पोस्ट्स

सप्टेंबर, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...

मीना - एक जिद्द

इमेज
मैदानावर खेळाचे प्रशिक्षक खेळाडूंकडून धावण्याचा सराव करुन घेत होते. अनेक खेळाडू यंदा आंतरशालेय क्रीडा महोत्सवासाठी प्राण पणाला लावून तयारी करत होते. दरवर्षी भरत आलेल्या या महोत्सवात शहरातील सर्व नामांकित शाळांचा सहभाग असे. ज्या शाळेचा गौरव होई, त्यांना राज्यस्तरावर जाण्याची संधी मिळत होती. याचमुळे यंदा विद्यानिकेतन विद्यालयाने आपल्या विद्यार्थ्यांमधून सर्वोत्तम खेळाडूंना खेळण्यासाठी प्रेरित केले होते. स्पर्धेत बाजी मारण्याच्या उद्देशाने त्यांच्याकडून कसून सराव करून घेतला जात होता. या खेळांमध्ये पळणे, तीन पायांची शर्यत, लंगडी, गोळाफेक, थाळीफेक आणि क्रिकेटचा समावेश होता. अभ्यासात कधीही मागे न राहिलेल्या विद्यानिकेतन विद्यालयाला यंदा आपण खेळातही अव्वल आहोत याची सिद्धता करून द्यायची होती. यासाठी शाळेतील क्रीडा शिक्षक श्री. मंदार गोळेसर  हे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत होते. मंदार, हेदेखील उत्तम धावपटू आणि फलंदाज होते. धावपटू असल्याने मैदानी कवायतींत त्यांचे प्राविण्य होतेच. यामुळे आपल्या शाळेलाही राज्यस्तराच्या स्पर्धेत खेळवण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनीही अपार मेहनत घेण्याचे ठरवल...

मागे वळून बघताना

इमेज
मागे वळून बघताना  वाटून गेलं तिने मागे बघितलं तर तिने मागे बघितलं तर  आठवेल तिला काय भावनांची घुसमट, विचारांची फरफट स्वाभिमानाचा गुंडाळलेला गाशा फुटू न दिलेला आवाज आणि बरंच काही तिने मागे वळून बघितलं तर  तिला काय आठवेल तिच्यासारख्या कहाण्या हातात घेऊन तलवार, हातात घेऊन लेखणी तिच्यासाठी त्वेषाने पेटून जिद्दीने लढलेल्यांच्या कहाणी अन, त्यांना वंदन करून अन्याय सहन करून दमलेला तिचा स्वतःसाठीचा विचार तिने मागे वळून बघितलं तर  तिला आठवेल  तिची विचित्र अवस्था, तिचं चुरडलेलं मन, अन चोरटे काटेरी स्पर्श तिला आठवत राहील निथळलेलं रक्त कित्येकांच्या जखमांवरचं तिने मागे वळून बघितलं तर  तिला आठवत राहील  वेलीवरील खुडलेल्या कळ्या उमलण्याआधीच करकच्चून बांधलेलं तिला मोकळा श्वास घेण्याआधीच तिने मागे वळून बघितलं तर ती फुत्कारून उठेल,  याआधी न उठवलेले शेकडो हुंकार तिला आठवेल पुस्तकांची थप्पी अन तिच्या लेखनावर केलं गेलेलं तिचं खच्चीकरण तिने मागे वळून बघितलं तर आठवेल फक्त कापसाची वात सगळं तेल पिळवटून काढलेली विझवून टाकलेली विशू