विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...

Nokia चा ५ कॅमेरा असलेला नवीन स्मार्टफोन Amazon द्वारे लाँच

नोकिया स्मार्टफोन 5 कॅमेरा असलेला स्मार्टफोन

भारतातील मोबाईलच्या बाबतीत लोकप्रिय झालेली कंपनी नोकियाने (Nokia)आपला नवा स्मार्टफोन Nokia 5.3 लाँच केला आहे. नोकियाचे भारतीय ग्राहकांचे फार जुने आणि घट्ट असे नाते आहे. नोकियाचे बेसिक फोन्स आजही अनेकांच्या हातात तुम्हाला पाहायला मिळतील. मात्र बदलत्या काळानुसार नोकियाने आपल्या फोनमध्ये बदल करत आपला नवा स्मार्टफोन Nokia 5.3 लाँच केला आहे. हा स्मार्टफोन ऑनलाईन शॉपिंग साइट अॅमेजॉन (Amazon) आणि नोकियाच्या अधिकृत साइटवर विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. या स्मार्टफोनचे खास वैशिष्ट्य म्हणजे यात 5 कॅमेरे (5 Camera) देण्यात आले आहे.


या स्मार्टफोनमध्ये 6.55 इंचाची HD+ स्क्रीन देण्यात आली आहे. ज्याचे रेश्यो 20:9 इतका आहे. या फोनमध्ये सेल्फी कॅमेरा नॉच आहे. हा स्मार्टफोन Snapdragon 665 चिपसेटसह 4GB/64GB आणि 6GB/64GB अशा दोन वेरियंट उपलब्ध केला आहे. यातील 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजची किंमत 13,999 रुपये असून 6GB रॅम आणि 64GB स्टोरेजची किंमत 15,499 रुपये इतकी आहे. 

याच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, यात 13MP चा प्रायमरी कॅमेरा, 5MP चा अल्ट्रावाइड सेंसर आणि 2MP चे दोन अन्य कॅमेरे देण्यात आले आहेत. ज्यात एक मॅक्रो आणि दुसरा डेप्थ सेंसर आहे. या फोनमध्ये 8MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.


Nokia 5.3 स्मार्टफोनच्या बॅटरीविषयी बोलायचे झाले तर, यात 4000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन Android 10 वर चालतो. Nokia 5.3 स्मार्टफोन Google Android One प्रोग्रामसह बाजारात आणला आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडा २ रा - रोजच्या रोज करा सोशल मीडिया मार्केटिंग - कंटेट इज अ किंग

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

आपण ट्वीटर मॅडमला ओळखता का? - ब्लॉगमालिका