मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

this blog is dedicated to work of my passion. I want to speak, write, displays my creativity, I want to tell the world few words about me, so I created this blog. It has some affilate connections also, that gives me little bit pleasure of selling also, I educate from here by sharing knowledge to the people. I welcome to all my readers, followers, admirer, thanks to all who loves me. I will be updating this blog in each month with full of new things, based on happenings, politics, and many more.
सीन १
स्थळ : बस स्थानक
पात्र : मुलगी १, मुलगी २ (कॉलेजला जाणाऱ्या मुली)
मुलगी १ : शी बाई ! अजून कशी येत नाही बस, रोज इतका उशीर नसतो होत ना ?
मुलगी २ : तू कशाला डोक्याला शॉट लावून घेतेस गं, ट्राफिकमध्ये अडकली असेल येईन ना
मुलगी १ : नाही बाई. जरा उशीर झाला ना तरी आई रागावते मला, बाबा प्रश्न विचारुन भंडावून सोडतात, आणि दादाच्या पाच-पन्नास चौकश्या, मी काय डोळ्यात फुंकर मारते का त्यांच्या ? सतत आपलं चौकशांची हावडा मेल सोडतात अंगावर, वैताग आलाय
मुलगी २ : हम्म
मुलगी १ : मी एवढं तुला माझ्या टेंशनबद्दल सांगतेय, अन तुझी काहीच प्रतिक्रिया नाही, फक्त हम्म.... म्हैस म्हणू का तुला ?
मुलगी १ : तुला भय नाही वाटत का गं ? तुझं हे वागण्याचे बोलण्याचे? स्वतःला मोठी योद्धा समजतेस !! घमेंड दाखवतेस, कॉलेजच्या मुली सोड, मुलांना पण तू शिव्या देतेस, आणि ते ही त्या ये.....
मुलगी २ : ए, बंद कर ती तुझी बकबक, बंद कर तुझे ते रडगाणे. तुला असलेली भीती, लाज तुझ्याच छातीत घट्ट अशी दाबून ठेव, तुला त्याची जास्त गरज आहे. मी माझी सगळी दया, माया, कनवाळूपण कोळून प्यायली आहे, आणि माझ्या उरात आता फक्त धग आहे, धग. आणि काळीज ते केव्हाच दगड बनून गेलंय, समजलं
मुलगी १ : तू एक मुलगी असूनही
मुलगी २ : चले, बंद कर तुझी टिवटीव. तुझ्या घरातून तुला भरपूर सहनशीलता मोफत मिळाली आहे, नव्हे नव्हे त्याचे टोनिक तुला तर रोजच पाजले जातेय, पण माझ्यात आग आहे आणि मोठा माझा राग आहे
मुलगी १ : अगं भडकू नकोस, पण हे मुलांसारखे वागणे म्हणजे !!
मुलगी २ : आता बस्स झालं हं, उगाच मग घरच्यांच्या पक्षपातीपणावर बोलून आपण त्यांचे धिंडवडे बस स्थानकावर काढायला नको
मुलगी १ : काहीतरीच हं तुझं ? ए, ते बघ !
मुलगी २ : कसले कमालचे होते ना गं, शाळेतले दिवस
मुलगी १ : मला तर अजूनही दोन वेण्या घालून फिरायला आवडेल
मुलगी २ : तुला अजूनही आपल्या शाळेतला परश्या आठवतो का ?
मुलगी १ : तो, माझा हात धरून प्रपोज केलेलं तो
मुलगी २ : हो तोच, तो हलकट, तू थेट अश्रूंची कळशी रिकामी केलेली
मुलगी १ : चल चल, बस आली
मुलगी २ : हो, चल चल
सीन २
स्थळ : बस
पात्र : मुलगी १, मुलगी २, मुलगा १, कंडक्टर
मुलगी १ : आज लोकांचे गठ्ठेच्या गठ्ठे येणार इथे
मुलगी २ : नाहीतर काय, ते गठ्ठे येणार, मागचे पुढच्यांना चेंदणार
कंडक्टर : हा, चला तिकीट बोला, कुठं जाणार ताई
मुलगी १ : माझा पास आहे
मुलगी २ : माझं दत्त मंदीरपर्यंत द्या
मुलगी २ : कसला राडा लावलाय आज लोकांनी, बस पण गचके देत देत चालली आहे, एकमेकांवर धडक्या बसताय लोकांच्या, आणि ....
मुलगी १ : काही नाही, पायावर पाय देवून गेला
मुलगी २ : त्याच्यातर आता .....
मुलगी १ : ए जावू दे ना ? आईला नाही आवडणार मी कुठल्या मुलाशी भांडलेले
मुलगी २ : हो, ना हेच एखाद्या मुलीशी वचावचा भांडली असती
मुलगी १ : सोड बाई ! मला हा तुझा टार्गटपणा पचायचा नाही..
मुलगी २ : धन्य आहे तुझी ? तू शिक्षण फक्त मार्क मिळवण्यापुरते घेतेस का गं ? त्यातून कुठलाच अर्थबोध नसतो घ्यायचा ? इतिहास काय सांगतो एवढचं फक्त माहीत करून घ्यायचा का ? की त्याच्या शिकवणीप्रमाणे कृती करायचीच नाही का ?
मुलगी १ : मला पण वाटते, त्या मुलाच्या मुस्काटीत हाणावी. पण आईने कधी अशावेळी मारायला शिकवलंच नाही, तिने कधी अशी हिंमत दिलीच नाही
मुलगी २ : आई ! धन्यवाद ..
मुलगी १ : त्या मुली किती छान खेळत होत्या, आवो मीना....
मुलगी २ : शाळेत अशा सपक गोष्टी आणि अभ्यास याव्यतिरीक्त काय केलंस का तू ?
मुलगी १ : तुझ्यासारखी आर्ची बनून नव्हतं हिंडता येत मला, त्या बावळ्या अर्जुनाने तुला मागणी काय घातली, आबांची बुलेटच घेवून आलीस तू, किक मारली तर हो बोलते, ही कोणती जगावेगळी अट
मुलगी २ : मग, चार दिवस थोबाड लपवून फिरत होता सुक्कळीचा, माझं ना खरं डोकं तेव्हा सटकलं, जेव्हा त्या कसदार कमळीच्या गुटरगुंना, गावातला शाम झटला होता, कुत्र्यागत मार खाल्लाय त्याने, आयुष्यभर लक्षात ठेवील साला...
मुलगी १ : तू अशी स्वतःला जगावेगळे बनवलेस, का कशासाठी ?
मुलगी २ : या प्रश्नाला रोज विचारतेस तू, पाणी घालून घालून मी नवीन उत्तरे द्यायला, काय मालिकेची लेखिका वाटले का ?
मुलगी १ : मग, तुझ्या वागण्याचा बोधच कळे, ना ?
मुलगी २ : खरंच का, इतकी गूढ वाटते का ? मी तर बेफिकर, तर्हा ठेवते वागण्याची, पण असो एकदिवस तुला नक्की अर्थ समजेल माझा
सीन ३
स्थळ : मागील सीनप्रमाणेच
पात्र : मागील सीनमधलीच
कंडक्टर : चला, पुढे सरका, पुढे सरका. मागचे मागे
जा, जरा.. पुढचे पुढे व्हा, दारातले वर या, चला सरका, सरका लवकर, चला ताई व्हा थोडं मागे-पुढे व्हा
मुलगी १ : ओ थोडं नीट उभे राहा ना
मुलगा १ : मी नीटच आहे, बस मागे-पुढे हलते म्हणून धक्का बसतोय, त्याला मी काय करु
मुलगी १ : (डोळ्यातल्या भीतीने २ऱ्या मुलीकडे पाहते)
मुलगी २ : (नाक फेंदारत, डोळे बारीक करते)
मुलगा १ : (सतत १ मुलीवर धक्के मारत आहे, खेटून उभा राहतोय,रेलतोय )
मुलगी १ : अरे, हे काय तू कशी काय आलीस माझ्या मागे ?
मुलगी २ : ते महत्वाचे नाहीये.. तू युट्युब बघतेस का ?
मुलगी १ : हो, बऱ्याचदा गाणे वगैरे बघत असते मी त्यावर
मुलगी २ : अच्छा, काही नाही मला पण ते एक गाणं बघायचे होते
मुलगा १ : आई गं..( २ ऱ्या मुलीवरही रेलायला, धक्का द्यायला सुरुवात करतो. कळवळतो, शरमेने मान खाली घालून २ऱ्या मुलीपासून लांब जात उभा राहतो.)
सीन ४
स्थळ : माणिक नगर
पात्र : मुलगी १, मुलगी २
मुलगी १ : काय गं ? तो मुलगा एकदम शरमेने मागे का सरकला, आणि थोडा विव्हळला पण होता तो..
मुलगी २ : काही नाही गं, तुझ्या डोळ्यांच्या एक्स्प्रेशन्सवरुन तो हलकट तुला टोर्चर करतोय, हे मी ताडले. तुझ्या मागे उभी राहून तुला भलत्याच विषयावर घोळवत ठेवले. आणि जसा तो माझ्या अंगचटीला आला, हे बघ, ही माझी हेयरक्लीप कडकडून चावली त्याला, अशा ठिकाणी चावली ना, की जन्माचा लक्षात ठेवेल तो मला.
मुलगी १ : अगं, पण त्याने तुला काही केलं असतं म्हणजे ?
मुलगी २ : छ्या, अगं, तो काय करणार होता, नामर्द कुठचा
मुलगी १ : तुझं वागणं, स्वतः वेगळं घडवलेलं अस्तित्व आज आलंय माझ्या लक्षात सगळं. खरंच तू जे केलं ते योग्यच केलं असे मला वाटतंय. काही क्षणांपूर्वी प्राणांतिक प्रहर सोसत होते मी, वासनेच्या मद्यधुंद जनावरांकडून. कोण जाणे असे कित्येक श्वापदे रोज कुठे न कुठे तरी करीतच असतील वार, ज्या राब राब राबून रापलेल्या अंगाने चार सुगंधी फुले घरी आणणाऱ्या बापाच्या त्या सोनेरी लेकींवर, कोवळ्या कळ्या कुस्करल्या जाताना, प्रत्येकीच्या नशिबी तुझ्यासारखी बहिण येवो
मुलगी २ : अगदी खरं आहे तुझं म्हणणं. रोज पेपरात एक ना एक नराधमाचा काळवंडलेला चेहेरा समोर येतच असतो, खिन्न आणि उदास वाटत मला अशावेळी, मी आज जे काही केलं ते ह्याच उदासपणातून आलेलं माझं खरं रुप होतं, मी यापेक्षाही क्रूर वागूच शकते, जेव्हाही असे माजोरडे नाजूक कळ्यांना छेडतील, मी ठरवूनच टाकलं आहे, मारो जब भी मिले,
मुलगी १ : काय ?
मुलगी २ : माज, म्हणतेय गं यांचा
मुलगी १ : कोण जाणे, पण तुझ्यामुळे आज मला पण हिंमत आल्यासारखे वाटतंय, हे बघ मी तर शिवी पण देवू शकते....भाड***
मुलगी २ : हाहाहा, हा जोक वाच, त्या बिचाऱ्या मजनूवर ही लैला कशी भडकली, पाय धरले त्या लाळघोट्याने
मुलगी १ : काय बोलते आहेस तू ?
मुलगी २ : होय, अशा शेळपटांना, घाबरुन जाण्यापेक्षा त्यांना जल्माची अद्दलच घडवायला पाहिजे. अशा लफग्यांना घाबरुन तुझ्यासारख्या मुलीच त्यांच्यातील विकृतीला खतपाणी घालतात, मग हे मस्तवाल आणखीन माजतात, अन अघोरी लैंगिक क्रूरता करत मुलींना भक्ष्य करतात
मुलगी १, मुलगी २ : मैत्रिणींनो, फेअरनेस क्रीम लावून जगात वावरण्याचा आत्मसात नक्कीच मिळेल, आणि इंटरनेट वापरुन बरंच काही शिकालही, मात्र आजच्या क्रौरयुगात स्त्रीला मान-सन्मानाने, ताठ बाण्याने जगायचे असेल, तर शौर्य अन धाडस अंगीकारायलाच पाहिजे. परस्त्री ही आईसमान असते, हे जर छत्रपती शिवरायांचे वंशज म्हणून घेणारे विसरत चालले असले, तर वेळीच त्यांना आपण मुलीही राजमाता जिजाऊच्या लढवय्या रणरागिणी आहोत, हे लक्षात आणून द्यायला हवे
मुलगी १ : मी ही आजपासून सहन नाही करणार तर टोला हाणनार. जय जिजाऊ जय शिवराय
समाप्त
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा