माझ्या पण शैलीला बदलायला खूप वेळ हवा आहे. तोपर्यंत हा खर्डा भाकरीसोबत खाऊन संपवा, पुन्हा भेटूच ! बाय    

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडा २ रा - रोजच्या रोज करा सोशल मीडिया मार्केटिंग - कंटेट इज अ किंग

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

आपण ट्वीटर मॅडमला ओळखता का? - ब्लॉगमालिका