मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

this blog is dedicated to work of my passion. I want to speak, write, displays my creativity, I want to tell the world few words about me, so I created this blog. It has some affilate connections also, that gives me little bit pleasure of selling also, I educate from here by sharing knowledge to the people. I welcome to all my readers, followers, admirer, thanks to all who loves me. I will be updating this blog in each month with full of new things, based on happenings, politics, and many more.
फ्लिकर सिंगचा धडाकेबाज 'सुरमा'
सुरमा एक चांगला बायोपिक आहे. राष्ट्रपती पदक विजेत्या फ्लिकर सिंगचा असल्याने, त्यात कोणतीच काँट्रॅव्हर्सि नाही.त्यामुळे बॉक्स ऑफिसवर दमदार प्रदर्शन कदाचित दिसणार नाही.
पण गोळीबंद पटकथा ज्याला म्हणता येईल अशी गोष्ट आहे सुरमा ची. कितीही अडचणी आल्या तरी कुठल्या एका ध्यासापायी वेडा झालेली व्यक्ती आव्हानांना ड्रॅग फ्लिक मारून कधीही अगदी आयुष्यात कधीही गोल करू शकते. आपलं लक्ष्य मिळवू शकते.
पहिल्या भागात आपलं प्रेम, सुखी संसार यापाठी धावताना संदिप सिंग हॉकी खेळायला लागतो. लहानपणी त्याला हॉकीत फार काही जमत नसते. त्याचे प्रशिक्षक रोज फक्त शिक्षा देत जातात. अशा जीवघेण्या शिक्षेतून संदीप यांचे आजोबा त्याला शेतात पाखरं हुलगवायला नेतात. तिथं असणाऱ्या हॉकी स्टिकने संदीप सिंग दगडालाच बॉल समजून पाखरं हुलगावायला लागतात. अशीच नऊ वर्षे निघून जातात.
तिकडे संदीपचा भाऊ मात्र उत्कृष्ट हॉकी खेळाडू बनतो. पण, भारतीय संघाकडून त्याला खेळता येत नाही. मग तो संदीपलाच त्याचं स्वप्न पूर्ण करायला तयार करतो. दरम्यान हरप्रित अन संदीप यांचं पहिल्या भेटीत डोळ्यात डोळे घालून प्रेम जुळते. तिला खुश करण्याच्या नादात येत नसलेली हॉकी पण तो खेळतो. हरप्रित मात्र महिला हॉकी संघात सामील असते. तिला जिंकायची तर तिचे काका, म्हणजेच संदीप सिंग यांचे प्रशिक्षकांकडेच जायचं असते. त्यामुळे त्यांच्यापुढे संदीप यांची डाळ शिजत नाही. प्रेमाचं कळाल्यावर तर प्रशिक्षक त्याची हॉकी खेळणं बंद करू पाहतात. त्यांचीच पुतणी असलेल्या हरप्रीतसमोर संदीपला खूप मोठी शिक्षा देतात.
हे अशाप्रकारे संदीपचं हॉकीचा होत असलेला बोजवारा बघून संदीपचा विरेची सटकते. तरीही तो संदीपला पटियालाला नेऊन हॉकीचे प्रशिक्षण देती. तिथल्या कोचकडून अगदी 'सुरमा' बनून जातो. इतकंच काय भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय सामना खेळायला जाण्यातही संदीप सिंग निघतात, पण..........
अरे, हे मध्येच 'पण' कसा आला. तर, या 'पण' च्या पुढे संदीप सिंग यांनी घडवलेल्या इतिहासाची गोष्ट पडद्यावरच बघायला जा. अर्जुन पुरस्काराने सन्मानित होण्यापर्यंत त्यांचा प्रवास आपल्या अंगावर रोमांचाचे शहारे आणल्याशिवाय राहत नाही.
पटियालाला असलेले बिहारी कोच जी भूमिका विजय राज यांनी अगदी अभिनयाचे नेट फाडून टाकत केली आहे. कॉमेडीत असणारीच ती संवादफेक इथल्या चरित्र भूमिकेत बरहुकूम उतरवली आहे. अंगदबेदीनेही उत्तरार्धात दलजीतसोबतच्या प्रसंगात गगनभेदी अभिनयाचे प्रदर्शन दाखवलं आहे. तापसी अगदी तावून सुलाखून निघाली या भूमिकेने पण श्रमांचं चीज इतकं झालं की तिच्या वाखाणण्याजोगी अभिनयाने चित्रपटात उतरलं आहे. बाकी सर्व कलाकारांची फौज तगडीच आहे. वानगीदाखल सांगायचं झालं तर अभिनयाचा मास्टरस्ट्रोक मारणारे सतीश कौशिक आहे, पहाडी अभिनय, आवाजाचे भारदस्त व्यक्तीमत्व कुलभूषण खरबंदा आहेत. दलजीतच्या भूमिकेला सगळ्यांची पूरक, साजेशी साथ आहे. पटकथेची मोट आपल्या आटोपशीर पण खिळवून टाकणाऱ्या दिग्दर्शनाने शाद अली आपली वाहवा तर नक्कीच मिळवतो.
संजूच्या तुलनेत हा सिनेमाला झाकोळवून टाकू नका. आपल्या देशाचा जीवंत असा, गर्वाने, अभिमानाने छाती फुलवून टाकणारा इतिहास म्हणून 'सुरमा' नक्की सिनेमागृहात जाऊन बघा. तांत्रिकदृष्ट्या 7.1 सराऊंड साउंडचा अनुभव तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर आयुष्यात येऊ शकणार नाही.. सिनेमा फोटोग्राफीत ठीक ठाक म्हणजे कुठल्याही नावीन्य प्रकारे ती दिसली नाही. पण, डोळ्यांना उत्कृष्ट चित्र दिसते. कॅमेरा अँगल डोळ्यांच्या बाहुल्यांना व्यायाम करायला लावत नाहीत. संगीत ही एक जमेची बाजू आहेच.शंकर एहसान लॉय यांचा अनुक्रमे सूर, लय, ताल याचसोबत पार्श्वसंगीत पण हृदयस्पर्शी झालंय. हिरो जिथं थिरकतो ते ही हृदयाला भिडेल इथपर्यंतच मजा देते.
एकंदर काय म्हणता येईन, तर हा सिनेमा खरोखरच 'सुरमा' झाला आहे. बघायला हवाच या सेगमेंटमध्ये लिस्ट करता येईल. बरं, माझ्या मनातील याची स्टार रेटिंग हा रिव्ह्यू कम परीक्षण कम रसग्रहण परत एकदा वाचलं तरीही तुम्हाला कळून जाईनच. अन, माझ्या रेटिंगवर सिनेमाचे भविष्य ठरायला मी टाइम्सच्या सेलेब्रिटी लेखक नाही.. त्यामुळे हा लेख आवरता घेतो. भरपूर पॉझिटिव्हीटी भरून घेतलीये. मजा आली आज पिक्चरला....👍👍👍
© विशाल लोणारी 2018
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा