विशेष वाचनीय

“म्युच्युअल फंडातून करोडपती होता येतं? जाणून घ्या खरं Wealth Management!”

इमेज
म्युच्युअल फंडातून Wealth Management शक्य आहे का? हो—आणि कसं? “तुम्ही पैसे साठवताय… की खरोखर वाढवताय? आज घेतलेला छोटा गुंतवणुकीचा निर्णय उद्या तुमचं संपूर्ण आर्थिक भविष्य बदलू शकतो.” “मी, विशाल लोणारी (NISM CERTIFIED) – VHN FINSERV च्या माध्यमातून गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शन करत आहे.” मानवी जीवन शतकानुशतके बदलत गेले आहे. उत्क्रांत आणि आधुनिक होत चालले आहे. जगण्यात बदल होत गेले तशा मानवाच्या गरजाही बदलत चालल्या आहेत. गरजा बदलल्यामुळे खर्च आणि संपत्ती दोन्हींमध्येही वाढ करणे हीच मोठी मानवी गरज बनली आहे. त्यामुळे आता संपत्ती निर्माण करावयाची झाल्यास नव्या जमान्याच्या नव्या जोमाने ती निर्माण करावी लागणार आहे. त्यासाठी एक ताकदवान माध्यम म्हणून Mutual Fund आपल्या समोर येत आहे. आजच्या काळात म्युच्युअल फंडामध्ये एवढी ताकद आहे की, तुमचे बदलतं जीवनमान सुरू राहताना महागाईसोबत लढाई करताना Wealth Management करण्यात प्रभावी पर्याय म्हणजे Mutual Fund. VHN FINSERV च्या माध्यमातून आणि विशाल लोणारी ( NISM CERTIFIED) यांच्या मार्गदर्शनात म्युच्युअल फंडात योग्य पोर्टफोलिओ तयार करून श्रीमंतीसह ...

पावसाळा

चिंब पावसानी रान झालं आबादानी
चिंब पावसानी रान झालं आबादानी ........ झाला एकदाचा पावसाळा सुरु. यंदाच्या वर्षी न चुकता ७ जुन पासून पावसाला सुरुवात झाल्यामुळे लहान-थोरांत आणि अर्थातच यंगस्टार्समध्ये आनंद पसरला आहे. तरुणाईचे आणि पावसाचे वेगळे असे नाते आहे. हे वयच असे असते ना मित्रांनो. पाऊस सुरु झाला की मन हर्षंभरीत होते, वाफाळलेला चहा, भजी यांच्यासोबत गारवाची गाणी अहाहा काय सुंदर मिलाफ घडून येतो.

 पाऊस बरसात असला की चिंब भिजावेसे वाटते, जुन्या आठवणी जाग्या होतात, त्यांच्यात मन रमवावेसे वाटते. पाऊस सुरु झाला की जसं आभाळ भरून आलेले असते तसेच मग आपले मनही हळुवार वळण घेत मागे जाते, नोस्टेल्जीक व्हायला होते, अनेक सुखा-दुखाच्या आठवणींची रिमझीम मनात सुरु होते, मग पाण्यात होडी सोडणारे, पाणी-चिखल तुडवत जाणारे बालपण डोळ्यांसमोर तरळते, तर तिच्या वा त्याच्याशी झालेली पहिली नजरानजर, मारलेल्या गप्पा,बाईक राईड आणि मग तुटलेलं वा जुळलेलं नातं, फोन-कॉल्स, चाटींग, या सगळ्या आठवणींनी गहिवरून यायला होतं. तर असा खूप धमाल ऋतू म्हणजे पावसाळा.

पावसाला सुरु होतो तेव्हा कॉलेज कॅम्पसही जरा फुलू लागलेले असतात. दहावी पास झालेल्यांची अकरावी प्रवेशासाठी धावपळ, तर बारावी सुत्लेल्यांची प्रवेश परीक्षांची धावपळ. तर जे कट्टेकरी मात्र डिग्री किंवा पीजी करणारे असतात त्यांच्या मात्र अजूनही सुट्ट्या चालू असत, मागच्या वर्षीचा निकाल साधारण जुलैपर्यंत लागणार असतो, अशावेळी मग पावसाळ्याचे सुरुवातीचे दिवस या गँग्सना काळ्या-सावळ्या ढगांतून झिरपणाऱ्या रेशीम धारांत नखशिखांत भि’जून’ थेंबांची, लूट करता येते, खुश राहता येते.

पावसाळ्यात बहरणारी आणखी एक गोष्ट म्हणजे बहरणारी हिरवळ, गारव्याचा पाऊस पडून गेल्यानंतर जेव्हा कॉलेजचे फंडूमंडळी कॅम्पसला येतात, तेव्हा त्यांच्या दृष्टीस पडतो तो हिरवागार परिसर. सगळीकडे हिरवळ अंकुरलेली असते, नवीन गवत उगवलेले असते, ओसाड, माळरान गर्द नटलेले पाहून मनही प्रसन्न होत असते.

कधीकधी पाऊस मात्र यंगब्रिगेडशी पंगा पण घेतो, सततची रिपरिप, चिकचिक, मरगळ झाल्याने मग आपल्या अवतार अगदीच गबाळेछाप असा दिसू लागतो, मित्र-मंडळींत चेष्टेचा विषय ठरतो, तर ज्या भिडू लोकांना बराच लांबचा प्रवास करून कॉलेज गाठायचे असते त्यांना तर बस.रिक्षा, बाईक सगळीकडेच पीडतो. पण तरी सगळ्यांना पावसाळा हवाहवासाच वाटतो, आनंद, आठवणी वाटणारा, पावसाळा.

विशाल लोणारी, नाशिक 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

“म्युच्युअल फंडातून करोडपती होता येतं? जाणून घ्या खरं Wealth Management!”

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

धडा २ रा - रोजच्या रोज करा सोशल मीडिया मार्केटिंग - कंटेट इज अ किंग