विशेष वाचनीय

“म्युच्युअल फंडातून करोडपती होता येतं? जाणून घ्या खरं Wealth Management!”

इमेज
म्युच्युअल फंडातून Wealth Management शक्य आहे का? हो—आणि कसं? “तुम्ही पैसे साठवताय… की खरोखर वाढवताय? आज घेतलेला छोटा गुंतवणुकीचा निर्णय उद्या तुमचं संपूर्ण आर्थिक भविष्य बदलू शकतो.” “मी, विशाल लोणारी (NISM CERTIFIED) – VHN FINSERV च्या माध्यमातून गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शन करत आहे.” मानवी जीवन शतकानुशतके बदलत गेले आहे. उत्क्रांत आणि आधुनिक होत चालले आहे. जगण्यात बदल होत गेले तशा मानवाच्या गरजाही बदलत चालल्या आहेत. गरजा बदलल्यामुळे खर्च आणि संपत्ती दोन्हींमध्येही वाढ करणे हीच मोठी मानवी गरज बनली आहे. त्यामुळे आता संपत्ती निर्माण करावयाची झाल्यास नव्या जमान्याच्या नव्या जोमाने ती निर्माण करावी लागणार आहे. त्यासाठी एक ताकदवान माध्यम म्हणून Mutual Fund आपल्या समोर येत आहे. आजच्या काळात म्युच्युअल फंडामध्ये एवढी ताकद आहे की, तुमचे बदलतं जीवनमान सुरू राहताना महागाईसोबत लढाई करताना Wealth Management करण्यात प्रभावी पर्याय म्हणजे Mutual Fund. VHN FINSERV च्या माध्यमातून आणि विशाल लोणारी ( NISM CERTIFIED) यांच्या मार्गदर्शनात म्युच्युअल फंडात योग्य पोर्टफोलिओ तयार करून श्रीमंतीसह ...

यश

यशस्वी एक्सप्रेस अशी सुसाट वेगात धावत असते की प्रत्येक माणूस जो या गाङीने प्रवास करतो तो जीवनात मोठे यश संपादन करतो आणि किर्ती शिट्टी सदैव विजयी तोषात वाजत राहते . या एक्सप्रेसचा रुळ हा महाकाय कठीण असा मार्ग आहे यावरुन धावतांना जोराचे धक्के बसतात , कधी वाट वाकङी होते , कुठे रुंद होते,वळणावळणावर सिग्नलस असतात परिक्षा असते . कधीकधी अनेक पूल ओलांङावे लागतात न ङगमगता न कंटाळता . याकरिता तुम्ही अत्यंततेजस्वी , हुशार ,बुध्दीमान असायला हवे अनेकवेळा गती कमी जास्त ,वेगवेगळ्या प्रकारची गणितं सोङवून निर्णय घ्यायचे असतात ते या एक्सप्रेसच्या इंजिनप्रमाणे अचूकच असले पाहिजे. त्याकरीता मुबलक इंधन , रोज साफसफाई आणि स्वताची ताकद कमाविण्याचा जोर लागतोच . यशस्वीएक्सप्रेस ही गाठायची असल्यास व्यासपीठ नावाचा प्लँटफार्म हा लागतोच या प्लँटफार्म चे तिकीट हे शिक्षणमंङळाकङून अभ्यासाचे तिकिट घ्यावे , अध्यापक अधिकार्याकङून ज्ञान घेणे आणि परिक्षेच्या टींसी कङून ते चेक करुन घ्यायचे . 

यशस्वी एक्सप्रेस तुम्ही येणार म्हणुन गाणं गुणंगुणंत थांबणार नाही योग्य ती संधी शोधून तुम्हीतिच्यात चढले पाहिजे . त्यानंतर प्रवासात अनेक जण तुमच्यासारखे किँवा अधिक यशस्वी माणंस भेटतील, आदर्शरुपी जनांचा आदर करावा , लहानांचा सन्मान प्रोत्साहन आणिज्ञान देवून करणे . दोन्हीमध्ये फायदा हा कि तुम्ही तुमचे कर्म अधिक करता , समजदार होतात ,प्रबळ ठरताता आणि विकास करुन घेतात स्वता:चा . बरं एकच आणखी करायचे या एक्सप्रेस मध्ये बसल्यावर,बसल्यानंतर तसेच बसायच्याआधी 
* स्त्रीदाक्षिण्य आत्मसात करायचे 
*स्त्रीच्या प्रगतीस बढावा द्यायचा 
*स्त्री वरील अत्याचार तिला होणारा त्रास न सहन करता त्याला वाचा फोङायची आवाज उठवून अन्यायविरुध्द लढा द्या 
*आपले यश तुमच्या आयुष्यातल्या एका स्त्रीला समर्पित करा कारण तुमच्या आईने अगदी लहान वयापासून ते तुमच्या जन्मापर्यतअनेक कष्ट , वेदन सोसल्या तेव्हा तुमचा जन्म झाला . 


तात्पर्य काय तर कष्टाशिवाय यश मिळत नाही आणि स्त्री शिवाय तर अस्तित्वच नाही यश तर फार लांब राहीलं


विशू

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

“म्युच्युअल फंडातून करोडपती होता येतं? जाणून घ्या खरं Wealth Management!”

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

धडा २ रा - रोजच्या रोज करा सोशल मीडिया मार्केटिंग - कंटेट इज अ किंग