विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...

आपण ट्वीटर मॅडमला ओळखता का? ब्लॉगमालिका - २

पहिल्या भागात आपण संचिका पांडेय यांचं व्यक्तिमत्त्व जाणून घेतले. या भागात त्यांनी मुंबई ट्वीटर हँडल कसे सुरू केलं हे वाचणार आहोत. पुढील भागात त्यांच्या कामाबद्दल अधिक माहिती जाणून घेता येईल. पहिला भाग वाचला नाही का? पहिला भागाची लिंक  
वरील लिंकवर क्लीक करून आधीचा भाग वाचा  .


पुढे सुरू….

 पोलिसांची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न – २०१५ साली संचिका यांनी बंगळूरू पोलिसांचे ट्वीटर हँडलचा बारकाईने अभ्यास केला. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की बंगळुरू पोलीस हे लोकांशी त्यांना समजेल अशा भाषेत त्यांच्याशी संभाषण करत होते.  ही सगळी अगदी तत्काळ होणारी प्रक्रिया होती. या दुतर्फा प्रक्रियेत सहभागी प्रत्येकच जण समाधानी होत होता. लोकांशी वेळोवेळी संवाद साधून वाटाघाटी सुरू ठेवण्याच्या या प्रयत्नांबद्दल संचिका या खूप खुश झाल्या. त्यानंतर त्यांनी याबद्दल मुंबई पोलिसांच्या उच्च अधिकाऱ्यांनाही याबद्दल सजग केले. याविषयी संचिका यांनी एके ठिकाणी सांगितले, “मुंबई पोलिसाच्या पोलीस दल ही प्रतिमा पोलीस सेवा अशी रूपांतरित व्हायला हवी. याबद्दल मी उच्च अधिकाऱ्यांना वेळोवेळी सांगत राहिले. अशा प्रकारचे नाते पोलिसांचे लोकांशी असायला हवे. सामान्य नागरिक व पोलीस अधिकारी यांच्यात एक खोल दरी तयार झाली होती. जी मिटणे आवश्यक होते. याबद्दल त्यांनी संवाद साधणे हीच या गोष्टीची पहिली पायरी असल्याचा युक्तीवाद संचिका करत होत्या. 

मुंबई पोलीस ट्वीटर ची पार्श्वभूमी – मुंबई पोलिसांना ट्वीटरवर आणण्याआधी संचिका व त्यांच्या चमूने तीन ते चार महिने संशोधनपर अभ्यास केला. ट्वीटर हँडल कसे वापरायचे याबद्दल त्यांनी बारकाईने काही मुद्दे तपासले. अनेक ठिकाणांहून माहिती गोळा केली. त्यातील तथ्ये, निरीक्षणे नोंदवली. यात त्यांच्यासोबत मुंबई पोलिसांचे आयटीतज्ज्ञ ही सहभागी होते. ट्वीटर हे फेसबुक, व्हॉट्सअपपेक्षाही अधिक प्रभावशाली माध्यम आहे. त्याचा अनेकांनी सकारात्मक फायदा होऊ शकतो. याबद्दल मुंबई पोलिसांना संचिका यांनी सजग केले. त्यात अनेक पोलीस हवालदार, अधिकारी वर्ग यांच्या त्यांनी कार्यशाळा घेतल्या. ट्वीटरवर लोकांनी साधलेल्या संवादास कसा प्रतिसाद नोंदवावा याबद्दल संचिका यांनी प्रशिक्षित केले.  तरूण वर्ग व्हॉट्सअप, फेसबुकवर सर्वीधिक वेळ वाया घालवत असताना त्यांनी ट्वीटरच्या जादूने सगळ्यांनाच चकित व्हायला लावले.

 संचिका यांच्या पोलिसांना सूचना –   संचिका यांचे म्हणणे होत की, प्रत्येक पोलीस खात्याने ट्वीटर खाते सांभाळण्यापूर्वी काही मार्गदर्शक तत्वांचे पालन करायला हवे. माहितीचा प्रसार करण्याआधी सावधानता बाळगायला हवी. समजा तुम्हाला १०,००० लोक जोडले गेले आहेत. तर, तुम्ही प्रदर्शित केलेली प्रत्येक माहिती त्यांतील सगळ्यांना दिसत असते. मुंबई पोलिसांना जवळपास ५ लाख लोक फॉलो करतात. एक छोटीशी चूकही आतापर्यंतच्या मेहनतीवर पाणी फेरणारी ठरू शकते. या काही गोष्टींची समज कोणत्याही पोलीस खात्याला सोशल मीडियावर वावरण्यापूर्वी असायला हवी. लोक कशाप्रकारे प्रतिसाद करू शकतील याची पोलिसांना खात्री असायला हवी, किमान प्राथमिक अंदाज तरी त्यांना अचूक असायला हवा. जेव्हा पोलीस सोशल मीडियावर येतील, तेव्हा ते लोकांसाठी आहेत, जनतेसाठी आहेत. असंच साऱ्यांना वाटायला हवं. अशी पुष्टीही संचिका यांनी जोडली.  

मित्रांनो, तुमच्या उत्सुकतेला जरा धीर धरावा लागणार हं.. आजचा भाग इथेच थांबवतोय. पुढील भागात संचिका पांडेय यांनी मुंबई पोलिसांची ‘दल ते सेवक’ अशी कशी परिवर्तित केली याबद्दल वाचायला मिळणार आहे.. 
हा ब्लॉग शेअर करा, फॉलो करा अन आपल्या मित्र मैत्रिणींना जरूर वाचण्यासाठी द्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडा २ रा - रोजच्या रोज करा सोशल मीडिया मार्केटिंग - कंटेट इज अ किंग

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

आपण ट्वीटर मॅडमला ओळखता का? - ब्लॉगमालिका