पोस्ट्स

जुलै, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...

ऑनलाईन व्यवसाय सुरू करा, वाचा खास टीप्स

इमेज
Monsoon sale 50% off जरी तुमचं स्वतःचं दुकान आहे. स्वतंत्र अथवा भाड्याच्या जागेत व्यवसाय सुरू आहे. अथवा, तुम्ही अगदी मंडईत किंवा चौकात दुकान लावत असाल. आजच्या काळाची, आजच्या युगातील ग्राहकांची गरज तुम्ही ओळखायलाच हवी. तुमचा ग्राहकवर्ग हा तुमच्याकडे चालत येणाऱ्या लोकांपैकीच जरी असला तरी तुम्ही मात्र त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी स्वतःला तयार करा. मानवनिर्मित वा नैसर्गिक कोणत्याही छोट्या- मोठ्या संकटात तुम्हाला व्यवसाय कमी वा बंद करायला लागू नये, म्हणून ऑनलाईन व्यवसाय स्थापना करण्याविषयी तुम्हाला जितका लवकर निर्णय घेता येईल ते बघा. काळ फार झपाट्याने बदलत पुढे जातो. प्रश्न निर्माण होतात, तशी त्यांची उत्तरेही काळाप्रमाणे बदलत राहतात. आज तुमचा व्यवसाय जर वाढवायचा असेल तर त्यासाठी एकच महत्त्वाचा पर्याय तो म्हणजे, getting your business online.    आत्ताच सुरूवात करा -  तुम्हाला व्यवसायाची ऑनलाईन स्थापना करण्यासाठी विशिष्ट दिवस, परिस्थिती कधीही आड येवू शकत नाही. तुम्ही कोणत्याही वेळी त्यासाठी प्रयत्न सुरू करू शकतात. लोक आता फक्त ईमेल तपासण्यासाठी ऑनलाईन येत नाहीत. त...

नाशिकच भविष्य – भविष्यात नाशिकच

इमेज
साऱ्या जगाचे लक्ष नाशिक शहराने कायमचे वेधून घेतलेले आहे. सह्याद्री डोंगररांगाच्या कुशीत वसलेलं नाशिक. पश्चिम भारताच्या ह्रदयस्थानातील अध्यात्मिक महती व ऐतिहासिक पाळेमुळे असण्यापासून आजच्या काळात ज्या शहराकडे अवगत तंत्रज्ञान, जागतिक व्यापार केंद्र, वैज्ञानिक संशोधन, उद्योगनगरी, आयटीहब म्हणून अनेकांचे स्वप्न साकार करणारे ठिकाण म्हणून ओळख मिळत चाललेलं शहर म्हणजेच ‘नाशिक’ पूर्वीसारखी मंदिराची भूमी, तपभूमी, मंत्रभूमी ही ओळख कणभर ही पुसू न देता या शहराने जगाच्या नकाशावर स्वतंत्र अस्तित्व अगदी ठळकपणे निर्माण केले. १९९१ नंतर भारतात जागतिकीकरण सुरू झाले. तेव्हापासूनच नाशिक शहरात अनेक बड्या उद्योगांची, औषधनिर्माण, संशोधन तसेच नावाजलेल्या शिक्षणसंस्थांनी आपले स्थान पक्के करायला सुरूवात केली होती.  नाशिक सातत्याने विकसित होत चालले आहे. सामाजिक, राजकीय, आर्थिक स्थित्यंतरे या शहरात गेल्या काही दशकांत आपल्याला बघायला मिळाली आहेत. आरोग्य, दर्जात्मक जीवनशैली, आदरातिथ्य व पर्यटन, शैक्षणिक संकुल, उद्योग, संरक्षण, जैविक उर्जा, या सर्वच क्षेत्रात नाशिकने विकसित होण्याची कास धरल्याचे आपल्य...

स्वतःचा ब्लॉग कसा सुरू करावा? ब्लॉगर्स पैसे कमवू शकतात का? - शुभम दातारकर - लेखक व सहसंपादक द कलमवाला

इमेज
आज ब्लॉगिंग फक्त छंद राहिला नाही तर तो व्यवसाय झाला आहे. ब्लॉगर्स लाखांत पैसे कमावत आहेत. थोडंसं मार्गदर्शन आणि काही मुलभूत स्त्रोत जरी असले ना तरी तुम्ही फक्त 15 मिनिटात आपला ब्लॉग सुरु करू शकता. the world bestseller book हे २०२० सुरु आहे आणि हा ब्लॉगिंग आणि पत्रकारितेचा तो सुवर्णकाळ आहे जिथे ब्लॉग तयार करणे आणि त्यापासून पैसे कमविणे काही कठीण नाही. जर तुम्हाला तंत्रज्ञानाची फारशी माहिती नसेल, कोडींग करता येत नसेल किंवा वेब डिजाईनिंगची जरी माहिती नसेल तरीही तुम्ही आपला स्वतःचा ब्लॉग बनवू शकता. “वर्षभर ब्लॉग चालविण्यासाठी तुम्हाला माझ्या मते तुम्ही डोमेन आणि होस्टिंग विकत घ्यायला हवी. प्रयोग म्हणून तुम्ही फ्री होस्टिंग वापरू शकता. आधी तर हे ठरवा कि तुम्हाला फ्री ब्लॉग पाहिजे की स्वतःची होस्टिंग असलेला? सुरुवातीलाच मी सांगितलं कि ० ते ७००० रुपयांच्या दरम्यान तुम्हाला खर्च येऊ शकतो. हा वार्षिक खर्च आहे. तुम्ही फ्री मध्ये सुद्धा ब्लॉग सुरु करू शकता. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे.  blogger   वर्डप्रेस वेबसाईटवर जाऊन आपलं खातं उघडायचं आणि लिहायला सुरु करायचं. फ्री व...

आपण संचिका मॅडमला ओळखता का? ३

इमेज
मित्रांनो, नमस्कार ! आज या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित करत आहे. द बेटर इंडिया या वेबसाईटवर आपण याच मालिकेचे इंग्रजी भाषांतर पाहू शकणार आहात. ब्लॉग मालिकेचा प्रयोग आवडल्याबद्दल अनेकांनी वैयक्तिक प्रतिक्रिया दिल्या त्यांचे आभार.. मी असेच नवनवीन विषय आपल्यापुढे या ब्लॉगद्वारे मांडणार आहे, तूर्तास सुरूवात करूया आजच्या ब्लॉगला  आधीचे भाग वाचण्यासाठी  👈  पुढे सुरू आणि, पोलिसांचा मास्टर प्लॅन ठरला – असे काय होते, ज्यामुळे मुंबई पोलिसांपर्यंत पोहोचण्यास नागरिक टाळायचे? पोलिसांची भिती त्यांना वाटे, की त्यांच्यावर अविश्वास होता? वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संचिका यांना असे प्रश्न विचारून भंडावून सोडले. त्यांनी कदाचित संचिका यांची ट्वीटरवर पोलिसांना आणण्याच्या निर्णयाचे एकीकडे कौतुक वाटत असतानाच त्यांची परिक्षाही बघायची होतीच. यावरही संचिका यांनी अगदी मार्मिक उत्तर द्यायचे ठरवले. त्यांनी म्हटले, नेहमी नेहमी काय हो, पोलिसांची कडक इस्त्रीचीच भाषा असते. पोलीस लोकांशी त्यांच्याशी मिळूनमिसळून राहू शकत नाही काय? त्यांना एखादा जोक, चुटकुला सांगवून हसवत, कधी चिमटे काढत शिस्तीचा धडा शिकवू शकत नाही...

आपण ट्वीटर मॅडमला ओळखता का? ब्लॉगमालिका - २

इमेज
पहिल्या भागात आपण संचिका पांडेय यांचं व्यक्तिमत्त्व जाणून घेतले. या भागात त्यांनी मुंबई ट्वीटर हँडल कसे सुरू केलं हे वाचणार आहोत. पुढील भागात त्यांच्या कामाबद्दल अधिक माहिती जाणून घेता येईल. पहिला भाग वाचला नाही का?  पहिला भागाची लिंक    वरील लिंकवर क्लीक करून आधीचा भाग वाचा  . पुढे सुरू….  पोलिसांची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न – २०१५ साली संचिका यांनी बंगळूरू पोलिसांचे ट्वीटर हँडलचा बारकाईने अभ्यास केला. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की बंगळुरू पोलीस हे लोकांशी त्यांना समजेल अशा भाषेत त्यांच्याशी संभाषण करत होते.  ही सगळी अगदी तत्काळ होणारी प्रक्रिया होती. या दुतर्फा प्रक्रियेत सहभागी प्रत्येकच जण समाधानी होत होता. लोकांशी वेळोवेळी संवाद साधून वाटाघाटी सुरू ठेवण्याच्या या प्रयत्नांबद्दल संचिका या खूप खुश झाल्या. त्यानंतर त्यांनी याबद्दल मुंबई पोलिसांच्या उच्च अधिकाऱ्यांनाही याबद्दल सजग केले. याविषयी संचिका यांनी एके ठिकाणी सांगितले, “मुंबई पोलिसाच्या पोलीस दल ही प्रतिमा पोलीस सेवा अशी रूपांतरित व्हायला हवी. याबद्दल मी उच्च अधिकाऱ्यांना वेळोवेळी सांगत राहिले....

आपण ट्वीटर मॅडमला ओळखता का? - ब्लॉगमालिका

इमेज
आपण ट्वीटर मॅडमला ओळखतात का ?- ब्लॉगमालिका  २०१६ सालच्या जुलैची गोष्ट आहे. दोन तरूणी रिक्षाने प्रवास करत मुंबईतील खार येथून चालल्या होत्या. तेव्हा त्यांच्याकडे बघून एका मोटरसायकलस्वाराने त्याचे जननेंद्रिय उघडे करून दाखवत अश्लील चाळे करण्याला सुरूवात केली तेव्हा हे पाहून त्यांना धक्काच बसला. क्षणाचाही विलंब न करता प्रसंगभान राखत त्या मुलींनी त्याचा फोटो क्लीक केला. अन, तो मुंबई पोलिसांच्या ट्वीटर हॅंडलवर पोस्टही केला.  गुन्हेगाराला अटक  - तीन तासांच्या आत त्या व्यक्तीच्या मुसक्या आवळल्या गेल्या. मागील वर्षी जुलै महिन्यात क्ष तरूणीस व्हॉट्सअपवर एक मेसेज आला. अज्ञात व्यक्ती त्या तरूणीस तिचे आक्षेपार्ह छायाचित्र पाठवण्याचा दबाव आणत होता. तसे, न केल्यास तिचे फोटोशॉप्ड फोटोज व्हायरल करण्याची धमकी त्या मेसेजमार्फत देण्यात आली होती. “भांबावलेली अन घाबरलेली असताना मी याबद्दल मुंबई पोलिसांना सतर्क केलं. थोड्याच वेळात माझ्या ट्वीटवर त्यांनी प्रतिक्रिया दिली. जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्यावर असलेल्या एका महिला पोलीस अधिक्षकासोबत मला जोडून दिले. एफआयआर दाखल करण्यात त्या महिला अधिक...