विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...

बसस्टॉप

बसस्टॉप

बसस्टॉप हा बसने प्रवास करणाऱ्यांच्या आयुष्यात अनेक अनुभव आणत असतो.

मी मागे पुण्याहून येताना शिवाजीनगर बस स्टॅन्डला थांबलो होतो. एक प्रेमी युगल बसलेलं, ना कुठं जायचं होतं, ना कुठून ते आले होते..फक्त एकमेकांत रमायचे होते म्हणून बसलेले... साईडला मोबाईल चार्जिंग लावून बसला की दोन गोष्टी आपोआप घडतात, बसायला कोपरा मिळतो आणि वेळही..

असाच एक अनुभव मला, नाशिकच्या एक बस स्टॉपने दिला होता. तेव्हा कागदावर झरझर काळे निळे शब्द उतरवणारे माझे हात, अँगल सेट करायला, अन तोंडातून ऍक्शन असे उच्चार बाहेर पडले. मी बाळबोध मुलासारखा एक लघुपट बनवलेला, डिसेप्शन ....

कधी कधी काही बसस्टॉप न मला सुन्न करुन गेले आहेत. एकदा मी कॅमेरा हातात घेऊन, एका बसस्टॉप वर गेलेलो, माझ्या सहकारी रिपोर्टरने प्रश्न विचारलेला, की मुली तू या बसस्टॉप वर उभी आहेस, काय वाटतं तुला इथं उभं राहून.. हो, पत्रकाराने समोरच्यातील सर्जनशीलतेला थोडी तरी चालना द्यायला हवी असं नेहमीच वाटत आले आहे. अशा आकस्मिक अन नेहमीच्या पठडीच्यापेक्षा वेगळ्या प्रश्नाने, तिचे डोळे भरून आले, अन तिने जे सांगितलं ते अचंबित करणारे होते..

मला आजही आठवतं, खेडोपाडी असे अनेक बसस्टॉप असतात, जिथे तासंतास फक्त बसची वाट बघत बसावे लागते, कचकूच आवाज करत ती येते, तोपर्यंत धुळीचेच दळणवळण घडत असते...

आयुष्यात सगळ्यात जास्त रोमांचकारी अनुभव दिले, ते मला कॉलेजरोडच्या बसस्टॉपने, अनोळखी चेहरे खूप दिसायचे, किती किती त्यांच्या गप्पा असायच्या, मग शॅम्पू टिकली पासून ते कॉलेजातील लेक्चर्सपर्यंत बरेच जण बऱ्याच गप्पा मारत असत.

मला आठवतं, मी कधी उगाच फिरायला निघालेलो असलो, की ती ही यायची..आपसूक तिच्या आवडत्या रंगाचा ड्रेस घालून, अन मला नव्याने तो रंग समजायचा, मी तो रंग अंगावर चढवून घ्यायचो...ती म्हणजे माझीच सर्जनशीलता, माझ्या कितीतरी कविता या बसस्टॉप बसूनच पूर्ण केल्या आहेत.....

एकदा तर चक्क ठरवलं होतं, घराच्या बसस्टॉपपासून कॉलेजच्या बसस्टॉप पर्यंत पायीच जायचं, तर अख्खी एक कथा लिहून पूर्ण झालेली... ज्यात ती तिच्या आईसोबत रस्ता क्रॉस करत असतो तर तिचा तो मात्र, त्याच्या मोबाईलमध्ये गढून रस्त्याने चाललेला, पण तिला अन तिच्या आईला एक कार धडक मारुन निघून जाते, तेव्हा कारच्या मोठ्या आवाजाने तो भानावर येतो, अन पुढे मात्र काहीच घडत नाही, म्हणजे ती तो एकमेकांना भेटतात वगैरे वगैरे, कारण वास्तवात असं काही घडत नसते... एक बस स्टॉप मात्र मला, फार विदारक अनुभव देऊन गेला आहे, तो न सांगितलेला ठीक आहे..

पण सगळ्यात आवडता किस्सा, म्हणजे आमच्या घरासमोरचा बसस्टॉप संध्याकाळी(ही) नाजूक कळ्या आणि फुलांनी बहरलेला असायचा, आणि मी दुरूनच त्यांचा अदमास घेत असायचो.

विशाल लोणारी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडा २ रा - रोजच्या रोज करा सोशल मीडिया मार्केटिंग - कंटेट इज अ किंग

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

आपण ट्वीटर मॅडमला ओळखता का? - ब्लॉगमालिका