मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

this blog is dedicated to work of my passion. I want to speak, write, displays my creativity, I want to tell the world few words about me, so I created this blog. It has some affilate connections also, that gives me little bit pleasure of selling also, I educate from here by sharing knowledge to the people. I welcome to all my readers, followers, admirer, thanks to all who loves me. I will be updating this blog in each month with full of new things, based on happenings, politics, and many more.
आई
तुझ्याविषयी काय बोलू
तुझं वर्णन मी काय करू
कोणती तुला देऊ उपमा
मला समजत नाही
आज मला तुझ्यापासून दूर
खरंच करमत नाही
तुला डोळे भरुन पाहावंसं वाटतं
तुझ्या कुशीत मला शिरावंसं वाटतं
मात्र नाही करू शकत यापैकी काही
म्हणून डोळ्यात आसवांना जागा पुरत नाही
निजल्यावरही माझा हुंदका, मला आवरत नाही
रोज उठता टोचून घेतो मी बालपणीच्या आठव सुया
कंठ दाटून येता मिटल्या डोळ्यांना माझ्या जाणवते तुझी माया
तुझ्या विचारांसारखा दुजा मला मनमीत नाही
या, दुनियेच्या कडवट अनुभवांना आता भीत नाही
तू माझ्या मनाचा गजर
पापणी उघडता तू डोळ्यात साठते
हृदयातून तेव्हा माझ्या रक्ताची
एक हळवीशी धार वाहते
काव्याचा अंत हा खरा अंत असणार नाही
तुझ्याबद्दल लिहिताना लेखणी कधी थकणार नाही
आई
तुझ्याविषयी मी काय बोलू
तुझ्याबद्दल मी काय लिहू
तू नाहीस जिथे ते जग वाटते मला निखारी
खरं सांगून गेले, स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी
विशू
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा