विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...

बिपी

आयुष्यातली सगळ्यात सुंदर गोष्ट. सगळ्यात सुंदर भावना, ती पहिली नजर ते पहिलं प्रेम हे सगंळ असं बिभत्स पणे बघुन अनुभवायचं नसंत . ते कुतुहुल असंत ती फक्त मजा म्हणुन नाही ते एक ज्ञान आहे . आणि हे असंले सिनेमातुन ते घेवुन , बघुन त्यातली निरागसता हरवत जाते . मुलांतली निरागसता हरवतेय . पालकांना विचारा , धाङस करा,समजुन घ्या . आयुष्यात अजुन दोन मित्र मिळतील त्यांच्यात तुम्हाला. आणि पालकांनी जरा मोकळपणाने मुलांशी वागायला पाहिजे , असे प्रसंग आल्यावर मुलांच्या प्रश्नांना कसे उत्तरदेणार यापेक्षा असे प्रसंग येणारच नाही याची खबरदारी घेत बसल्याने विशु सारखे मुलं आपल्या मुलांना ढिँच्यँकढिच्याक ­ ­ दाखवतात आणि मग त्याचे परिणाम काय होतं ठावुक आहे 13 वर्षाचा मुलगा 22 वर्षाच्या मुलीला I LOVE YOU बोलतो , इतपर्यँत मजल जाते .वर्षे पुढे सरकत ,पिढि दर पिढि , तसे मुलांचे कुतुहुलाचे वय कमी होत आहे जे मग पुढे असे पाहिल्याने त्यांना ते विकृतीक बनवते, मुलं मैदानात खेळायचे सोङुन Mobile ,internet ,cd ,dvd यांच्या नादी लागतात आणि त्यांच्यातल्या कोमलतेला वास्नांतिक गंध येवु लागतो . मुलांच्या मनात एखादी गोष्ट पटकन बसते ,विचार तेच करायला लागतात जगात इतरांकङे बघण्याची दृष्टी बदलते . त्यांना सांगायलाच पाहिजे जे तुझ्या मनात आहे ती मजा नाही तर ते एक ज्ञान आहे . काय गंमत आहे बघा आज 13 वर्षाची मुले पण फेसबुकवर आहे . ७वीत असतांना कोणाशी काय बोलावे याची अक्कल नसते ही मुलं काय चँट करत असतील ?. मी पण लहान होतो ,मला देखील कुतूहुल होतेच , या सिनेमातल्या मुलांप्रमाणेच माझी देखील अवस्था होती , मी पण आई बाबांना विचारु शकलो नाही हे असं का ? तसं का ? पण यापुढे पालकांनी बोलावे , मुलांनी विचारावे ,प्रश्न सोङवली गेली पाहिजे . चित्रपट सेट छान आहे , नवा जुना काळ ,प्लँशबँक तंत्रज्ञान उत्तम . मुलांचा अभिनय उठावदार . किशोर कदम , आनंदइंगळे , विशाखा सुभेदार , सुप्रिया पाठारे यांनी चपखल काम केलं आहे . वेगळा धाटणीचा विषय , विशाल शेखर यांची गाणी कलाकारांचा भिङणारा अभिनय आणि उत्तम ,छायाचित्रण , मांङणी म्हणजे (दिग्दर्शन) कसदार सिनेमा . BP , Balak Palak . एक भावविवश करणारी आणि विचार करायला लावणारा अशी सवौत्तम कलाकृती आहे . विशेषत : पौगंङावस्थेत असणार्यां मुलांनी बघावाच ते पण पालकांसोबत . BP BALAK PALAK - ***

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडा २ रा - रोजच्या रोज करा सोशल मीडिया मार्केटिंग - कंटेट इज अ किंग

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

आपण ट्वीटर मॅडमला ओळखता का? - ब्लॉगमालिका