विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...

परिचारिका दिन विशेष

जागतिक परिचारिका दिन विशेष – विशाल लोणारी 
  
 परिचारिका महाविद्यालय, माहिती
नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या आवारात परिचारिका महाविद्यालय आहे. परिचारिका महाविद्यालयात एकूण परिचारिकांची संख्या ही सुमारे शंभर आहे. महाविद्यालयात दोन कोर्सेस शिकवले जातात. यात पाठ्यअभ्यासक्रम तसेच कार्यानुभव अशा स्वरूपाचा अभ्यासक्रम घेतला जातो. अभ्यासक्रमात जनरल नर्सिंग हा तीन वर्षाचा डिप्लोमा आहे. यासाठीची पात्रता ही विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण अशी आहे. सध्या या अभ्यासक्रमसाठी २ मुले आणि १८ मुळी अशी एकूण वीस पटसंख्या आहे. याचसोबत एएनएम हा दोन वर्षांचा बेसिक अभ्यासक्रम येथे शिकवला जातो. या कोर्ससाठीही २० विद्यार्थिनीनी प्रवेश घेतला आहे.
परिचारिका महाविद्यालयात शरीर विज्ञानशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, शल्यचिकित्सा, प्रसुतीशास्त्र आदी वैद्यकीय महाविद्यालयात असणारे सर्व विषयांचे प्रशिक्षण देण्यात येते. या महाविद्यालयातच मेस आणि हॉस्टेलची सुविधा देण्यात आली आहे. तसेच महाविद्यालयात रॅगिंग विरोधी समिती, सल्ला समिती कार्यरत आहेत. 
 
कोट : महाविद्यालयात परिचारिकांसाठी १२ मे पासून सप्ताह साजरा करण्यात येतो. यात विवध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम यांचे आयोजन करुन सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या परिचारिकांचा सन्मान करण्यात येतो. शहरातील खाजगी महाविद्यालयांप्रमाणेच प्रशिक्षण असूनदेखील माफक दरात  शिक्षण उपलब्ध असल्याने जिल्ह्यातून शिक्षण घ्यायला  परिचारिका येतात.- प्रा.एम जे पगारे      

बातमी- २, काम करणाऱ्या परिचारिकांच्या प्रतिक्रिया 
 
नर्सेस प्रतिक्रिया 
१२ मे हा परिचारिका दिन म्हणून पाळण्यात येतो. १८५४ साली झालेल्या क्रिमियन युद्धातील जखमी सैनिकांना हिंडून मलमपट्टी करणारी आद्य परिचारिका फ्लोरेंस नाईटिंगेल यांचा जन्मदिवस म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो.
परिचारिका म्हणून काम करताना अनेक धोके पत्करावे लागतात. रात्रीच्यावेळी जबाबदारी अत्यंत जोखीमपूर्ण असते. एकाचवेळी ५० ते ६० रुग्णांची सुश्रुषा करण्याची जबाबदारी परिचारिकेवर असते. त्यामुळे तिला मानसिक तसेच शारीरिक थकवा खूप जाणवतो. अनेकदा काही रुग्णांचे कोणीच नातेवाईक नसतात तेव्हा त्यांची संपूर्ण जबाबदारी ही परिचारिका तसेच पालक म्हणूनही घेतली जाते.
परिचारिका दिनाचे अवचित्य साधत  त्यांच्याशी हितगुज साधत बोलतं केलं, नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांच्या या प्रतिक्रिया

अधिसेविका, जिल्हा रुग्णालय,  श्रीमती. व्ही.ए. शेजवळे
जागतिक परिचारिका दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. नाशिक सिव्हील हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. सर्व परिचारिका भगिनी या दिवस-रात्र रुग्णांची सुश्रुषा करण्यात गर्क असतात. तरी गरजू रुग्णांनी सिव्हिलमध्ये उपचारासंठी यावेत, आणि जर कुणा परिचारीकेकडून रुग्ण, नातेवाईक दुखावले गेल्यास त्या परिचारिकेचा एक माणूस म्हणून विचार करावा, तिच्याही संवेदनांचा विचार रुग्णांनी करावा.

आ.य.सी यु विभाग
शोभा सोनवणे
अतिदक्षता विभागातील गंभीर आजाराच्या रुग्णाची मी आजवर मनापासून सेवा करत आली आहे. रुग्ण बरे झाल्यानंतर मला मनस्वी आनंदी होत असतो. परिचारिका असल्याचा, रुग्णसेवा करायला मिळाल्याचा नेहमीच मला अभिमान वाटतो. अतिदक्षता विभागात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांची परिस्थिती ही बेताचीच असते. अशा परिस्थितीत रुग्ण दगावल्यास त्याचे अंत्यविधीही करणे त्यांना शक्य नसते, अशावेळी नातेवाइकांच्या पाठी सर्व परिचारिका खंबीर उभ्या राहतात, तसेच अंत्यविधीचा सर्व खर्च हा स्टाफ-फंडद्वारे करण्यात येतो.

अधिसेविका कार्यालय
शोभना दिनकर दिवे
परिसेविका म्हणून मी गेली ३५ वर्षे कार्यरत आहे. परिचारिका दिनाच्या निमित्ताने मला जनतेस काही सांगायचे आहे. परिचारिका ही कुणाची मुलगी, बहिण, सून, पत्नी असते. तिलाही सुख-दु:ख असते, परंतु नोकरी करताना या गोष्टी बाजूला सारुन फक्त रुग्णसेवा हेच एक व्रत तिने अंगी बाणलेले असते. परिचारिकेचे घर म्हणजे तिचे रुग्णालय. आणि नातेवाईक म्हणजे येणारे रुग्ण, आनंदाच्या क्षणात, वाईट प्रसंगात कोणत्याही काळात परिचारिका केवळ रुग्णसेवेलाच महत्व देते, त्यातच तिच्या आयुष्याचे सार्थक होते. परिचारिका दिनाच्या शुभेच्छा. 
 
तात्कालिक कक्ष
के. ए. तोरणे
माझ्या वार्डात सर्पदंश, अत्याचार पीडित, विष घेतलेले, अपघातग्रस्त असे रुग्ण येत असतात. अशावेळी रुग्णांच्या भावना अन्वर झालेल्या असतात. रुग्णांवर ताबडतोब उपचार करतानाच नातेवाईकांच्या भावना सांभाळून, त्यांना धीर देणे अत्यंत जिकीरीचे कार्य बनते. याचमुळे माझी वार्डात खूप धावपळ सुरु असते. मात्र घरी जाण्याच्या वेळेस उपचाराने ठणठणीत बरे झालेल्या रुग्णाच्या चेहेऱ्यावरचे निरागस हसू माझ्या कामाचे खूप मोठे समाधान मला देवून जाते. 
 
प्रसुती कक्ष
कुमुदिनी आहिरे
लेबर वार्डात सुखरुप बाळंतपण प्रसुती व्हावी यासाठी माझी नेहमीच कसोटी असते. बाळाची व आईची काळजी घेणे हे कधीकधी अत्यंत जोखमीचे व अवघड काम असते. जेव्हा नवजात शिशुची माता तिच्या बाळाला पहिल्यांदा स्तनपान देते ते दृश्य माझ्या डोळ्यांचे पारणे फेडत आले आहे. त्या तान्ह्या बाळात परमेश्वराचेच रूप बघितल्याचा होणारा भास हा भारावून टाकणारी अनुभूती देतो. परिचारिका दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा 
देवश्री प्रकाश चौधरी 
मुलींनो नर्स, सिस्टर बना
परमार्थाचा विचार करता समाजसेवा करायची असेल तर नर्सिंगपेक्षा अन्य कोणता पेशा नाही. फ्लोरेंस नाईटिंगेल यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायलाच हवा.  समाजसेवा हे छान आणि सोप्या पद्धतीने कमावता येईल असे पुण्य आहे. परिचारिका बनल्यावर सामान्यपणे लोकांना ज्ञात नसणारे आजार व त्यांच्या उपचारांची माहिती परिचारिकांना होते, याचशिवाय आयुष्याला स्थैर्यता देणारे करियरही तरुणी परिचारिका म्हणून करु शकतात. समाजात वावरताना येणाऱ्या संकटांचा सामना करण्याचे बळही परिचारिका प्रशिक्षणात देण्यात येते. माझे तरुणींना आवाहन आहे की त्यांनी परिचारिका बनावे, परिचारिका दिनाच्या शुभेच्छा.

अपघात विभाग
उषा चंद्रभान गोसावी, ज्योती अनिल पाटील
आम्ही अपघात विभागात कार्यरत आहोत. रुग्णांना सर्वप्रथम अपघात विभागात दाखल करण्यात येते, मग वार्डनिहाय हलवण्यात येतो. अपघातविभागात दाखल झालेल्या रुग्णांना बघून मन नेहमीच सुन्न होत असते. त्यातही नातेवाईकांचा आक्रोशही मनाला अस्वस्थ करत असतो. ,मात्र असे असले तरी खंबीर राहून रुग्णावर उपचार करण्याला आमचा अग्रक्रमांक असतो. नातेवाईकांना देखील सांभाळावे लागते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडा २ रा - रोजच्या रोज करा सोशल मीडिया मार्केटिंग - कंटेट इज अ किंग

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

आपण ट्वीटर मॅडमला ओळखता का? - ब्लॉगमालिका