पोस्ट्स

विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...

After The Rain... Moon is Beautiful - Ebook Review in Marathi

इमेज
     पहिले प्रेम. ज्यांचा प्रेमावर विश्वास आहे. श्रध्दा आहे, त्यांना त्यांचे पहिले प्रेम कधीच विसरता येणार नाही. पहिल्या प्रेमाची नशाच काही और असते. कोवळ्या वयाच्या मनाला इतर कुठल्याच जाणिवा स्वस्थ बसू देत नाहीत. जगण्याची सगळीधडपड फक्त त्यासाठीच सुरू असते. हे सगळे अनुभव अतिशय रोमांचक ठरतात. आयुष्यात काही गोष्टी प्रथमच घडत असतात. इतके दिवस  कारणाशिवाय कधीही न ऐकू आलेले ठोके जोरजोरात धडधडू लागतात, केवळ एखाद्या व्यक्तीच्या समोर येण्याने किंवा तिचा विचार मनात आल्यामुळे हे सगळं घडतं. आपल्या आजुबाजूला इतर लोकांनी आपल्याला सावरण्याचा किंवा थांबवण्याचा प्रयत्न जरी केला तरी मनाला थांबवता येत नाही. पण, बहुतांश वेळा हे आपलं पहिलं प्रेम फसतं, अपूर्ण राहतं. तरी कधी ते प्रेम करणाऱ्या जीवांच्या आयुष्याच्या शेवटापर्यंत टिकून राहतं. पुस्तक वाचण्यासाठी येथे क्लिक करा   लिंक २  किंवा तुम्ही ब्लॉगच्या डावीकडे असलेलं पॅनलही उघडू शकतात. अमरावतीचे तरूण लेखक शंतनू गोटे यांनी त्यांचे दुसरे पुस्तक After the rain the moon is beautiful वाचकांच्या भेटीस आले आहे. शंतनु यांनी आधीही Mes...

धडा २ रा - रोजच्या रोज करा सोशल मीडिया मार्केटिंग - कंटेट इज अ किंग

इमेज
धडा २ रा - रोजच्या रोज करा सोशल मीडिया मार्केटिंग व्यवसायाची मार्केटींग ही अविरत चालणारी प्रक्रिया असते. रोजच्या रोज त्यात विविध गोष्टींची नवीन भर घालणे, वारंवार लोकांना आपल्या वस्तुंची माहिती लोकांना देत राहणे , त्यात रोज नवीन एखादी युक्ती वापरून वस्तूचे आकर्षण वाढवणे यामुळे आपली मार्केटींग अत्यंत प्रगल्भ होत जाते. यामुळे तुमच्या ग्राहकांना तुमच्यावर विश्वास बसू लागतो. हळूहळू तुम्ही ग्राहकांवर प्रभाव पाडू लागतात. मेहनत घेत राहिल्याने ग्राहकांनासुध्दा तुमच्या वस्तू किंवा सेवेत रस निर्माण होतो.   तेव्हा आपला ग्राहक हा व्यवसायापासून तुटू नये यासाठी अविरत प्रयत्न करत राहणे आवश्यक असते. डिजीटल मार्केटींग क्षेत्रात स्पर्धा वाढत आहे. एकच वस्तू अगर सेवा देणाऱ्या अनेक कंपन्या, संस्था रोजच निर्माण होऊ लागल्या आहेत. त्यामुळे आपलं नाणं ग्राहकापर्यंत खणखणीतच वाजलं गेलं पाहिजे. अन त्याचा नाद सतत होत राहील याची पण आपण काळजी घ्यायला हवी. रोजचा रोज संपर्क होत राहावा यासाठी म्हणूनच रोजच्या वापरांतील गोष्टींचा मार्केटींगसाठी उपयोग करावा लागतोच. त्यामुळेच या गोष्टी डिजीटल मार्केटींगमधील नियोजनबध्द...

प्रिंटिंग व फोटोकॉपी – कमीत कमी खर्चात व्हा व्यावसायिक !

इमेज
  प्रिंटिंग व फोटोकॉपी – कमीत कमी खर्चात व्हाल आत्मनिर्भर ! नवीन व्यवसाय सुरू करताना, फारसं कुणी फोटोकॉपीज बनवण्याच्या व्यवसायाचा विचार करत नाही. तरीदेखील फोटोकॉपीजची गरज ही अनेक ठिकाणी शाळा, कार्यालये, कोर्टकचेरी, इत्यादी सर्वच ठिकाणी आपल्याला भासतेच. तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले असले तरीही आजच्या काळातही फोटोकॉपी, झेरॉक्सला पर्याय नाहीच. फोटोकॉपी दुकान ही कमी भांडवलात व्यवसायिक म्हणून स्थानिक होण्यासाठी चांगली संकल्पना आहे. स्थानिक कॉपी, प्रिंट दुकानांत प्रती एक पान कामांपासून मोठ्या मोठ्या गोष्टी प्रिंट, फोटोकॉपी करण्यासाठीचे साधने, माध्यमं सहज उपलब्ध असतात. एखादा विद्यार्थ्यालाही सहज चालवता येईल अशी ही व्यावसायिक संकल्पना आहे. तुम्हालाही या व्यवसायात उतरायचे असेल तर खालील गोष्टींचा विचार करायला हवा. ठिकाण फोटोकॉपी- प्रिंटिंगमध्ये तुमच्या व्यावसायिक यशाची खात्री देऊ शकणारी गोष्ट म्हणजे व्यवसायाचे ठिकाण. इतर व्यवसायांप्रमाणे प्रिंटिंग आणि फोटोकॉपी व्यवसायाला खूप मोठ्या दर्शनीय जागेची गरज पडते असे नाही. फक्त ठिकाण मोक्याचे असायला हवे. पुरक हवे. शाळा, क्लासेस, कार्यालये य...

Apple चे नवीन डिजीटल घड्याळ, रक्तातील ऑक्सिजनही तपासणार

इमेज
 apple वॉच सिरीज ६, वॉच सिरीज एसई हे दोन वॉच सिरीजमधील डिजीटल घड्याळ कंपनीकडून लॉंच करण्यात आले आहे. यात अनेक नवीन फीचर्सचा समावेश केल्याचे सांगण्यात येत आहे. लहान मुलांसाठी काही विशेष फीचर्सचाही समावेश या दोन घड्याळांत केला आहे.   या नवीन घड्याळात ब्लड ऑक्सिजन मीटर देण्यात आले आहे. यामुळे रक्तातील ऑक्सिजन तपासल्याने कोरोनापासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यात मदत होऊ शकणार आहे.  यामध्ये ट्रॅकर्ससाठी एक वैशिष्ट्य साकारण्यात आलं आहे. ते म्हणजे एलिव्हेशन ट्रॅकिंग फीचर. यामध्ये आपण किती उंचीवर आहोत, याबद्दलची माहिती यामुळे कळू शकणार आहे.  Apple वॉच डिझाईन मात्र, बदलेलं नाही. ते पूर्वीप्रमाणेच दिसत असले तरी स्टँपचे डिझाईनमध्ये बदल करण्यात आला आहे. यासोबतच सिरीज ६ घड्याळात स्लीप ट्रॅकिंगचही फीचर दिले आहे.  कंपनीच्या वेबसाईटनुसार घड्याळाच्या हार्डवेअरमध्ये अनेक उल्लेखनीय बदल  यंदा केले गेले आहेत. अत्यंत वेगवान एस ६ सिस्टीम इन पॅकेज,  ऑटोमॅटिक हँड वॉशिंग डिटेक्शन, आकर्षक रंगाची जोडणी, व्यायामाच्या नवीन प्रकारांचा समावेश आपल्या ग्राहकांना जास्तीत जास्त तंदुरूस्...

गुलाब - प्रेयसीवर रचलेली मराठी कविता

इमेज
दिसते सुंदर गुलाबी फुलाप्रमाणे हसतेस जेव्हाही तू झऱ्याप्रमाणे डोळ्यातूनी डोळ्यांशी बोलतेस तू दाटलीस माझ्या मनाशी धुक्याप्रमाणे पहाटेच्या कोवळ्या किरणामधूनी तू भेटतेस मला उन्हाच्या नक्षत्रातूनी तुझ्या आठवणींचा डाव रंगत गेला उमलली याद, तेव्हा स्पंदनातूनी Representative image घडते उरात काही धडधड की काही समजून येईना आता माझेच मला पळभर मला डोंगर चढावेसे वाटले नजरेने कसा जीव वेडापिसा झाला लहरी लहरीतून येतेस सुगंधाप्रमाणे हसून पाहता जीवाचे होई जळणे हात प्रेमाचा जेव्हा खांद्यावर येई त्याचे सांग कसे फेडणार मी पारणे समुद्राची गाज कानात रे गुंजते तू माझ्याशी जेव्हा मनातलं बोलते कधी होतील पूर्ण सारे स्वप्न दिवाने झुरतो विशाल हा कुणा चातकाप्रमाणे दिसते सुंदर गुलाबी गुलाप्रमाणे हसतेस जेव्हाही तू झऱ्याप्रमाणे

कसे व्हाल Amazon seller ?

इमेज
amazon द्वारे व्यवसाय कसा करू? नमस्कार मित्रांनो. बऱ्याच जणांना आपला व्यवसाय ऑनलाईन करायचा आहे. अन त्यासाठी त्यांना Amazon चा पर्याय आवडतो आहे. पण, त्यांना अगदी सुचक असा प्रश्न पडतो की Amazon सेलर व्हायचे कसे. या वेबसाईटवर आपला व्यवसाय कसा स्थापन करायचा. त्याबद्दलची फी किती घेतली जाणार, त्यातून मला किती, कसे पैसे मिळणार, मालाची डिलीव्हरी मी करायची की Amazon करून देणार. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मी या ब्लॉगद्वारे देण्याचा प्रयत्न करेल. तरीही काही शंका असल्यास आपण मला ब्लॉगवरील संपर्क फॉर्मद्वारे किंवा कमेंट्समध्ये विचाराव्यात.    व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला व्यावसायिक असल्याची  नोंदणी करणे आवश्यक असते. जसे, तुम्ही तुमच्या दुकानांची नोंदणी शासनदरबारी करून घेतली आहे. तसेच इथेही तुम्हाला  Sell on Amazon   या लिंकवर जाऊन सेलर अकाऊंट सुरू करून घ्यायचे आहे. त्याशिवाय आपल्याला या वेबसाईटवरून व्यवसाय करता येणार नाही, ही महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. ही एक अत्यंत सोपी प्रक्रिया असून यासाठी तुम्हाला फक्त १५ मिनिटांचा अवधी लागतो.  तुमचे सेलर अकाऊंट तयार...