विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...

avagha deh chandanapari zijala


अवघा देह चंदनापरी झिजला.
वेळ पहाटे साडे तीनची. कर्रकचून ब्रेक दाबत फलाटावर गाडी आली. जेव्हा एखादी व्यक्ती फार श्रमा अंती दीर्घ उश्वास सोडते तसाच बसनेही छास्स्स्स असा कुकरच्या शिट्टीने वाफ सोडताना करावा तसा आवाज केला. चालक-वाहक घाईघाईने ऑफिसकडे निघाले. तोपर्यंत तेथील सारेच आश्चर्यचकित होवून बघत उभे होते. कारण आलेल्या वाहनाने आता तिथे येण्याचे काहीच प्रयोजन वेळापत्रकात नसल्याने स्थानक प्रमुखही नवालांकित झाला होता. पण जसे जसे हे लोक(कंडक्टर आणि ड्राईव्हर) ऑफिसकडे निघाले आणि पोहोचले तेव्हा मग एक हृदयद्रावक आर्ततेने काळीज पिळवटून टाकणारी करुण कहाणी उलगडू लागली.

सकाळी सहा वाजता  गाडी पहिल्यांदा सुरु झाली होती. हो पहिल्यांदाच ! नाशिकहून निघण्यापूर्वी, सीबीएसवरच ती तीनदा चालु होऊन बंद पडली. जणू तिला इछाच नसेन आज पुढे जाण्याची. खरंच या वाहनांनाही असतात का, माणसांसारखे षडरिपु, भावभावना आणि काय त्यांनाही चाहूल लागत असते का, वाटेत भेटण्याकरिता उतावीळ होऊन बसलेल्या संकटांची ? जशी माणसांना कधीकधी होते असते. परंतु आपण दुर्लक्ष करतो, आस्तिक देवाचे नामस्मरण करतो तर कुणी नास्तिक मनात असे भाकड भाकीत करत बसतोच असे नाही. पण नियतीने ताटात काय वाढून ठेवलंय हे कुणीच सांगू शकत नाही. ती आहे यावर सार्यांचाच कमी-अधिक विश्वास असतो. शेवटी गाडी सुरु होऊन द्वारका मागे टाकत पुण्याकडे मार्गस्थ झाली.
‘साद घालशील तेव्हाच येईन,
जितक मागशील तितकंच देईन
दिल्यानंतर देहावेगळ्या सावलीसारखी निघून जाईन

का, कुणास ठावूक मात्र कुसुमाग्रजांच्या या ओळी ऐकून सायलीच्या सबंध देहावर एक भीतीची शिरशिरी उठली. तिने मागच्या सीटवर डोकावले तर तिथे मयांक ही कविता वाचत होता. तिने जरासा  त्रासिकच कटाक्ष टाकल्यावर तो थांबला. सायली आणि मयांक एसटीच्या मधल्या रांगेतल्या सीटांवर मागेपुढे बसलेले होते. हळुवार आवाजात खिडकीत बसून कानातल्या हेडफोनवर सायली क्षणभर विश्रांतीचे ‘सांजवेळी सांजरंगी रंगले मन हे, पावलांना साद देती या दिशा! शब्द, तालाच्या हिंदोळ्यावर झुलावाणारे गाणे ऐकत असताना मध्येच अशा कुणीतरी सोडून निघून जाणार्या ओळी ऐकून तिची एकदम चिडचिड झाली होती. एरव्ही कुसुमाग्रज तिचे लाडके कविश्रेष्ठ होते. सायली रंगभूमीवरची नवखी आणि धडपड करणारी अभिनेत्री. पुण्यात तिचे सदाशिवपेठेत आजोळ. तिथेच चालली होती, पण ती पोहोचेलंच याची शाश्वती तिला मुळीच नव्हती. जरासी भित्री, नेहमीच एकटी कुठे बाहेर पडली की मनात भीती आणि काळजी हक्काने ग्रासवून घेत असे. पण ती अशी एकदम पुण्याला जाण्याचे कारण खूप वेगळे होते.

तर तिथे दुसरीकडे मयांक मात्र वेगळ्याच त्याच्या एकट्या विश्वात धुंद होता. त्याचा प्रवासाचा उद्देश कुणालाही भेटण्याचा नव्हता, की काही कामानिमित्त त्याचे पुण्याला जाणे गरजेचंच होते. तो निघाला होता एक पर्व, एक इतिहास, अपघाती प्रेम आणि प्रेमात झालेला आघात अन त्यातून आयुष्यात आलेलं भलेमोठे नैराश्य, तेच जीवनातून दूर सारायला मयंकला पुण्याला जायचे होते. तिथे बुधवार पेठेतला दगडूशेठ गणपती त्याचा लहानपणापासूनचा मित्र होता. सगळे दुख, कष्ट, यातना, वेदना भडभडा जगासमोर अजिबात मांडू शकणारा तो मूकपणे गणेशापुढे बोलून जायचा आज ही तो हेच करायला जात होता. विश्वासाने ओतप्रोत भरलेलं त्याचे हृदय धडधड आवाज करत होते. बसलेल्या जागेवरूनच आपण उठू अशी त्याला खात्री होती. फाजील होती मात्र. सायली आणि मयांक दोघेही विशीतले तिच्यासम तो ही गाणी ऐकत होता, अर्थात तो ऐकत असलेल्या गाण्याच्या ओळी, ‘घे सावरून मन हे साजणा’ ही असणार हा सहज आणि स्वाभाविक आडाखा ठरावा.

जरी थोडीशी नाराजी होती तरी प्रवास जसा जसा पुढे होऊ लागला तशी त्यांची ओळख झाली. एकमेकांविषयी गप्पा, विचारपूस करत होते. सिन्नरला जागा झाली म्हणून एकमेकांशेजारी बसले. एकमेकांच्या रोजच्या वैताग देणाऱ्या दिनक्रमाबद्दल आणि जगण्याबद्दल ते बोलत होते. हसत-हसत, चकाट्या  पीटत ते आता जणू खूप जुने मैत्र बर्याच वर्षांनी भेटले असावे असे कुणीही त्यांना पाहून बोलावे. इतपत ते आता जवळ आले होते. बोलता बोलता, मयांकच्या  डोळ्यात किंचित पाणी आले, सायलीने विचारले तेव्हा फक्त हसला, आणि त्याच्या मोबाईलमधून एक फोटो दाखवला, त्याचा आणि रश्मीचा. “कोण रे ही, गर्लफ्रेंड ?, सायलीने मिश्कील भाव आणून विचारले. “ ना, बायको होती माझी”, मयांकने शक्य तितके दुख आवरत सायलीला सांगितले. “होती ? तिचा पुन्हा त्याला प्रश्न, अचंबित होऊन विचारलेला, कारण त्याचे वय तर अवघ तिशीच्या जवळपास जाणारेच वाटत होते. दिसायलाही तो वाईट नव्हता, गोरा रंग, कुरळे केस, बदामी डोळे पाहताच क्षणी नजरेत भरावा असंच होता तो काळ्याभोर डोळे आणि केसांचा मयांक. “विचारू शकते का ? “ ती का गेली, हेच ना ? कशी गेली ? दैव हे प्रत्येकाला भरभरून देते असे नाही. थोडे कमी-जास्त प्रत्येकालाच ज्याचा त्याच्या वाट्याचे आयुष्य नियती देते. तिच्या वाटेला प्रथमतः आमच अतिशय क्लिष्ट आणि अवघड जुळून आलेले लग्नबंधन आणि मग ऐन संसार उभा राहिल्यावर, तो बहरणार याची चाहूल लागल्यावर, एके संध्याकाळी किनार्यावर दोघेच क्षितिजात अस्त होणार्या सूर्याकडे जन्मभराचे सुख आणि संगतीचे भाग्य लाभावे याकरिता तळमळ करीत असताना मला शेवटी माझ्या हूरहुरी समवेत फक्त किनारा भेटला. पूर्वी आम्ही दोघे मुंबईत राहत होतो, नोकरीच्या निम्मिताने, दर शनिवारी मी तिला चौपाटीवर नेत असे, आणि आम्ही असंच बसत असू पाय वाळूत रुतवून उद्याची, स्वप्ने रंगवत........... पण कदाचित हे जग चालवणारी जी अदृश्य आणि अदभूत शक्ती संकल्पना आहे तिला हे कदापि मान्य नसावे किंवा तिला पटत नसावे आमची  भाबडी आशा रंगवणे, एकदा लोकलने घरी येत असताना एक दगड तिच्यावर भिरकावत आला, आणि तो थेट बसला तिच्या छातीवर, जोरात ती मागे कोसळली, मेंदू आणि हृदयावर जबरदस्त आघात झाल्याने तिला पक्षाघाताचा झटका आला, जो रश्मीच्या जीवाला मुकण्यास कारण झाला. या घटनेला आता सहा महिने उलटून गेलीत. गंगेत तिला विसर्जित करून आता तो ............
एवढ्या वेळ एकही शब्द न बोलता सायलीसह संपूर्ण एसटीतले  प्रवासी ऐकत होते. कारण त्याचे सांगणेच एवढे हेलावणारे होते की हळूहळू सर्वच ऐकू लागलेले.  सायलीच्या डोळ्यात पाणी तरळून आलेले त्याने पहिले. त्यालाही गहिवरून आले होते. डोळे पुसत त्याने सगळ्यांचीच रडवल्याबद्दल माफी मागितली. सिनेमात शोभून दिसेल असे कथानक मयांकच्या आयुष्यात घडले होते. सायली त्यापुढचे काही तास फक्त शांत बसून होती. मध्ये कधीतरी मग दोघांचाही डोळा लागल्याचे श्रीमती. माने यांनी पहिले.

गाडी धाब्यावर थांबली, सायलीला जाग आली पण मयांक अजूनही झोपलाच होता, तिने त्याला उठवायचा प्रयत्न केला नाही. सायलीला एव्हाना मयांकबद्दल दया, कीव वाटत होती. पहिल्यांदा जसा वाटला ते का त्याचे कारण आता तिला समजत होते. अताशा त्याच्या बोलण्यातून आणि हृदयद्रावक कथा ऐकल्यावर मात्र तिचेही मन मयांकसाठी हळवे झाले होते. तिला आता त्याच्याशी भरभरून मनमोकळ बोलावेसे वाटायचे. तिने तिचा डब्बा सोबतच आणल्याने आणि नव्याने झालेला मित्र बाजूलाच गाढ झोपेत असल्याने कुमार काका आणि दमयंती ताईच्या आग्रहावरूनही ती सीटवरच बसून राहिली. आता तिला मंजुळ वार्यात एक बासरीची धून ऐकू येत होती. आजूबाजूला असणार्या झाडीने तर मोकळी हवा छानच मिळत होती................. कॉलेजचे दिवस आठवण्याचे असेच काही क्षण असतात. जेव्हा आपल्याला खरा मोकळा वेळ मिळत असतो. सायलीनेही तेच करायचे ठरवले. आणि सीटवर पूर्ण अंग टेकवत डोळे मिटून घेतले. आणि आठवणींच्या जाडजूड पुस्तकातील पाने उलटायला सुरुवात झाली. पहिल्या वर्गाच्या क्रमांकाने पदवी मिळवलेली सायली आता चांगल्या नोकरीच्या शोधात असायला हवी होती, पण तिला अजिबात घाई नव्हती म्हणून तिने पुढे शिक्षण घेण्याचे ठरवले. आणि म्हणूनच जून २००४मध्ये तिने नाशिकच्याच नामांकित महाविद्यालयात एम ए च्या पहिल्या वर्षाला प्रवेश मिळवला होता. तिची खूप इच्छा होती, उच्चशिक्षण घ्यायची, चांगल्या हुद्द्यावरनोकरी करायची परंतु नियतीला वेगळंच काहीतरी मान्य असावं. तिच्या कॉलेजमध्ये तिच्याच पहिल्या वर्षाच्या वर्गात सुहासनेही प्रवेश घेतला होता. बाकीही २० मुल-मुली होतेच परंतु सुहास आणि सायलीची मैत्री अगदी घट्ट झालेली. प्रथम तर नोट्स, पुस्तके मागण्याच्या निम्मिअने बोलणे होत असत. मग हळूहळू कॅन्टीनमध्येही येजा होऊ लागली. सायलीला आणि वर्गात इतरांना यांच्यात फक्त मैत्री नसावी अशीच शंका येऊ लागलेली. परंतु सुहास याच्यादृष्टीने सायलीशी त्याची निखळ मैत्रीच होती. सायालीलाही सुहास सहवास आवडू लागला होता, त्याच्याबद्दल आकर्षणापलीकडे आपल्याला तो खरंच माहित आहे का, त्याची जनी असते तितकीच त्याची उणीवही भासते का, त्याच्याशिवाय मनाचं काहीतारीही अडत का, हे पुन्हापुन्हा सायलीने तपासून पहिले, उत्तर तिला होच मिळाले; मग तिनेच त्याला विचारायचे ठरवले. तो कधीही मागणी घालणे शक्य नव्हते हे तिला माहित होते बहुतेक, कारण इतरही कुणाशी फार बोलत नसे, हं नाही म्हणायला एक रसिका होती जिच्याशी तो मधुर-मधुर शब्द्तान छेडत बोलत असे. आणि नेमकं सायलीचे अन तिचे खटके उडायचे.
ज्या दिवशी ती त्याला मागणी घालायला गेली तो सायलीचा वाढदिवस होता. सुहास ने दिवसाच्या सुरुवातीलाच सायलीला विश केले होते. पण तिया आतुर होती संध्याकाळसाठी कारण त्या दोघांनी वाढदिवस अनोखा पद्धतीने साजरा करायचा असे सांगून तिने त्याला बोलावले होते. मात्र त्या दिवशी ती कॉलेजला गेली तर तिथे, वर्गात सुहास आणि रसिका असे दोघेही एकमेकांशी बोलत होते. सुहास ने दिलेलं पात्र, चक्क पत्र दिले त्याने वाचयला आणि ती ही आता ते वाचू लागली होती अर्थातच मनात.


‘‘ प्रिय रसिका,
 मला माहित आहे हा जमाना पत्र पठवून गुजगोष्टी करण्याचा नाही. पण काही गोष्टी या खूप हळव्या असतात, ही यंत्रे त्यातील निरागसपण हिरावून, त्यांना निरास स्वरूप देवून आपल्यापर्यंत पोचवतात अन मग त्यातील गम्मत जावून ती गोष्ट खोटीच वाटू लागते, पण रसिका मला जे सांगायचं आहे त्यातला ओलावा हा कागदच समजू शकतो.
रसिका, जेव्हा कधीही तुला पाहिलंय मला कधीच तुझ्या डोळ्यात थेट पाहण्याची हिम्मत होत नाही. चोरून मी तुझ्या डोळ्यांचा नीळा रंग आहे हे समजू शकलो. आपण अनेकदा भेटलोय पण दरवेळी परत जाताना उमटणारी वेदना आजही माझ्या स्मरणात आहे. तुझ्या आरस्पानी सौदर्याला भाळलेल्या अनेकांमध्ये मी ही एक आहे.
हो रसिका, मला तू आवडतेस. मला तू हवी आहेस, अगदी कायमसाठीची. तू पाखरू आहेस हवेत, आकाशात मनसोक्त विरःणारे, पण तुझ्या मनाच घर माझ्या मनात असावं अन तू मला तुझ्या आयुष्यातला जोडीदार म्हणून स्वीकारावं अशी माझी इच्छा आहे. मला वरवर आहे तसे आयुष्य जगायच नाहीये, मला भविष्याला अंधारात ठेवून वर्तमान ढकलत पुढे जायचं नाहीये, मला तुझ्या सोबतीने प्रवास करायचा आहे. आय लव्ह यु रसिका, येशील माझ्या सोबत माझी दीपकी बनून, मनातली मंजिरीच्या अंगणाला उजवळून टाकशील. सांग ना तू माझी होशील का ?
तुझा, अन तुझाच
सुहास  


        फोटो प्रातिनिधिक 


















हे पत्र वाचून रसिका त्याच्यावर फिदा झाली. पण तरीही त्याला होकार देण्यात तिला जराशी भीतीच वाटत होती. पण इतके प्रेम करणारा, अशा अनोख्या पद्धतीने ते मांडणारा सुहास तिला परत सापडला नसता तर, तितक्यात तिकडून अत्यंत आनंदाने सायली तिला येताना दिसली, ते पत्र तसेच पटकन पर्समध्ये ठेवून, तिने त्याला मिठीच मारली. बस्स ! हे दृश्य बघून ती तशीच माघारी फिरली. आणि काही दिवसांनी मग पुण्याला जायला निघाली, एसटी महामंडळाच्या बसमधून.
‘‘अचानक वाढलेल्या गाडीच्या वेगाने सगळ्यांनाच जाग आली, सायली, मयांक, मागच्या सीटवर बसलेले, पुढचे काहीही कळून येण्याच्याआतच अत्यंत कर्कश आवाज करत इथेतिथे हलत संगमनेरजवळच्या चंदनापुरी घाटात कोसळली. ................................................................................................................
डोळे विस्फारत होते, रोमरोम शाहारले जात होते. जेव्हा शिवाजीनगरचे ‘ते’ आगारप्रमुख बसला झाल्या अपघाताची हकीगत ऐकून घेत होते. कुणाच्याही स्वप्नातसुद्धा येऊ नये एवढी अप्रिय घटना घडली होती. संगमनेरजवळील  चंदनापुरीच्या घाटात राज्य परिवहन व्यवस्था मंडळाची एस टी क्रमांक ‘एम एच १२ बी एल ६८१३’ नखशिखांत गुलाबी रंगाने नटलेली ती बस, टायर चढावरच्या वळणावर  असताना निखळल्याने एका बाजूने तोल सावरत असताना ड्राईव्हरच्या आवाक्याबाहेर गाडी गेली, ताबा सुटून स्टेरिंगदेखील गरगर फिरले आणि क्षणात  होतेच नव्हत होत दरीत बस जोरात कोसळली. आवाजाने आजूबाजूच्या सगळ्याच गाड्या थबकल्या लोकांची गर्दी जमा झाली, कुणीतरी तत्परता दाखवत पोलिसांना कळवले. पोलिसांची गाडीही पोहोचली पाठोपाठ अग्निशामक दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिकाही हजर झाल्या. मदतकार्या जोराने सुरु झाले. जखमी लोक, मृतदेह हलवले जाऊ लागले, क्रेनच्या सहाय्याने सारीच कामे चालु झाली होती. कोण कुणाचा यापेक्षा तो जीव महत्वाचा म्हणून सगळे त्यांना उपचारार्थ संगमनेरकडे घेवून जात होते, अनेकांना मग पुढे सिन्नर, नाशिक येथे तात्काळ उपचारासाठी घेवून जात होते. श्रीमती. माने, कदम, पाटील काकू या किरकोळ जखमी होत्या परंतु त्यांना भोवळ आली होती. सायली ही डोक्याच्या मारणे जखमी झाली होती. रक्त वाहत होते, पण ती उठून चालु शकता होती, तिच्याबरोबरचा मयंकला ती शोधत होती. आणि तिला तो सापडलाही, त्याला तर खूप लागलं होत, म्हणजे त्याचे दोन्ही हात गळ्यात नाजूक पद्धतीने बांधून आणलेले, डोक्याला मोठी खोच पडलेली होती. सबंध शरीर रक्ताने माखून लाल झालेलं, चेहरा पण विद्रूप दिसू लागलेला, पायालाही ठिकठिकाणी जखमांतून रक्तस्त्राव चालु होता. तिने प्रथमोपचार करून घेतले आणि आणि मयांकला ज्या रुग्णवाहिकेतून नेणार होते तिच्यातच बसली, अजून एक दोन जखमी अथवा मृत तिच्यातून इस्पितळात  नेता यातील म्हणून, पोलीस, अग्निशमन दलाचे जवान, इस्पितळाचे कर्मचारी, शिवाय इतरही अनेक लोक ये-जा, धावाधाव आणि प्रचंड गोंगाटात रडारड सुरु होती, तो प्रसंगच बाका गुजराला होता. तेवढ्यात दोन मृतदेह तिच्यापुढ्यात आणले गेली, अन तिच्या अंगाला कापरेच भरले. नाक्शिखन घर्मबिंदू तिच्यावर वाहू लागले, आणि ती थरथरू लागली, कारण तिच्या पुढ्यात जे दोन मृतदेह आले होते ते होते सुहास आणि रसिकाचे...
दोनच दिवसापूर्वी सुहास आपला होऊ शकत नसल्याने सायली नाशिक सोडून जात होती, पुण्यात तिच्या आजीकडे तिला थोडाफार बदल मिळू शकणार होता. परंतु तिचे असे तडकाफडकी निघूनच जाणे आणि फोनवरही उत्तर न  देण्याचे समाधानकारक समजू शकले नसल्याने सुहासने पुणे गाठण्याचे ठरवले. त्याने सोबत रसिकालाही चालण्याची विनंती केली, शिवाय मधुकडून तिला त्याला सायलीचा पुण्यातील पत्ता मिळालाच होता, तो त्याच्या शर्टच्या खिशात सायलीला मिळाला. त्यावरून तो आपल्यालाच भेटण्याला येत असणार हे तिला कळले आणि मग आभाळच कोसळल्यागत ती रडू लागली. धाय मोकलून. घळाघळा डोळ्यांतून पाणी येऊ लागले. तिच्या जीवाचा आकांत आसमंतात दुमदुमून गेला. काहीही चूक नसताना मृत्यूने सुहासला आणि निष्पाप रसिकाला गिळंकृत केले होते, तिच्यासाठी, तिला मनवायला, परत बोलवायला ते पुण्याकडे निघाले होते, परंतु आज पुन्हा एकदा चंदनापुरी येथे इतिहास घडला होता. घाटात बस कोसळल्याने तिने सुहास ला आणि रसिकाला कायमचं गमवून बसली होती. परंतु तिला आता मयांकला साथ द्यायची होती, त्यानेही त्याच्या आयुष्यात प्रेम गमावले होते, आणि सायलीला तर नुकताच धक्का बसला होता. मात्र सध्यातरी मयांकवर उपचार होई पर्यंत तिच्याकडे एकंच करण्यासारखी गोष्ट होती. पश्चाताप !!!

समाप्त
विशाल लोणारी, नाशिक
एम जे एम सी, पार्ट १


  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडा २ रा - रोजच्या रोज करा सोशल मीडिया मार्केटिंग - कंटेट इज अ किंग

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

आपण ट्वीटर मॅडमला ओळखता का? - ब्लॉगमालिका