विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...

cleanaliness

विशाल लोणारी ,नाशिक

मला सुट्टीत ही कॉलेजमध्ये जायला आवङतं ,बर्याचदा अशी खानाबदोशी मी करत असतो ,मग ते स्टाफ रुमपासून टोयलेटसपर्यँत . एक गोष्ट सखेद सांगतो की काही कॉलेजेस सिक्युरिटी ,पार्कीँग ,अकेङमीक कोर्सेस ,स्टुङंटस ,ईलेक्शन्स आणी ईतर अनेक गोष्टीँत बदल ,सुधारणा ,नाविन्यता ,प्राविण्यता दाखवत असतात ,परंतू एक लेङीज रुम सोङली तर इतर जेन्टस टोयलेटस यांच्या स्वच्छतेकङे फारसे लक्ष दिलेच जात नाही . अनेक ठिकाणी नैसर्गिक मार्जन करण्याकरीता योग्य व्यवस्था नसते ,पाण्याच्या नळांची गळकी दुरावस्था आणी अशा सार्वजनिक शौचालयांतील अग्रलेखांची उंची तर अवर्णनीय ,त्यांचा दर्जा खालवल्या पातळीत अग्रभागी असतो . काय बोलायचं आता ? 
या शौचालयांची स्वच्छता होतच नाही असा मत नाही ,परंतू त्यातही ओंगाळ स्वरुपच दृष्टीस पङते ,परिक्षेच्या दिवसात तर कॉपीजचा खचच्या खच हा पङलेला असतो . कॉलेज प्रशासनाने यावर बर्याचदा उपाय करुनही ,स्वच्छता टिकण्याचे ,समस्या कमी होण्याचे प्रमाण हे अत्यल्प असे दिसते .
स्वच्छता राखली जावी आणी अस्वच्छतेची पातळी खाली आणावी याकरिता भि .य.क्ष महाविद्यालयाने गौरवास्पद पाऊल उचलत ,नव्याने स्वच्छता गृहांची बांधणी केली ,
सुट्टीच्या दिवशी ती बंद ठेवली जातील यातून समाजात ,युवकांत अश्लील संदेश ,मुलींचे फोन क्रमांक लिहीण्यास वाचण्यास मज्जाव घालता येईल
भि .य .क्ष महाविद्यालयाचा आदर्श ईतरांनी घेण्यास हरकत नसावी .सामाजिक निरोगत्वाचा समतोल अबाधित राखणं प्रत्येक सुज्ञ नागरिकाचे कर्तव्यच आहे,नाही का ?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडा २ रा - रोजच्या रोज करा सोशल मीडिया मार्केटिंग - कंटेट इज अ किंग

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

आपण ट्वीटर मॅडमला ओळखता का? - ब्लॉगमालिका