पोस्ट्स

विशेष वाचनीय

“म्युच्युअल फंडातून करोडपती होता येतं? जाणून घ्या खरं Wealth Management!”

इमेज
म्युच्युअल फंडातून Wealth Management शक्य आहे का? हो—आणि कसं? “तुम्ही पैसे साठवताय… की खरोखर वाढवताय? आज घेतलेला छोटा गुंतवणुकीचा निर्णय उद्या तुमचं संपूर्ण आर्थिक भविष्य बदलू शकतो.” “मी, विशाल लोणारी (NISM CERTIFIED) – VHN FINSERV च्या माध्यमातून गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शन करत आहे.” मानवी जीवन शतकानुशतके बदलत गेले आहे. उत्क्रांत आणि आधुनिक होत चालले आहे. जगण्यात बदल होत गेले तशा मानवाच्या गरजाही बदलत चालल्या आहेत. गरजा बदलल्यामुळे खर्च आणि संपत्ती दोन्हींमध्येही वाढ करणे हीच मोठी मानवी गरज बनली आहे. त्यामुळे आता संपत्ती निर्माण करावयाची झाल्यास नव्या जमान्याच्या नव्या जोमाने ती निर्माण करावी लागणार आहे. त्यासाठी एक ताकदवान माध्यम म्हणून Mutual Fund आपल्या समोर येत आहे. आजच्या काळात म्युच्युअल फंडामध्ये एवढी ताकद आहे की, तुमचे बदलतं जीवनमान सुरू राहताना महागाईसोबत लढाई करताना Wealth Management करण्यात प्रभावी पर्याय म्हणजे Mutual Fund. VHN FINSERV च्या माध्यमातून आणि विशाल लोणारी ( NISM CERTIFIED) यांच्या मार्गदर्शनात म्युच्युअल फंडात योग्य पोर्टफोलिओ तयार करून श्रीमंतीसह ...

कसे व्हाल Amazon seller ?

इमेज
amazon द्वारे व्यवसाय कसा करू? नमस्कार मित्रांनो. बऱ्याच जणांना आपला व्यवसाय ऑनलाईन करायचा आहे. अन त्यासाठी त्यांना Amazon चा पर्याय आवडतो आहे. पण, त्यांना अगदी सुचक असा प्रश्न पडतो की Amazon सेलर व्हायचे कसे. या वेबसाईटवर आपला व्यवसाय कसा स्थापन करायचा. त्याबद्दलची फी किती घेतली जाणार, त्यातून मला किती, कसे पैसे मिळणार, मालाची डिलीव्हरी मी करायची की Amazon करून देणार. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मी या ब्लॉगद्वारे देण्याचा प्रयत्न करेल. तरीही काही शंका असल्यास आपण मला ब्लॉगवरील संपर्क फॉर्मद्वारे किंवा कमेंट्समध्ये विचाराव्यात.    व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला व्यावसायिक असल्याची  नोंदणी करणे आवश्यक असते. जसे, तुम्ही तुमच्या दुकानांची नोंदणी शासनदरबारी करून घेतली आहे. तसेच इथेही तुम्हाला  Sell on Amazon   या लिंकवर जाऊन सेलर अकाऊंट सुरू करून घ्यायचे आहे. त्याशिवाय आपल्याला या वेबसाईटवरून व्यवसाय करता येणार नाही, ही महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. ही एक अत्यंत सोपी प्रक्रिया असून यासाठी तुम्हाला फक्त १५ मिनिटांचा अवधी लागतो.  तुमचे सेलर अकाऊंट तयार...

झलक दीखला जा...हिमेश भाई तू गाये जा !

इमेज
झलक दीखला जा, हे अक्सर सिनेमातील गाणे. याला हिमेशने संगीत दिले होतं. अन या गाण्यात हिरो होता इम्रान हाश्मी. हे गाणं आलं  तेव्हा हिमेश-इम्रान एकदम दर्दी कॉम्बिनेशन झालं होतं. इम्रान हाश्मीचे सिडक्टिव्ह दृश्य, रोमँटिझम, डोळे यातून तो अभिनयाची छाप न पाडताही भाव खाऊन जायचा. तर, डोक्यावर टोपी घालून हिमेशही गाणे म्हणताना पडद्यावर दिसायचा. तो गाणे गळ्यातून नव्हे तर नाकातून गायला लागला होता. तेव्हा तो हीट झाला.       त्याची गाणी बास-ट्रेबलसह रिक्षा रिक्षांमधून ट्रेंड होऊ लागली होती. माझा तेव्हा छंद होता. कोणत्याही रिक्षांमधून टेपचा (हो त्याकाळी सीडी प्लेयर अभावानेच असायचा, टेप मात्र होते) आवाज आला की शक्य होईल तितके कानात त्राण आणून मी ते गाणे ऐकायचा प्रयत्न करायचो. तो एक ढीकचीक ढीकचीक धिंकच्याक ढीच्याक रिदम ऐकेल्यावर उत्साह चढायचा, नस सळसळतं राहायचं.  तर, पुढे मग इम्रान हाश्मी अन हिमेश ही जोडी फिक्स्ड झाली. दोघे पिक्चर भले आपटीबार करायचे. पण त्याचे गाणे मात्र ब्लॉकबस्टर हीट बनायचे. अक्सरच्या आधी आशिक बनाया आपनेला लोकांनी डोक्यावर घेतले होते. तसा इम्रान...

Online Business करत नफा कमावण्याचा राजमार्ग, वाचा सविस्तर

इमेज
मित्रांनो, ऑनलाईन बिजनेस करणे ही आजकाळाची आता गरजच राहिली नाही, तर आता ही गोष्ट अपरिहार्य बनली आहे. देश-विदेशांतील व्यवसाय संशोधकांनी या गोष्टीला दुजोरा दिलेला आहे. ऑनलाईन व्यवसाय करताना आपण वेबसाईट डेव्हलपमेंट करून त्यावरून सेवा व वस्तू पुरवू शकतो. पण, केवळ हाच एक मार्ग आपला व्यवसाय ऑनलाईन स्थापन करण्याचा आहे, असे नाही. तर, यातील एक सध्या प्रचंड लोकप्रिय ठरलेला राजमार्ग म्हणजे Amazon Business.  सहज सोपे  रजिस्ट्रेशन  आपला व्यवसाय ऑनलाईन सुरू करणे अगदी सहज शक्य आहे. त्यासाठी नव्याने वेबसाईट बनवा, तिला गुगलवर प्रोमोट करा, एसईओ करा, सोशल मीडियावर ती शेअर करा, या सर्व तांत्रिक बाबींतून काही प्रमाणात तुम्हाला मुक्ती मिळते. तुम्हाला फक्त Register on Amazon Business   वरील वेबसाईटवर जाऊन स्वतःच्या व्यवसायाची नोंदणी करायची असते. त्यासाठी फक्त तुम्हाला Business PAN किंवा  GST  क्रमांक टाकावा लागतो. आपल्या व्यवसाय नोंदणीसाठी जीएसटी हा आवश्यक असतो. याचसोबत तो ऑनलाईन व्यवसाय करण्यासाठीही अपरिहार्य ठरतो. अमेझॉनच्या धोरणानुसार ज्या देशांत सध्या GST धोरण लागू...

द्राक्षकन्येची कहाणी - वाईन विश्व नाशिक (समग्र भाग १,२ व ३) Kindle Edition

इमेज
'वाइन विश्व नाशिक' या पुस्तकाचे भाग १, २ आणि ३ समग्र असलेले हे पुस्तक... लेखक विजय निपाणेकर -  (त्यांची इतर पुस्तके इथे बघा) या पुस्तकात आपण वाइन जगतात ‘टेस्ट राइड’ करणार आहोत …  लगेच ऑर्डर करा वाइन … द्राक्ष उत्पादन … वाइन निर्मिती … टेस्टिंग … पेअरिंग … पॅकेजिंग … गुण … दोष … वाइन आणि अन्न … वाइन आणि आरोग्य … वाइन आणि कायदा … वाइन आणि करीयर … वाइन आणि आध्यात्म अशा विविध पैलूंबाबत जाणून घेणार आहोत… 

Nokia चा ५ कॅमेरा असलेला नवीन स्मार्टफोन Amazon द्वारे लाँच

इमेज
नोकिया स्मार्टफोन 5 कॅमेरा असलेला स्मार्टफोन भारतातील मोबाईलच्या बाबतीत लोकप्रिय झालेली कंपनी नोकियाने (Nokia)आपला नवा स्मार्टफोन Nokia 5.3 लाँच केला आहे. नोकियाचे भारतीय ग्राहकांचे फार जुने आणि घट्ट असे नाते आहे. नोकियाचे बेसिक फोन्स आजही अनेकांच्या हातात तुम्हाला पाहायला मिळतील. मात्र बदलत्या काळानुसार नोकियाने आपल्या फोनमध्ये बदल करत आपला नवा स्मार्टफोन Nokia 5.3 लाँच केला आहे. हा स्मार्टफोन ऑनलाईन शॉपिंग साइट अॅमेजॉन (Amazon) आणि नोकियाच्या अधिकृत साइटवर विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. या स्मार्टफोनचे खास वैशिष्ट्य म्हणजे यात 5 कॅमेरे (5 Camera) देण्यात आले आहे. तुमची स्वप्ने अशी पूर्ण करा या स्मार्टफोनमध्ये 6.55 इंचाची HD+ स्क्रीन देण्यात आली आहे. ज्याचे रेश्यो 20:9 इतका आहे. या फोनमध्ये सेल्फी कॅमेरा नॉच आहे. हा स्मार्टफोन Snapdragon 665 चिपसेटसह 4GB/64GB आणि 6GB/64GB अशा दोन वेरियंट उपलब्ध केला आहे. यातील 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजची किंमत 13,999 रुपये असून 6GB रॅम आणि 64GB स्टोरेजची किंमत 15,499 रुपये इतकी आहे.  याच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, यात 13MP चा प्रायमर...

वेबिनार, मॉक टेस्ट आणि परीक्षा - ऑनलाईन परिक्षांचे हे तर नवे स्वरूप

इमेज
वेबिनार, मॉक टेस्ट अन परीक्षा  कसे असेल आता, परिक्षांचे स्वरूप ? कोरोना अजूनही भारतातून गेलेला नाही. मात्र, तरीही विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचीच भूमिका आता सरकारला घेणे भाग पडणार आहे. शक्यता अशी आहे की या परीक्षा ऑनलाईन पध्दतीनेच घेतल्या जातील.  ऑनलाईन परीक्षा घेताना, अनेक गोष्टी आपल्याला नव्याने कराव्या लागणार आहेत. नेहमीप्रमाणे एक्झाम सेंटर्सवर जाऊन या परीक्षा होऊ शकणार नाहीये. याचे कारण स्पष्टच आहे. कोरोनाची लाट आली असल्यामुळे जवळपास परीक्षा रद्देचा निर्णय घेण्याचा विचार सुरू होता. शेवटच्या वर्षांसाठी तो मंजूर झाला नाही. यामुळेच आता विद्यार्थ्यांना जोमाने अभ्यासाला लागावे लागणार आहे. इतकंच नाही तर, एमपीएससी, युपीएससी या परिक्षासुध्दा घेतल्या जाऊ शकतात. याबद्दलची ही आहे लेखनमीमांसा.   नॅशनल टेस्टींग एजन्सी तर्फे मला काल एक मेल रिसीव्ह झाला. ही एजन्सी भारत सरकारसाठी काम करते. ही एक स्वायत्त संस्था आहे. कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन परीक्षांसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील कठीण परीक्षा आयोजनाचे कार्य NTA करते. या एजन्सीचे कार्य सुरू झाले त्यावेळी १८ परिक्षांचे आयोजन त्या...

The immortals of Meluha - Book Review

इमेज
  The Immortals of Meluha  - the book made huge waves when it got released. It's still one of the most famous books and  the best-selling books . Amish Tripathi has done a fabulous job in writing this novel. The way he has portrayed Shiva's character as not a God but a human who has been given the level... - ambar WOW!! what a book! these were the words that came out of my mouth when i completed this book. it was the first mythology i tried and was super duper awesome!! what an excellent piece or work. the way Amish has depicted the origin of Lord Neelkantha the way he has justified every thing spoken and every thing we have heard from our ancestors was really great. plausible! for all those who do not believe in mythology and the mythological facts, here, this is the book you need to try to get a scientific explanation of those facts if they satisfy you well. this is a legend of a man, a barbarian(as he is considered by everyone), a Tibetan tribal who turns o...