विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...
कल, स्वभाव आणि माणूस
नमस्कार ! सर्व रसिक  आणि वाचक यांना माझा आदरपूर्वक नमस्कार . मी कुणीही मोठा लेखक नाही किंवा कुणी विचारवंत ,तत्ववेत्ता मुळीच नाही ,तसेच एखादा मानसशास्त्रज्ञ तर त्याहून ही नाही ,मी पुणे विद्यापीठातून पदवी संपादन करून ,कॉंम्प्यूटर इंजिनियरिंग शिकूनही आता माध्यमांचे अध्ययन करत असणारा एक विद्यार्थी आहे. आज मला सहज एक गोष्ट लक्षात आली की काही विषयांबद्दल मला माझी मते आहे, ती कदाचित दुसर्यचा दृष्टीकोन बदलू शकतात ,कुणाच्यातरी आयुष्यात त्याला एकदातरी उपयोगी पडू शकतात, ज्यातून आपण सध्या सुरु असलेले काळाचे दुष्टचक्र थोडाफार थांबवू शकू, आज दिवसागणिक बलात्कार होत आहेत, एक, नव्हे अनेक का ? तर माणसानेच घडवल्या माणसाकडून होत आहेत ही विकृती आहे जिला आळा घातला जावा असे मला वाटते म्हणूनच हा माझा लेखप्रपंच .

कल, स्वभाव आणि माणूस पाहायला गेलं तर इन मीन तीन शब्द आहेत. कल म्हणजे मनाचा कल तो ज्या दिशेने झुकलेला आहे तसा आपला स्वभाव असतो, आणि या स्वभावातून माणूस घडत असतो. जर कुणी सारखा हसत असेल तर त्याला हसतमुख म्हणतात, रडणार्याला दुखवलेला असे बोलले जाते, चेहर्यावारची माशीही न हलू देणार्यास आपण मख्ख, असे कुत्सितपणे बोलून जातो .ही सर्व कशाची प्रक्रिया झाली बरे? नक्कीच हाच माणसाचा कल आहे. ज्याचा कल हसण्याकडे असतो तो हसतमुख आणि असेच बाकी सर्व वृत्तीबंदल म्हणावं लागेल. पण ही अगदीच निरागस, निष्पाप आणि साधी गोष्ट आहे, हो पण यातून उत्त्पत होणाऱ्या गोष्टी मात्र भयंकर परिणाम देवून जावू शकतात बरे. म्हणून अनेकदा कुणाच्या कलाकलाने घ्यायला गेलो ही  हटकून आपलीच दमछाक होते, या गोष्टी मेंदू न्हवे थेट मनासही जोडल्या असल्याने फार जपून आणि सांभाळून वागवाव्या लागतात.

आता पुढची गम्मत ही सांगतो, या सर्व वृत्ती मिळून आपला स्वभाव बनवतात, ठरवतात. लोक किंवा अगदी वैद्य, डॉक्टर, आई, बाबा, काकू, मैत्रीण आपल्या वृत्तींचा अभ्यास करून आपला स्वभाव ओळखण्याचा प्रयत्न करतात.स्वभाव, बाबा रे, हा खूप अवघड प्रकार आहे हो ! कारण ही चमत्कारिक अदृश, न जाणवणारी परंतु आत्म्यातून वावरणारी एक गोष्ट आहे, ती म्हणजे स्वभाव. काही लोकं खरंच वेडसर असतात. अहो ही गोष्ट ज्याची असते ना त्याची त्याला जाणवायला लागेपर्यंत इतर लोकांना समजते आणि ते त्याबद्दल मत ही बनवून टाकतात. किती विचित्र आहे नाही, हा म्हणजे अति शहाणपणा, असा वेडपट प्रकार का करतात लोकं ? कोडेच आहे बाबा, असो. आपल्या आवडी, आपल्या सवयी, या अनेकदा अनेकजण पाळत असतो पण कधी इतका खोल विचार करत नाही ,की ह्याच त्या गोष्टी ज्या माझा स्वभाव ठरवतात. अनेकांना अनेक लोकांनी त्यांच्या स्वभावाबद्दल अपशब्द तसे गौरवोद्गार दिले असतील, नम्रपणे त्यांचा स्वीकार करणे इतकंच कर्तव्य मानायचे दुसरे काय. स्वभावाबद्दल माझे सर्वांसाठी मत असे आहे की कुणीही एखद्याला आतून बाहेरून संपूर्ण पोखरल्याखेरीज या या अमुकचा  स्वभाव असा ,त्याचा तसा असे पूर्वग्रह मनात बनवूच नये. कारणसुद्धा  सांगतो, कुणी एखद्या गोष्टीवर कशी ही प्रतिक्रिया देवू शकतो, ती फसवी पण असू शकते. त्यामुळेच जगात कुणी कुणाचा स्वभाव ठरवत बसू नये, हो पण जगताना सावध बरे, उगाच एखाद्याचा पडताळेला स्वभाव आपल्याच अंगाशी वाईटपणा देवून जायचा. चांगला हेतू ठेवला जरी हा अभ्यास अंगलट यायचा.
मी म्हटलं त्याप्रमाणे कलोत्त्पतीतून अनेक वेगळे-निराळे परिणाम घडतात, मग ते अशा गोष्टी घडल्यावरच होतात . आपण उगा कुणाचा स्वभाव ठरवून बसतो. टक्के, टोणपे आणि धक्के खात मनाचे ढोपरं फोडून घेतो, प्रेमात ज्यांना धोका मिळतो ना त्यांना विचारा की त्याने किंवा तिने आपल्या जोडीदारात सर्वप्रथम काय पहिले की एवढं प्रेम वाहून जावू लागलं ? पटकन उत्तर येते (बर्याचदा) स्वभाव ! आता मला सांगा, खरंच स्वभाव कळला असतो का ? असता तर विचारलेच नसते का, बाई गं लाईन देती का ? किंवा बाबा रे..... ,बर्याचदा लोक आपला स्वभाव बदलायचा आहे असे म्हणतात, सवयी बदलू पाहतात पण मला नाही वाटत की स्वभाव कधी बदलत असेल. त्यांचा, कदाचित हो, कदाचित नाही. आपणापैकी कोणाचे असे झालंय का , मला कळवा ह्ह नक्कीच. खरंच बराच पेचीदा (हिंदीतला) प्रकार असतो हा स्वभाव. याचं कसे असते आपला स्वभाव काय हे आपण ठरवत नसतो. ,दुसर्याविषयी कितीही खात्रीने सांगितलं तरी स्वभाव कसा बदलेल ? असेही साशंक मनात संचित करून ठेवतोच. मला वाटत इतके सोशिक नसावे माणसाने, दुसर्याचा पार स्वभाव-बिभाव ठरवणारे. त्याने काय होत आपलं आपल्यावर होते दुर्लक्ष आणि मग सतत वेगवेगळे विचार करण्याने मेंदूचा प्रोसेसर स्लो काम करायला लागतो दुष्परीणाम म्हणून  आरोग्याचे असंतुलन, मानसिक, शारिरीक विसंतुलन, अधःपतन. मला सांगा ज्या कुणाचा एवढा विचार केला, त्याचा केसही वाकडा झाला  नाही, तब्येत बिघडेल ती तुमची. मग सोडा ना बाटली राव, कुणाच्याही स्वभावाचा विचार न करता जगा, मस्त जगाल, तर आनंदी राहाल .

स्वभाव आणि कल यांतील समन्वय अभ्यासल्या नंतर आता आपण सुरु असणार्या मानशास्त्र पाठातल्या अतिशय गंभीर, अत्यंत सर्जन आणि मुख्यही म्हणता येईल अशा मुद्द्यावर वळूया, तो म्हणजे माणूस. माणूस म्हणजे काय तर व्यक्ती. व्यक्ती आली तिथे ओघानेच तिचं व्यक्तीमत्व  ही आलंच. व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय हो ,तर माणूस म्हणून घडणे, याकरिता हजारोने शिबिरे आयोजित केली जातात, वर्षभर चालूच असतो यांचा रतीब, असू द्या, चालु द्या, नो ऑब्जेक्शन !! पण त्या शिबिरांतून माणूस घडतो का ? किंवा अशा शिबिरांची गरज ती का भासावी ? संस्कार हा यातला एक गुणधर्म आहे, अशा शिबिरांतून आपल्याला पुन्हा एकदा संस्कार दिले जातात, म्हणे ! जे लहानपणी घरातून नकळत होत असतात,मग पुढे ते शाळेतून बिंबवले जातात तेच पुन्हा सर्व हे अशा शिबिरांतून शिकवतात. का, कशासाठी, आपण विसरून जातो म्हणून ?

बालपणात कसे असते, माणूस घडण्याच्या त्याच्या अगदी सुरवातीच्या पायरीवर असतो,चिखलाचा गोळा. बोलताना या गोष्टीला म्हणतात, चिखलाचा गोळा वगैरे, तर असे आपण न प्रक्रिया केलेले अगदी निर्मळ निष्पाप, निरागस असतो. त्यावेळी तिथे जर योग्य हाताळले गेलो नाही, योग्य संस्कार रुजले नाही तर गफलत ही तेव्हा नाही तर पुढे पौगंडावस्थेत, किशोर, कुमार, युवावस्थेत होत जाते. या वेळेस नेमकं लहानपणी शिकलेलं भोवतालच्या परिस्थितीवरून दुर्लक्षिले जाते, विसरले जाते. माणूस म्हणून आपण निराळाच आकार घेतो. आणि हे असे होत असताना कल, स्वभाव अत्यंत महत्वपूर्ण भूमिका पार पाडतात .ज्या वेगळ्या गोष्टींचा आपल्याला नाद लागतो त्याकडेच मग आपला कल हा जातो. जसे वाचन, लेखन, व्यसन (सिगारेट ,दारू ,तंबाखू इत्यादी ). यात बर्याचदा दुर्दैवाने लैंगिक आकर्षणाकडे कल गेला की मग एखादे व्यक्तिमत्व हे अत्यंत वाईट, पाशवी असे घडू शकते. त्याचा स्वभाव बदलतो. स्त्रियांकडे पाहण्याची दृष्टी बदलते परिणामी आज सगळीकडेच घडत जाणारे बलात्कारासारखे गुन्हे, छेडछाड, त्रास देणे, लैंगिक हावभाव करणे घडू लागतात. यात स्त्रिया, महिला पुरुषांना विरोध करतात, झिडकारतात मग तो आणखीनच चवताळून उठतो. अर्थात यात स्त्रिया खचितच चुकत नाही, पुरुषी मानसिकता खराब झालेली असते. मला असे स्पष्ट वाटते की हे सर्व भान कोवळ्या वयातून मुलांना दिले गेले पाहिजे. त्यांना नीट शिकवणूक दिली गेली तरच भविष्यात हे गुन्हे थांबू शकतील. पालकांनी गंभीर विचार करावा, त्यानुसार योग्य त्याच शाळेची निवड करा, माध्यमांनीही आपली जबाबदारी ओळखून, निरीक्षक आणि शिक्षक होऊन वागायला हवे. भारतीय सात्विक संस्कृती निपजली पाहिज. अनेकदा आपल्या मैत्रिणीने दिलेला सरळसोट नकार माणसाला विकृत बनवतो त्यावेळी मला वाटते त्या मनुष्याची मैत्रीण ६०% कारणीभूत असते त्याच्या अवस्थेला, मुलींनी थोड समजुतीने घ्यायला हवे ना !!  

तरुण वयात प्रेयसीला स्वभावच नंतर खटकू लागतो, कधीतरी त्याच स्वभावामुळे प्रियकर आवडलेला असतो ना ! कदाचित अशी परिस्थिती निर्माण होत असताना की संपूर्ण स्वभाव जेव्हा बदलतो. मुलगी एकदम वेगळंच वागू लागते. त्यामागे नक्कीच काहीतरी खोटे आहे असेच समजायचं, स्वभाव जाणे, बदलने कधीतरी शक्य आहे का ? स्वभावावरून घडतो तो माणूस. जर त्याचा कल बदलला की त्याचा स्वभाव, व्यक्तिमत्व ही बदलायला सुरुवात होते, अर्थात याकरिता तपश्चर्या हवी. पुढची पिढी घडवताना ,पालनपोषण करताना पालकांनी या गोष्टी लक्षात ठेवून निर्णय घ्यायला हवेत. कल पाहून न ठरवता, योग्य गोष्टींकडेच या पिढीचा कल असेल याकडे लक्ष द्यायला हवे, योग्य संस्कार होतील याकडे पहिलेच गेलं पाहिजे, चालणे, बोलणे, वागणे सुसंस्कृत असले पाहिजे हे. असे झाले पाहिजे की त्यातून भविष्यात त्या पिढीला त्रासदायक ठरणार नाही. आयुष्य त्यांना सुख-समाधानात घालवता येईल असेच राहील याची दक्षत घ्यायला हवी. आपण कुणीच  एकमेकांचा स्वभाव ताडत बसू नये. कारण या गोष्टी पुढे जाउन मनुष्य जातीतल्या घटकाला खूप वेदनादायी होतात. चांगला स्वभाव चांगलं व्यक्तिमत्व घडवतो, चांगल्या गोष्टींचा कल चांगला स्वभाव घडवतो. या गोष्टी आपण सगळ्यांनी नेहमीच लक्षात ठेवायला हव्यात .

पाहिलंत कल ,स्वभाव आणि माणूस या तीन शब्दांत किती प्रचंड ताकद आहे ती .


विशाल लोणारी , नाशिक , Lonari.v@gmail.com

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडा २ रा - रोजच्या रोज करा सोशल मीडिया मार्केटिंग - कंटेट इज अ किंग

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

आपण ट्वीटर मॅडमला ओळखता का? - ब्लॉगमालिका