नाती जुळतात , नाती तुटतात .नाती जुळविता येतात , तसेच नाती तोङता पण येतात नात्यांचे जुळणे ,तुटणेसंपूर्णपणे आपल्यावर अवलंबुन असते .आपला त्या नात्याकङे बघण्याचा दृष्टीकोन , आपली नाती जपण्याची पध्दत ,आपली आजुबाजुची परिस्थिती , कधीकाळी आपल्या गरजा,आपलं असणं ,नसणं त्यांची कारंण इत्यादी अनेक गोष्टीँमुळे आपल्याला नाती जुळण्या किँवा तुटण्याकरिता भाग पाङत असतात.जीवनाच्या प्रवासाता अनेक लोक आपले सहप्रवासी बनुन सोबत असतात ते का तर त्यांच्यासोबत असलेल्या नात्यामुळेच ना ! मी असं बिलकुल म्हणणांर नाही की तुम्ही प्रत्येक नातं कसोशीने जपा कधी नात्यातुंन माणसांत जर वितुष्ट येत असेल ,अनाकलनीय असे बदल घङत असतील जीवनात जर सुखाच्या आङ अङचणीँ येत असेल तर अशी नाती खुशाल पण तोङुन टाकावीत,अरे ज्या नात्याने आपले आपल्याचजीवनाशी असणारे नातं संपुष्टात येत असेल असे नाते वेळीच तोङलेल बरं . का आपणंच आपल्या जीवनाचा आनंद एखाद्या मक्यासारख्या दुखाच्या भट्टीत भाजायचा आणि वर तो आपणंच खायचा . आणी तसं ही नातंजपनं ,लोकांना आपल्यासी सतत जुळवून ठेवणं हे अत्यंत अवघङ कांम आहे ,कुणा कुणाला जमते कुणा कुणाला नाही जमतं . आता एखाद्या क्ष व्यक्तिने तुमच्या आयुष्यातयेवून चुक केली आपल्याला त्रास दिला तर तुम्ही त्या व्यक्तीला सोङंणच इष्ट असेल अस माझं मत आहे,परंतू त्यामुळे इतर लोकांना त्याच एक ढाच्यात बसविणे त्याच मोङक्या तराजुत बसविणे हे फार चुकीचेच असते .अशा लोकांना ना स्वत:च्या आयुष्याचा आनंद घेता येत ,ना ते दुसर्यांना आनंद फुलविण्याची संधी देत त्यामुळे कदाचित नकारात्मक दृष्टीकोन तयार होतो आणि त्याचं धुळवंङलेल्या दुर्बिणीतुन आपणं सगळ्या जगाला ,सार्या लोकांना पाहु लागतो आणि असे एक नाही असे एक नाही अनेकभारतीयांच्या मनाचे खेळ हे घङतात तसे मानशास्त्रच आहे पण परिणामं काय की कुणा एका नात्याच्या तुटण्याच्या परिणामांमुळे इतर अनेक नाती तुटतात .
नाती जपायची कशी यांच पण एक गणित असंत ते पण मानशास्त्राचा एक भागआहे . जे नाते जीवनभर आपल्या सोबतअसावे आहे हे आपल्याला अंर्तमनातून वाटत असते आपण त्याकङे बरोबर ओढले जातो,निरागसतेने ती नाती पण आपोआप जपली जाता फक्त त्या नात्याबद्दल आपल्या मनात पूर्ण विश्वास ,मायेचा ओलावा असणं खुप गरजेचं आहे .
आजच्या या धावत्या पळता भुई थोङीयुगात माणूस काळापेक्षाही जोरातधावू लागलाय त्याच्याकङे का कुणास ठावूक वेळ कमी पङु लागलाय कर्तव्य ही कर्तव्य न राहता एक साखळदंङ झालाय ज्यात अत्यंत क्रुरपणे तो जखङले गेला आहे त्यामुळे अनेकदा मनात असुन सुध्दा केवळा हा साखळदंङात अङकलाय म्हणुन तो नाती जपायला कमी पङतो ,कधी कधी तोङतो परिणामी माणूस दुरावतो .
माणूसकी ही संपूर्णपणे वेगळी संकल्पना आहे म्हंणजे नाते असते तिथे माणुसकी पाळली जाते कारण एकच की नाते आपण कसोशीने टिकवायचे असते म्हणूनंच तर
काही नाती आपणं आपसुकच बनवितो,राखतो जपतो काही म्हणां जसे की अनोळखी वाटसरुला मदत देतो ,मुकाटजनावरांच कधी पोट भरतो का ती कुठे आपली नातलग असतात पण या ठिकाणी आपण जपतो ते नातं म्हणजे माणूसकी ही पणती जोपर्यँत आपल्या अंतरात तेवत आहे तोपर्यँत प्रत्येक नाते जिवंत आसणार यात शंकाच नाही
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा