मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

this blog is dedicated to work of my passion. I want to speak, write, displays my creativity, I want to tell the world few words about me, so I created this blog. It has some affilate connections also, that gives me little bit pleasure of selling also, I educate from here by sharing knowledge to the people. I welcome to all my readers, followers, admirer, thanks to all who loves me. I will be updating this blog in each month with full of new things, based on happenings, politics, and many more.
सैराट झालं जी
अंग तडाडलं पावसामदी अन आभाळाला याद आलं जी, सैराट झालं जी ! शहरातील धकाधक, रोजची वर्दळ, माणसांची कोंदट गर्दी, या सगळ्यांच्या प्रदूषणाने काळवंडून जायला व्हतं, अन घामाने निथळून गेल्यावर हलकीच वाऱ्याची झुळूक येती आणि काही क्षणाच्या अंतरान पावसाला बी सुरुवात व्हती, ही सिच्युएश्न त्याच येळेला लई एंजोय करावी वाटती, असंच मराठी फिल्म लाईन मदी बी अशीच प्रदूषित परिस्थिती आलथी, त्येच त्येच गोऱ्या हिरोईनी, सावळा, हट्टाकट्टा हिरो, त्यांच्या पिरमाच्या स्टोर्यांनी काळवंडलीच व्हती प्रेक्षकांची मन बी, पर त्यात नागराज मंजुळे ह्यो एक अस्सल कलावंत, जिंदादिल, ज्यास्नी बघून बाकीचे चकाचकवाले दिग्दर्शक नाकं मुरडतील, असा माणूस मऱ्हाटीत आला अन त्याने पार येगळाच खेळ मांडला, फार कलाकुसरी न दाखिवता, त्याह्य्ने त्याच्या मनातली खदखद लोकांपुढे मांडायला सुरुवात केली, तंत्र अवगत केलं, पिक्चर काढलं, अन त्यातले हिरो-हिरोईन पण नवखे घेतल्याने, मोठाच गहजब उडाला, खरोखर तवा थांबून त्याने केलेला फँड्री एन्जॉयही कराव वाटलं, आज बी वाटत, अन त्याने सोलून बी काढलं, पिक्चरवाल्यांनी पांघरवलेलं तुकतुकीत मलमल, त्याय्च्या काळजातल्या भळभळीने ज्ये खरं वास्तव समोर आलं, ते भयाण होतं, अन सैराट बी असंच वास्तीव पेटवणार हाय हे शंभर टक्के.
महाराष्ट्र हा खेड्यांचा देश हाय असं म्हणत्यात ! ह्या देशातले लय लोक आता भाकर-तुकडा कमवायला सहरात जात्ये अन तिथंच राहतात, पण भो जो खेड्यात रमलेला असतो, खेड्यातला राहतो, त्यो किती बी सहरात जावो, त्यायला गावाकडच्यावाणीच राहायला आवडीत, सहरातल्या पोरी बघून डोळ्यांला किती बी गार वाटत असलं पण, ज्यो हंगामा त्यायचे दिलात गावाकडची पाखरू पाहून व्हतो ना, त्याची सर नाही यायची कुठल्या बी मोड पोरीला, ह्ये गावाकडच्या पोरं रांगड्या पोरीच पसंत करत्यात, ज्या दिसायला बी देखण्या, रूपवान, अन वागायला येकदम कडक, झटकाच अशा पोरीच भो याड लावून टाकत्या गडीला, बर कॉलेजातल्या हिरवळीवर फिदा होऊन पोट्टे समाधानी व्हत न्हाय, नायतर एकच आयटम बघून, बास हीच फायनल, असं कुनीबी म्हंत का ? पर गावाकडचा पाखरू पयल्याच नजरेत मनात ठसून जातं की मंग दुसरी कुणी नकोच वाटतीया, बसं, सैराटच्या हिरोईन रिंकू राजगुरू(राष्ट्रीय पुरस्कार विजेती) उर्फ आर्ची असल्या पोरींपैकीच एक हाय, मला तर ती मराठी पिक्चरमधली ती पावसाची सरच वाटती, जी म्या मगाच्या सिचुएशनमधी सांगितली, म्या ह्ये बी म्हणेल, आर्चीसारखी एक नजर टाकून बोलती बंद करणारी पोरं ज्याला आवडत असलं, त्याचं नशीब म्हंजी २४ केरेट गोल्डच ना भो, तिचे मोठे डोळे, त्यांच्यातलं ते काजळ, हाय हाय हाय जाळ आणि धूर दोघं बी संगाटच, अन ते डोळे जवा मोठे करुन बघती ना ती, धीश्क्याव रे, पब्लिक जागच्या जागी खलास व्हतात रे, अजून तिच्यात एक दिलखेचक गोष्ट हाय, तिचा चेहेरा, संमद्या बायकोच्या क्वालिटीज ज्या गावरान, गावाकडची पोर शोधत राहत्यात, त्ये समदां आर्चीत दिसतंय, म्हणूनच लई कमी दिवसात तिनं येडं करुन टाकलंय, महाराष्ट्राला.
नागराज मंजुळेला हिरोचं काम केलेलं पोरगं यकदम चांगलं गावलंय, न्हाई गावाकडच्या पोरांची शरीरं पिळदार राहत्याय, कोची बी जीम ण लावता राहत्यात, गावाकडं कसं कष्टाची कामं करायला लागत्यात, मंग त्यांना भरदार बांधा कमवायला येगळ काय कराय लागत न्हाई, हां, आता त्ये ६ पॅक बरगाड्यांतून उगवत नस्त्येत त्यांच्या म्हणा ! सैराट मधला हिरो हा गोरा-गोमटा घेतलाय, त्यामुळं सहरातील पोरी बी आताच फिदा व्हायला लागलीये त्येच्यावर.
सैराट पिक्चरची जोडी अजुक एका कारणाने हिट हाय, ती म्हणजे रांगडी हिरोईन आणि सालस गोरा हिरो, न्हाई तर आज पतूर सावळा, बॉडी बिल्डर हिरो आणि मदन मंजिरी, सोज्वळ अशा हिरोईनी नेहमीच्या होऊन गेल्या व्हत्या, इथं बी नागराज भाऊ मंजुळे ह्यांना शंभर मार्क द्यायले पाहिजे, खरोखर तोच तोच गुळचटपणा पिक्चरमंदी आला व्हता, त्यो या भाऊने मुळासकट उखडून लावलाय, ह्ये लई म्हणजे लैच आवडलं बा ! आता फकस्त वाट पाहून र्ह्यालोय की कवा २९ एप्रिल येतीये अन कवा म्या सैराट बघतुय, तो पतूर हायेच आपलं, याड लागलं रं याड लागल रं...
विशाल लोणारी, नाशिक
Jabardasst
उत्तर द्याहटवाJabardasst
उत्तर द्याहटवाThanks so much.... keep blessed
हटवाThanks so much.... keep blessed
हटवा