विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...

नाशिकच्या तरुणाने लिहिलेला लघुपट ‘आकडा’ युट्युबवर

नाशिकच्या तरुणाने लिहिलेला लघुपट ‘आकडा’ युट्युबवर
>> अंधश्रद्धेवर बोलक्या प्रसंगातून भाष्य
नाशिक (दि.22)
अंधश्रद्धा ही समाजाला लागलेली कीड आहे. रोजच्या जीवनात जगताना समाजाकडून अनेक अंधश्रद्धांना खत पाणी घातल्याचे चित्र राज्यात दिसत असते  या गोष्टीवर दृश्य माध्यमातून सूचक भाष्य करणारा 'आकडा' हा लघुपट लवकरच विविध लघुपट महोत्सवातून प्रदर्शीत केला जाणार आहे. या लघुपटाची कथा नाशिकच्या विशाल लोणारी यांनी लिहली असून, कोल्हापूरचे मोहित घाटगे यांनी त्याचे दिगदर्शन केले आहे.
आयुष्य जगताना करावा लागणारा संकटांचा सामना, सातत्याने मिळणारे अपयश, सकारत्मकतेचे होणारे खच्चीकरण यातून हतबल होत समाजातील काही घटक हा अंधश्रद्धा आणि कर्मकांड याचा आधार घेत असतो, याचाच गैरफायदा अनेक लोक कशा प्रकारे घेतात यावर खरमरीत टीका करणारे कथानक आणि संपूर्णपणे नवखे असणारे कलाकार असे या लघुपटाचे वैशिष्ट्य असल्याची माहिती लेखक विशाल लोणारी यांनी दिली.  
‘आकडा’ या लघुपटाची निर्मित्ती रंगभूमी मूव्हीज या संस्थेने केली आहे.  यात मोहित घाटगे, सुरेश कांबळे, अवधूत मोहिते, मोहन आपटे यांनी भूमिका केली आहे.  छायाचित्रणाची जबाबदारी अनिकेत पाटील, रोहन साडेकर यांनी सांभाळली असून, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, आजरा गाव, कोल्हापूर यांचे विशेष सहकार्य या लघुपटास लाभले आहे.

‘लघुपटावरील काही प्रतिक्रिया’
महेश मुंजाळे : आकडा लघुपटात भन्नाट विषय सादर केला आहे.  छायाचित्रण खूप बोलके झाले आहे.  या लघुपटातील सर्व कलाकारांनी वास्तवदर्शी अभिनय केला आहे.
एक प्रेक्षक : पैशाची अति काळजी करायची नसते, पैशाशिवाय मात्र कोणतेच काम होत नाही, मटक्यात लावलेला पैसा असो, की ज्योतिषाला दिला जाणारा पैसा दोन्हीही अखेर ‘देवालाच’ अर्पण करतात
दीपक नरवाडे : गोष्ट दोन आकड्यांची एक जुगाराचा नि दुसरा अंधश्रद्धेचा. दोन्हीही घातकच, पण दोन्हीच्या समाजमान्यतेत जमीन अस्मानचा फरक ! मटका लावणारे बरेचसे कफल्लक होतात.  पण त्यांची संख्या अंधश्रद्धेचा जुगार खेळणाऱ्या लोकांपेक्षा कैक पटीने कमी आहे. हा जुगार मात्र धर्माच्या गोंडस नावाखाली सर्रास खेळला जातो . विशेष म्हणजे हा जुगार खेळणाऱ्याला आपण त्यात अडकून पडलोय हे माहितही नसते, हे मोठे दुर्दैव  
युट्युब लिंक : https://www.youtube.com/watch?v=U1hvckm9T4k 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडा २ रा - रोजच्या रोज करा सोशल मीडिया मार्केटिंग - कंटेट इज अ किंग

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

गुलाब - प्रेयसीवर रचलेली मराठी कविता