विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...

आपण ट्वीटर मॅडमला ओळखता का? - ब्लॉगमालिका


  • आपण ट्वीटर मॅडमला ओळखतात का ?- ब्लॉगमालिका 
  • २०१६ सालच्या जुलैची गोष्ट आहे. दोन तरूणी रिक्षाने प्रवास करत मुंबईतील खार येथून चालल्या होत्या. तेव्हा त्यांच्याकडे बघून एका मोटरसायकलस्वाराने त्याचे जननेंद्रिय उघडे करून दाखवत अश्लील चाळे करण्याला सुरूवात केली तेव्हा हे पाहून त्यांना धक्काच बसला. क्षणाचाही विलंब न करता प्रसंगभान राखत त्या मुलींनी त्याचा फोटो क्लीक केला. अन, तो मुंबई पोलिसांच्या ट्वीटर हॅंडलवर पोस्टही केला. 

  • गुन्हेगाराला अटक - तीन तासांच्या आत त्या व्यक्तीच्या मुसक्या आवळल्या गेल्या. मागील वर्षी जुलै महिन्यात क्ष तरूणीस व्हॉट्सअपवर एक मेसेज आला. अज्ञात व्यक्ती त्या तरूणीस तिचे आक्षेपार्ह छायाचित्र पाठवण्याचा दबाव आणत होता. तसे, न केल्यास तिचे फोटोशॉप्ड फोटोज व्हायरल करण्याची धमकी त्या मेसेजमार्फत देण्यात आली होती.

  • “भांबावलेली अन घाबरलेली असताना मी याबद्दल मुंबई पोलिसांना सतर्क केलं. थोड्याच वेळात माझ्या ट्वीटवर त्यांनी प्रतिक्रिया दिली. जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्यावर असलेल्या एका महिला पोलीस अधिक्षकासोबत मला जोडून दिले. एफआयआर दाखल करण्यात त्या महिला अधिकाऱ्यांनी माझी मदत केली. ज्यानंतर मी सुटकेचा निश्वास टाकू शकले.”  माध्यमांशी बोलताना सदर तरूणीने ही प्रतिक्रिया दिली.

  • सतर्क मुंबई पोलीस -  प्रतिसादात्मक, मदतगार आणि खुशमस्करी करणारे असे हे मुंबई पोलीस ट्वीटर हँडल आहे. या ट्वीटर हँडलरची ‘Amul of government Social Media Accounts’ अशीही करून देण्यात येते. डिसेंबर २०१५ ला अस्तित्वात आल्यापासून हँडलरवर अनेकदा स्तुतीसुमने उधळली गेली आहेत.

  • तुम्हाला सांगायला आवडेल, या सगळ्यांच्या पाठीमागे बराच काळापासून मुंबई पोलिसांचे ट्वीटर अकाऊंट सांभाळणाऱ्या एक महिला तसेच त्यांच्या महिला सदस्यांच्या चमूची मेहनत आहे. मुंबई पोलिसांचे ट्वीटरवरील कंटेट अन क्रिएटीव्ह कन्सलटन्सी सांभाळणारी एक महिला आहे, याबद्दल अनेकांना माहितीही नसावी.

  • ट्वीटर हँडल सुरू करण्यापासून मुंबई पोलिसांच्या सोबत संचिका पाण्डेय या काम करत आहेत. समाजमाध्यमांवरील छोट्यातली छोटी गोष्टही सुटू नये यासाठी त्या व त्यांचे सहकारी मदत करत असतात. अज्ञात बॅगेविषयी पोलिसांना सूचित करण्याबाबतच्या मीम्समध्ये तर त्यांनी अगदी गेम ऑफ थ्रोन्सचाही आधार घेतला होता. मुंबई पोलिसांची सोशल मीडियावरील हालचाल योग्य दिशेने होण्यासाठी संचिका व त्यांच्या चमूने आजवर खूप मेहनत घेतली आहे. 

  • तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्तांनी त्यांची सर्जनशीलता, कल्पकता, चातुर्याची प्रशंसा करत ‘ट्वीटर मॅडम’ अशी उपाधी संचिका यांना दिली होती. त्यांचे नाव उच्चारण्यास अवघड असल्याने आज शहरातील प्रत्येक पोलीस कर्मचारी ‘ट्वीटर मॅडम’  म्हणूनच संबोधतो.

  • Sanchika pandey standing
  • (मुंबईतील सगळ्या उंच पोलिसासमवेत संचिका पांडेय 👆)
  • कोण आहेत या ट्वीटर मॅडम - रांची येथे जन्मलेल्या अन वाढलेल्या संचिका या पत्रकार होण्यासाठी म्हणून मुंबईत २००४ साली आल्या. पुढच्याच वर्षी त्यांना एका स्थानिक वृत्तवाहिनीत नोकरी करण्याची संधीही मिळाली. 

  • याबद्दल सांगताना संचिका म्हणाल्या,“गुन्हेगारी विश्वाची पत्रकार म्हणून काम करताना, मला आपल्या अवतीभवती पसरलेल्या कटू वास्तवाची जाणीव सतत होऊ लागली. नागरिकांमध्ये जागृती निर्माण करायला लावणारे हेच माझं खरं शिक्षण होतं समाजाची सेवा जोडली गेली असल्याने पत्रकारिता करण्याचे ध्येय्य अगदी लहानपणापासूनच मी बाळगले होतं. परंतु, पुढे माझा भ्रमनिरास होत गेला. यामुळे २०१३ साली मी मुख्य प्रवाही पत्रकारिता सोडली” अशी पुष्टीही त्यांनी केली. त्यांचे आतापर्यंत मुंबई पोलिसांसोबत चांगले संबंध प्रस्थापित झाले होते.  

  • सत्यमेव जयते मध्येही काम केले - संचिका यांनी अनेक वृत्त संस्थांमधून काम केले. त्यानंतर त्यांना सत्यमेव जयते या टीव्ही कार्यक्रमात काम करण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता आमीर खान याने केले होतं. या कार्यक्रमात भारतातील विविध लोकांना देशातील सामाजिक प्रश्नांची जाणीव करून देणं असे होते. 

  • या कार्यक्रमासाठी त्यांनी वरिष्ठ विभागीय पत्रकार म्हणून काम बघितले. आधी गुन्हे पत्रकारिता म्हणून काम केल्याच्या अनुभवाचा त्यांना येथे फायदा झाला. सहा महिने ऑन फिल्ड शोध पत्रकारिता केल्यानंतर त्यांनी या कार्यक्रमाचा निरोप घेतला. त्यानंतर दोन महिने त्यांनी स्वतःसाठी वेळ दिला. दोन महिन्याच्या विश्रामानंतर त्यांनी आपली पत्रकारितेची घौडदौड पुन्हा सुरू केली.  सत्यमेव जयते या कार्यक्रमाच्या सोशल मीडिया मॅनेजमेंटची धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळण्यास सुरूवात केली. याचसोबत अनेक डिजीटल व्यासपीठांशी त्या संलग्न होत्या.

  • संचिका यांची मुंबई पोलिसांत एन्ट्री कशी झाली? याबद्दल वाचा पुढील पोस्टमध्ये..
  • हा ब्लॉग आवडला असल्यास फॉलो करा,कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका……..

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडा २ रा - रोजच्या रोज करा सोशल मीडिया मार्केटिंग - कंटेट इज अ किंग

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह