विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...

मदहोशीत

मदहोशी.- विशाल लोणारी

गुलाबी फुलांची नक्षीदार चादर अंगावरून काढत, ब्लूईश रंगातल्या झऱ्या फुललेल्या गाऊनमध्ये तिच्या मुसमुसलेल्या मल्मली शरीराचा आळस झटकतच रीना उठली, बेडवर नजर टाकली तर तिचा बेवडा नवरा घोरत पडला होता. मळकट अन केसाळ अंग, उघडं अंग, गळपटलेलं, सगळंच तिला सकाळी सकाळी बघून किळस यायला लागली, तिच्या संपूर्ण आयुष्याचीच तिला किळस येत होती. आयुष्यात संसार सुरु करताना कितीतरी प्रभातीची स्वप्ने ती रंगवून बसली होती, पण या दोघांचे आयुष्य तिच्या येण्यापासून मोडकळीस गेलं होतं, नवऱ्याने आपल्यापासून लांब जावू नये असे तिला वाटेपर्यंत तो मनापासून दूर  निघूनही गेला होता, भावनिकरीत्या,  मात्र त्यानंतर तिची सारी स्वप्ने तुटली होती, हिरव्या हिरव्या जर्द मेहंदीला सुकल्यावर लाल भडक रंग न चढता आता तो काळा पडत चालला होता. तेव्हापासून संसाराची घडी विस्कटली होती, तिला जवळ घेतल्यापासून, रीनाशी नीट शरीरसंबंधही त्याने ठेवले  नव्हते, तिला मग स्वतःची भूक स्वतःच भागवावी लागत होती. आणि याच निरस आयुष्याचा तिला कंटाळा आला होता, रात्री तो उशिरा येत असायचा, पुरुषच तो सक्ती केल्याविना ऐकणार थोडीच मग आले की बळजबरी ओठ करकचून चावायचा, सहन होणार नाही इतपत  दाब देत,  पिळायचा, आणि  नक्की जागा नाही सापडली की जोरदार थोबाडीत हाणत असे. नीट त्याला संभोगही करता येत नव्हता, हे सगळं लग्नानंतरच्या सहा महिन्यातच घडू लागल्याने ती आतून पार कोलमडली, ग्रॅज्युएट होवून आलेली , त्यातही मग सोनसंसार हलाखीत गेलेला, काय करु शकते हे तिला काहीच सुचत नव्हतं, पण शेवटी तिने एक निर्णय घेतलाच

रोजच आता तिचे विदारक जीवन, तिला आयुष्यभर कुरवाळायचे नव्हते. रीना या जाणिवेने पेटून उठली होती की रोजच्या आगीत भस्मसात होण्यापेक्षा बरं आहे, एकदाच सगळं मिटवून टाकायचं, एक दिवस घरातून ती निघून गेली, नवऱ्याला, आणि कुणालाच न सांगता ती निघून गेली, ते थेट माहेरी जावून धडकली. पण, मम्मी, पप्पांकडे न जाता गावातच राहणाऱ्या बहिणीकडे उतरली. तर तिकडे तिच्या नवऱ्याची घुसमट व्हायला सुरु झाली, रिनाचा शोध घ्यावा तरी कोणाकडे या चिंतेने तो ग्रासला, त्यांना अजून शहर नवीन होते, कुणाच्या घरी जावून राहील एवढी ओळख तिथं झालीच नव्हती

पण त्यांच्यात एकदम असे काय घडले की, रीना घर सोडून दूर निघून गेली...?
रीना निघून गेल्यानंतर खरी घुसमट तिच्या नवऱ्याची सुरु झाली होती. तिचा त्याने कसा छळ केला हे सगळं त्याच्या डोळ्यासमोरुन येवून गेलं. मग तर त्याला पश्चातापाने अधीकच अपराधी वाटायला लागलं, मनातून खचून गेला. माणूस गेल्यानंतर त्याची किंमत समजते, आणि ते आता सौहार्दबद्दल घडत होत, रीनाला त्याचे नाव फार आवडायचे, अगदीच एकदमच संसार विरस नव्हता झाला तिचा, काही सुखाचे क्षण त्यांनाही मिळाले होतेच की, मात्र काही जबाबदाऱ्या सौहार्दच्या अंगावर पडल्याने तो पुरता बदलून गेला, आणि हळू हळू सगळा मांडलेला पट उधळू लागला. होत्याचं नव्हतं सगळं तिथपासून सुरु झालेलं आणि कदाचित आता संपलेलं.
इकडे रीनाला तिच्या बहिणीच्या घरी वेगळच चित्र दिसू लागले. तिची बहिण कामावर जायची, आणि भावजी हे घरीच राहत असे. रीनाला सुरुवातीला त्यांच्या घरी असे येवून राहण्यात भीती वाटलेली, शेवटी नात्यातला जरी असला तरी पुरुषाची भीती कोणत्याही स्त्रीला वाटणे, अगदी स्वाभाविक होतं. पण लवकरच रीना आणि त्यांची खूप चांगली मैत्री जमली. मग तिला हळूहळू उलगडा झाला. तिचं स्वतःची स्वतःला शांत करुन झोपी जाण्याचं, त्याचे उशीरा येण्याचे, या सगळ्या रुटीन आयुष्याने तिचं असं झालेलं. नातं नीट उलगडल्यानंतर त्यातील कोवळेपणाचा तजेला, हा सुकवून त्यांनी रोजचं तेच तेच आयुष्य स्वीकारलं होते. जीवन नेहमी भरभरुन जगले तर ते मोठं असतं, हे ती विसरूनच गेलेली, आणि मग काय करायला हवं हे नेमकं ण सुचल्याने शेवटी ती कंटाळा करायला लागली आयुष्याचा, आणि ही घुसमट मनात दाबून, सहन करत राहिली. त्यादिवशी मग बऱ्याच दिवसांनी आलेल्या पावसात रीना चिंब भिजली.
रीना मग नंतर कधीतरी घरी आली. तिचा नवरा घरीच होता. त्याची काय प्रतिक्रिया असेल या भितीने ती बैचेन झाली. पण तिला बघून तो समोर येवून उभा ठाकला, आणि रडायला लागला.. खूप खूप रडला. काही क्षण त्यांनी एकमेकांत हर्षाने, आतुरतेने व्यतीत केले, दोघांनीही मग समाधानाने एकमेकांकडे पाहिले. आणि मग खरोखर मनात जे काय आहे ते अभिव्यक्त व्हायला सुरुवात केली. रीना आधी सगळं सांगून मोकळी झाली. मग सौहार्दनेही रीनाची माफी मागितली. एकमेकांना समजून, जाणून, उमजून घ्यायला हवंय हे त्याला कळल्याचे तो बोलला. रोजच्या रुटीन आयुष्यात आपण एवढे गर्क होत गेलो, कसे गं आणि का एकमेकांना विसरुन, एकमेकांना सवयीचे बनवून, उगाच आपण वेगळेच वागायला लागलेलो. रीना, मी केलाच नाही तुझ्या मनाचा विचार, तुझ्या अपेक्षा असतील तसे करणे सोडून दिले ना. त्यावर रीनाही अधिकच भावूक बनली, सागराच्या गाजेप्रमाणे खळखळत, सौहार्द, मला तरी कुठे आला रे, तुझ्या गरजांचा विचार, अरे मी हे विसरलीच तू पुरुष आहेस, हळवा आहेस नुसता, मीच थोडं सहकार्य करायला हवं होतं, तुला समजून घेत.
शेवटी दोघे गोड हसून एकमेकांच्या गळ्यात पडले. मदहोशीत   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडा २ रा - रोजच्या रोज करा सोशल मीडिया मार्केटिंग - कंटेट इज अ किंग

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

After The Rain... Moon is Beautiful - Ebook Review in Marathi