सुख सारखे फसवे काहीच नाही . सुखाची साथ ही फार अल्प काळ सगळ्यांना लाभत आली आहे ,आणि ती प्रत्येकाच्याच वाट्याला येते असे पण नाही . सुख म्हणजे ना फुलासारखे असते सकाळी फुलणारे आणि लगेच सांजवेळी सुकणारे . आपण मात्र त्या फुलाच्या त्या सौदर्याने मोहीत होतो , त्याच्यागंधात मंत्रमुग्ध होत आपल्या शर्टाच्या खिशाला लावून फिरतो , मिरवतो पण आपल्या सुखाची ही अशी उधळवणूकच आपल्या नाशाचे कारण बनत आहे . माणूस जेव्हा अत्यंत सुखात असतो तेव्हा त्याला इतरांचा मत्सर वाटू लागतो,द्वेशभावना पेटते , मनात त्याचा अहंकाराच नामक अभियंता गर्वाचे घर बाधायला लागतो . याऊलट सर्वामध्ये माणसाने मिसळुन राहून माणूसकी दाखवित जगले तर त्याचे सुख शंभरपटीने वाढते .बरंया क्षणभंगूर सुखाच्या मदिरेचे पेग रिचवितांना प्रत्येक गोष्टीचा शेवट हा ठरलेला असतो , हे लोक कसे काय विसरतात,सुखाच्या नशेच्या धुंदीत ते कधीकधी इतके बेभाम वाहवत जातात की कधीतरी आपल्या जवळच्या व्यक्तीँची किँमंत आपल्या लेखी कमी करुन ,त्यांना तुच्छतेची हीनअशी वाईट दर्जाची वागणूक मिळते.पण हे सगळे मृगजळ असते सुख ओसरणाच एकट तुम्हाला किती काळं भिजतं घालणार . खरं की नाही
या उलट परिस्थिती दुखाची आहे .
माणूस जेव्हा दुखात असतो ना,संघर्ष करत तेव्हा तो खरं जीवन जगत असतो .कारण याच कष्टाचे चीज होवून त्याला सुखाचा पिज्जा खायला मिळणार आहे हे त्याला पक्कं ठावूक असते .या दुखाच्या कङक उन्हातून तळतळत जाताना , तहानेने व्याकूळ आणि भूकेने पोट जळत असतांना होणारा सगळ्यात मोठा आणि महत्वाचा फायदा हा की यावेळेस आपल्या आयुष्यात अनेक साक्षात्कार होत असतात या वेळी ङोक्यावर छप्पर धरणारा,पाण्याच्या झर्यापर्यत पोहोचवणारा आणि स्वत: ताटावर बसलेला असताना आग्रहाने आपल्याला जेवू घालणारी व्यक्तीच तुमची हक्काची असते
बाकी फक्त लालसेपोटी सुखात तुमच्या आनंदाच्या पावसात न्हावून घेणारी लोक दुखाच्या बोचर्या थंङीत येवून चल दोघंबी कुङकुङू असे म्हणणार नाही . तेव्हा माणसाची खरी जाणती आपल्याला आसवे गळतांनाच होत असते . आपल्या हस्याचे कोणीपण कौतुकच करणार ना अस्संल हिरा तोचजो आपली आसवे टिपून त्याची फुलं करणार तेव्हा जे सुख मिळते तेच खरे सुख त्यातच खरा हर्ष मानावा बाकी वरवरच्या आनंदाला अर्थच नाही
तात्पर्य हेच की सुख तुमचे असले तरी त्यातच गुरफटू नका दुखाची जाण राखून आस्ते आस्ते उपभोगा सगळ्यांना एकत्रित करुन रहा आणि मूळात हे मृगजळ आहे वाहून पुन्हादुखाचे ऊनच राहणार लक्षात ठेवा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा