पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...

काचेत बंद झाला माणूस !

इमेज
माणूस माणसासारखं वागणं विसरला आहे. मुंबईसारख्या मेट्रो शहरात तरी हा अनुभव निराळा नाही. याला जबाबदार कोण ? ढासळत गेलेल्या सामाजिक जाणिवा, वाढती गुन्हेगारी, अन माहिती व तंत्रज्ञानाने वेढले  गेलेली अख्खी मानव जमात.  आज प्रत्येकाला चटक लागली आहे. खोट्या खोट्या प्रसिद्धीची हरेक माणूस बेताल-बेभान होत चालला आहे. अनेक वर्षे त्याला या प्रसिद्धी, प्रतिष्ठा या गोष्टी निव्वळ कर्तृत्ववान लोकांनाच मिळू शकतात, हेच माहीत होते पण हा विचार आता मागे पडला आहे. आता, अवघ्या मिनिटभरात तो सोशल मीडियावरून रातोरात स्टार बनू शकतोय. लोकांना भुरळ पाडतोय. त्याला प्राप्त होणाऱ्या जळमटेसारखी असणाऱ्या प्रसिद्धीच्या हव्यासापोटी तो माणुसकी विसरत जात आहे. लोक घरात जळमटे लागलेलं ठेवत नाहीत. त्याचप्रमाणे सोशल मीडियातील लोकही कुणालाच कायम स्मरणात ठेवत नाहीत. त्यांना सतत नव्या गोष्टी बघण्याचा ध्यास लागलेला असतो. नव्या लोकांना भेटायची ईच्छा जागृत होते. त्यामुळे अनेक लोक एकमेकांना जवळ आलेत, कनेक्टेड झालेत पण त्यांच्यात जिव्हाळा उरला नाही. परिणामी माणुसकीचा झरा लोकांच्या हृदयाला फुटणे बंद झाले. सोशल मीडिया, तंत...

Movie Review - दुसरं प्रेम

इमेज
प्रेम नाव आहे फिल्म चं...दुसरं प्रेम 💡🎥🎞 दुसरं प्रेम नावाची शॉर्टफिल्म बघण्यात आली. दोन आठवडे झाले असतील. ती बघितल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी मला पूर्णवेळ डोक्यात तीच फिल्म फिरत राहिली. म्हणजे त्यातील प्रसंग विचारप्रवाहात सतत आदळत होते. याला कारण त्या शॉर्टफिल्मची नाटकीय कलाटणी देणारी अखेर. त्यामुळे माझ्या मनाला घनघोर निराशा फेर धरून राहिली होती. त्यामुळे त्या परिस्थितीत लिहायला बसलो असतो तर सगळी नकारात्मकतेची मळमळ ओकून मोकळा झालो असतो. म्हणूनच, लिहिणं टाळून दिले. त्या विचारांना सोडून दिले. संपृक्तता झाली नसल्याचे जाणवले होते. कदाचित माझी ती प्रक्रिया थोडी मंदावली होती. म्हणून फार धीराने घेतल्यावर फावला वेळ लाभल्याने आता लिहायला घेतोय. बऱ्याचदा असं होतं, की फेसबुक स्क्रोलिंग सुरू असते. अन, अशात एक तरूण ज्याचा आयुष्यात फार गोंधळ उडाला आहे. अन, एक अतिशय सुंदर अन समंजस मुलगी यांचा एक व्हिडिओ आपल्या समोर येतो. त्याला कॅप्शन 'अशी समजूतदार बायको मिळायला हवी' असे असते. तेव्हा उत्सुकतेने आपण तो व्हिडीओ बघतो. आपल्या साकळत चाललेल्या एकल्यपणाची आंतरिक जळजळीवर मलम लावायचा म्हणून असे  व्हि...

स्वप्नांचा मार्ग शोधायला लावणारा - the alchemist

इमेज
स्वप्नांचा मार्ग दाखवणारी परीकथा - The Alchemist स्वतःच्या ईच्छा, आकांक्षा नसणारा माणूस पृथ्वीतलावर सापडणे तसे कठीणच ! माणसांपैकी साधारणपणे ९० टक्के लोक तरी असे असतातच, ज्यांना दैवावर, नशिबावर प्रचंड विश्वास असतो. नशिब बलवत्तर व्हावं, म्हणून विविध मार्गाने माणसाचे प्रयत्न सुरू असतातच. यांच्यपैकीच काही जण असे असतात, जे फारच स्वप्नाळू असतात. सतत नवनवीन स्वप्ने पाहणे, त्याबद्दल आपल्या आजुबाजूच्या लोकांना सांगणे त्या स्वप्नांत रमणे ही त्यांच्यासाठी नित्याचीच बाब झालेली असते. स्वप्ने ही निव्वळ स्वप्नेच असतात का ? त्यांचा संबंध केवळ एका झोपेपुरता मर्यादीत उरतो का ? काही लोक याच्याशी सहमत होतील, तर काहींचे विचार नक्कीच वेगळे असतील. अनेक लोक, आपल्या स्वप्नांचा गांभीर्याने विचार करतात अन त्यांना पूर्ण करण्याच्या दिशेने स्वतःला झटवतात. स्वप्ने पूर्ण करतात. अशा माणसांचे आयुष्य इतर लोकांसाठी दंतकथाच बनून जाते. आपल्या स्वप्नांना खरे करणाऱ्या लोकांचे आयुष्य एखाद्या परीकथेत असावे असेच घडते. त्यांचीच चर्चा सगळीकडे घडते. स्पेनमधील सॅन्तियागो या मेंढपाळ मुलाच्या असेच आयुष्य वाट्याला आलं. त्याचीच कथा आपल...