विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...

प्रिंटिंग व फोटोकॉपी – कमीत कमी खर्चात व्हा व्यावसायिक !

 प्रिंटिंग व फोटोकॉपी – कमीत कमी खर्चात व्हाल आत्मनिर्भर !

नवीन व्यवसाय सुरू करताना, फारसं कुणी फोटोकॉपीज बनवण्याच्या व्यवसायाचा विचार करत नाही. तरीदेखील फोटोकॉपीजची गरज ही अनेक ठिकाणी शाळा, कार्यालये, कोर्टकचेरी, इत्यादी सर्वच ठिकाणी आपल्याला भासतेच.

तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले असले तरीही आजच्या काळातही फोटोकॉपी, झेरॉक्सला पर्याय नाहीच. फोटोकॉपी दुकान ही कमी भांडवलात व्यवसायिक म्हणून स्थानिक होण्यासाठी चांगली संकल्पना आहे. स्थानिक कॉपी, प्रिंट दुकानांत प्रती एक पान कामांपासून मोठ्या मोठ्या गोष्टी प्रिंट, फोटोकॉपी करण्यासाठीचे साधने, माध्यमं सहज उपलब्ध असतात.

HP Laserjet M1005 multifunction laser printer(Black)


एखादा विद्यार्थ्यालाही सहज चालवता येईल अशी ही व्यावसायिक संकल्पना आहे. तुम्हालाही या व्यवसायात उतरायचे असेल तर खालील गोष्टींचा विचार करायला हवा.

ठिकाण

फोटोकॉपी- प्रिंटिंगमध्ये तुमच्या व्यावसायिक यशाची खात्री देऊ शकणारी गोष्ट म्हणजे व्यवसायाचे ठिकाण. इतर व्यवसायांप्रमाणे प्रिंटिंग आणि फोटोकॉपी व्यवसायाला खूप मोठ्या दर्शनीय जागेची गरज पडते असे नाही. फक्त ठिकाण मोक्याचे असायला हवे. पुरक हवे. शाळा, क्लासेस, कार्यालये येथून जास्त ग्राहक मिळू शकतात. म्हणून अशाच जागेवर व्यवसाय मांडणी करायला हवी.

संसाधने

फोटोकॉपी, प्रिंटिंग व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला नक्कीच काही मूलभूत संसाधनांची आवश्यकता पडते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रिंटिंग आणि फोटोकॉपी मशीन. यासाठी बाजारात Canon, Brother DCP, HPDeskjet, HP, Sharp आदी कंपन्यांची मशीन्स उपलब्ध आहेत. कमीत कमी जागा व्यापतील अशी मशीन्स आता पाहायला मिळतात. अत्याधुनिक मशीन्स वायफाय, युएसबी नेटवर्क केबल द्वारे कॉम्प्युटरशी जोडली जातात. ब्लॅक अँड व्हाईट, तसेच कलर प्रकारातील फोटोकॉपी यात करता येतात. मिनिटाला किती पेजेस प्रिंट होतील यासाठीची क्षमता प्रिंटरगणीक वेगळी ठरते. ही मशीन्स प्रिंट, फोटोकॉपी, स्कॅन्स. ड्युप्लेक्स प्रिंट ही सर्व कामे करू शकते. विंडोजच्या सर्व्हर २००३ पासून विंडोज ८ ओएससोबत हे मशीन्स व्यवस्थित कार्यरत राहू शकतात. वापरातील सर्वच पेपर साईज म्हणजे ए३, ए४, ए५, लिगल इत्यादी आकारांची प्रिंटिंग यात करता येते. अधिक माहितीसाठी - या वेबसाईटवरील यादी तपासा काहीशी अशीच वैशिष्टे असलेला, क्षमतेत थोडीशी मार खाणारे कलर प्रिंटरही उपलब्ध आहेत. कलर प्रिंट व स्कॅनिंग करण्यासाठी त्यांचाही व्यावसायात नक्की उपयोग होतो. त्याची माहितीही या लिंकवर मिळेल .

 

यामशीनसोबत प्रिंटिंगसाठी पुरक गोष्टी म्हणजे प्रिंटिंग कार्टरेज. कागदावर उमटणारी शाई समसमान तसेच आवश्यक प्रमाणात उमटावी यासाठी ते अतिशय महत्त्वाचे आहे. त्याच्या वैशिष्ट्ये अन किंमतीबद्दल जाणून घेण्यासाठी - इथे भेट द्या

याचसोबत टीशर्ट – मग – यांवरही डिझाईन प्रिंट करून ते गिप्ट आयटम्स म्हणून कस्टमाईज करून दिले जातात. त्याचेही प्रिंटिंग मशीन तुमच्या व्यवसायाला उपयुक्त ठरू शकतात. २डी मोबाईल कव्हर, कुशन पिलो, बेडशीट्स यांचीही प्रिंटिंग या मशीनद्वारे तुम्हाला करता येईल. - हे तपासा

 

मार्केटिंग

कोणत्याही व्यवसायासाठी मार्केटिंग ही अत्यंत आवश्यक बाब ठरते. प्रिंटिंग अन फोटोकॉपी व्यवसायही याला अपवाद नाही. प्रिंटिंग आणि फोटोकॉपी बिजनेससाठी मार्केटिंग करायची झाल्यास इतर व्यावसायिकांपेक्षा कमीत कमी किंमतीत तुम्ही काम करून द्यायला हवीत. याचे कारण तुमच्याकडे येणारे ग्राहक हे बहुतांशवेळा हे कार्यालयसंबंधित, विद्यार्थीवर्गातील असणार आहेत. अन त्यांना, कमीत कमी किंमतीत- वेळेत अधिक अधिक काम करून हवे असते. तेव्हा अशावेळी तुम्ही जर त्यांच्या गरजा, अपेक्षेनुसार पूर्ण करून देऊ शकलात तर ग्राहक जोडले जाण्यात ही गोष्ट तुमच्या फायद्याचीच ठरू शकते. अन, अशाप्रकारे तुमची मार्केटिंग यशस्वी होऊ शकते.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडा २ रा - रोजच्या रोज करा सोशल मीडिया मार्केटिंग - कंटेट इज अ किंग

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

आपण ट्वीटर मॅडमला ओळखता का? - ब्लॉगमालिका