विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...

झलक दीखला जा...हिमेश भाई तू गाये जा !

झलक दीखला जा, हे अक्सर सिनेमातील गाणे. याला हिमेशने संगीत दिले होतं. अन या गाण्यात हिरो होता इम्रान हाश्मी. हे गाणं आलं  तेव्हा हिमेश-इम्रान एकदम दर्दी कॉम्बिनेशन झालं होतं. इम्रान हाश्मीचे सिडक्टिव्ह दृश्य, रोमँटिझम, डोळे यातून तो अभिनयाची छाप न पाडताही भाव खाऊन जायचा. तर, डोक्यावर टोपी घालून हिमेशही गाणे म्हणताना पडद्यावर दिसायचा. तो गाणे गळ्यातून नव्हे तर नाकातून गायला लागला होता. तेव्हा तो हीट झाला.

 

  
 त्याची गाणी बास-ट्रेबलसह रिक्षा रिक्षांमधून ट्रेंड होऊ लागली होती. माझा तेव्हा छंद होता. कोणत्याही रिक्षांमधून टेपचा (हो त्याकाळी सीडी प्लेयर अभावानेच असायचा, टेप मात्र होते) आवाज आला की शक्य होईल तितके कानात त्राण आणून मी ते गाणे ऐकायचा प्रयत्न करायचो. तो एक ढीकचीक ढीकचीक धिंकच्याक ढीच्याक रिदम ऐकेल्यावर उत्साह चढायचा, नस सळसळतं राहायचं. 

तर, पुढे मग इम्रान हाश्मी अन हिमेश ही जोडी फिक्स्ड झाली. दोघे पिक्चर भले आपटीबार करायचे. पण त्याचे गाणे मात्र ब्लॉकबस्टर हीट बनायचे. अक्सरच्या आधी आशिक बनाया आपनेला लोकांनी डोक्यावर घेतले होते. तसा इम्रान तुमसा नही देखा या त्याच्या पहिल्या चित्रपटातील किसनेच चर्चिला गेला. मग मर्डरने तर त्याला पौगंडावस्थेतील मुलांपासून युवकांना भूरळच घातली. त्याच्या प्रेक्षकांना कथा सिनेमात अभावानेच हवी असायची, त्याची बोलण्याची, चुंबनाच्या लकबीवरच लोक फिदा होते. तर हिमेश रेशमिया ज्या बीट्स द्यायचा, अन नाकातून जो "आलाप" काढायचा, त्यापुढे सगळे गुंग व्हायचे. आशिक बनाया आपने या चित्रपटाला त्याने अक्षरशः धुमाकूळ घालायला लावला. एक भन्नाट अन विचित्रच लव्हस्टोरी या सिनेमातून मांडली होती. त्याच्या शीर्षक गीताला हिमेशने न्याय दिला होता. ठिस-ठिस बीट्स, अन हिमेशचा नासिकेतून निघणारा सूर हे एक ईव्हील कॉम्बिनेशन बनून गेलं. त्यावेळी या दोघांचे खूप फॅन्स झाले. 

हिमेश-इम्रान यांनी टीका पण तितकीच झेलली. आजही अनेकांना ते पडद्यावर सहन होत नाहीत. अगदी डोळ्याच्या, कानाच्यापण. तरीही दोघे प्रसिद्ध होण्यात प्रेक्षकांनीच उचलेला वाटा मोठा आहे. आज दोघांना मराठीतल्या अलका कुबलसारखा स्वतःचा प्रेक्षकवर्ग आहे. अनेक नव्या हिरोईन, फिमेल सिंगर यांना त्यांनी ब्रेक दिला आहे. (समकालीन उदाहरणाचा उहापोह इथं उचित नाही) हो, अनेकवेळा टीका झेलूनही दोघे आजही चित्रपटसृष्टीत टिकून आहे. भट्ट कॅम्पच्या चित्रपटांनी इम्रानला अभिनेतेपद मिळवून दिले. जन्नतने त्याला पैसे,कीर्ती, प्रसिद्धी सगळंच मिळवून दिले. तर, हिमेश पण छोट्या-मोठ्या ब्रेकनंतर प्रेक्षकांच्या कानांवर गुंजत, हिंदकळत राहिला. मध्यंतरी त्याने अक्षय कुमार, स्वतःसाठी पण गाऊन बघितले. 

आपका सुरूर हा त्याला लोकप्रियतेच्या टोकावर नेऊन ठरणारा अल्बम त्याने बनवला. त्यातील गीतांनी लोकांच्या हृदयाच्या तारा छेडल्याच. जुनी खटले, भळभळत्या जखमा पुन्हा हिरव्या झाल्या. नाम हे तेरा या गाण्याने तर मिसेस रणवीर सिंग यांना बॉलिवूडचा दरवाजा उघडून दिले गेला. इतरही जी गाणी होती, त्यात ती लिहिणाऱ्याचाही तितकाच जबरदस्त वाटा होता जितका हिमेश रेशमियाचा होता. हिंदीतील एकेक शब्द सोनकळा त्याच्या या गाण्यात होते. अगदी सहजसोपे, ओठांवर पटकन रूळणारे, काळजात रुतणारे हे शब्द होते. त्यात त्या हिमेशच्या दर्दभरल्या आवाजात आणखीनच डोक्यात फिट्ट व्हायचे.
 
हिमेशचे एक गाणे होते, दिल दिया है चित्रपटातलं, अर्थात इम्रान हाश्मी, तनुश्री त्यात होते. 'अफसाना बनाके भूल न जाना, दिवाना बनाके दूर न जाना' कसला दर्दभऱ्या शब्दांत प्रेमी त्याचे म्हणणे मांडतो. त्याला आवाज हिमेशचा अन यात वाजलेले चर्मवाद्य, व्हायोलिन, सनई सगळंच कानात एकदम ठुसठुसतं..अनेक गाण्यांत शास्त्रीय वाद्यांचा त्याने अत्यंत खुबीने नजाकतीने वापर केल्याचे ऐकू येईल. वीणा, सतार सहित अनेक वाद्य यात येतील.


चला शेवट या ओळींनी, जमलं तर या गाण्याचे गायकांची नावे ओळखा अन कमेंट करा

आशिकाना आलम है इश्क निभा जा।
आजा आजा आजा जनाबे आली आजा ।

-© विशाल लोणारी, २०१९

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडा २ रा - रोजच्या रोज करा सोशल मीडिया मार्केटिंग - कंटेट इज अ किंग

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

आपण ट्वीटर मॅडमला ओळखता का? - ब्लॉगमालिका